Home » कल्पनेपलिकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या ‘वाय’ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

कल्पनेपलिकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या ‘वाय’ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

by Team Gajawaja
0 comment
Y teaser
Share

मुक्ता बर्वेने (Mukta Barve) हातात मशाल धरलेले ‘वाय’ (Y) या चित्रपटाचे आगळेवेगळे असे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. मशाल घेऊन नक्की ती कोणासोबत लढत आहे याचे विविध अंदाज अजूनही लावले जात आहेत. आता ‘वाय’ (Y Teaser) चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ २४ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

अतिशय थरारक अशा या टीझरमध्ये झोपेतून अचानक जागे झालेल्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसत आहे. हा कुत्रा मुक्ताकडे का झेपावत आहे? नक्की काय घडतंय? कशासाठी घडतंय? अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर कळणार आहेतच.

चित्रपटाच्या उत्कंठापूर्ण प्रमोशनची आणि ‘वाय’ या शिर्षकाची चर्चा सर्वत्र सुरू असतांना या टीझरने कुतुहलात आणखी भर पडली आहे. दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ”वाय’ या शिर्षकामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे.

वाय ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. ह्या टीझरचा आणि ‘वाय’ या नावाचा अर्थ तुम्हां सर्वांना जाणून घ्यायचा आहेच आणि त्यासाठी ‘वाय’ नक्की म्हणजे नक्की पहा.”

====

हे देखील वाचा: विनोदाचा ‘झोलझाल’ १ जुलैला होणार सिनेमागृहात प्रदर्शित

====

कंट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित चित्रपटाची कथा अजित सूर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.