पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा सामना करणाऱ्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने (Central Govt) शनिवारी मोठा दिलासा जाहीर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman), यांनी सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क (Petrol-Diesel Excise Duty Cut) आठ रुपयांनी आणि डिझेलवर सहा रुपयांनी कमी करत आहोत. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत.
यासोबतच, अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी दिली जाईल. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल, असे ते म्हणाले.
====
हे देखील वाचा: नवज्योत सिंह सिद्धूला तुरुंगवासाची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण
====
प्लास्टिक उत्पादनांवरील कस्टम ड्युटीही कमी करण्यात आली
सीतारामन म्हणाल्या की ज्या प्लास्टिक उत्पादनांवर आमची आयात अवलंबित्व जास्त आहे अशा कच्च्या मालावरील कस्टम ड्युटी देखील आम्ही कमी करत आहोत. काही स्टील कच्च्या मालावरील आयात शुल्कही कमी केले जाईल.
काही स्टील उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारले जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सिमेंटची उपलब्धता सुधारण्यासाठी नियम लागू केले जात आहेत आणि सिमेंटची किंमत कमी करण्यासाठी उत्तम लॉजिस्टिकचा अवलंब केला जात आहे.
शनिवारी असे होते पेट्रोल आणि डिझेलचे दर
शनिवारी देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर होता. मुंबईत पेट्रोलचा दर 115.51 रुपये आणि डिझेलचा दर 105.77 रुपये प्रति लिटर होता.
====
हे देखील वाचा: हार्दिक पटेल यांचा काँग्रेसला रामराम…
====
कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 115.12 रुपये आणि डिझेलचा दर 99.83 रुपये प्रति लिटर होता. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटरने विकले गेले.