आरोग्य तज्ज्ञ मधुमेहाला(Diabetes) ‘सायलेंट किलर’ आजार म्हणून वर्गीकृत करतात. हा एक असा रोग मानला जातो, जो शरीरातील इतर अनेक आरोग्य समस्यांच्या जोखमीला प्रोत्साहन देतो. मधुमेहाचा शरीराच्या अनेक भागांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा लोकांमध्ये डोळे, पचन, मूत्रपिंड, यकृत आणि रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित अनेक समस्यांचा धोका वाढतो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मधुमेह(Diabetes) हा अनुवांशिक आजार आहे. म्हणजेच जर तुमच्या पालकांना हा आजार झाला असेल, तर तुम्हालाही त्याचा धोका असू शकतो. यासोबतच जीवनशैली आणि आहार यांचाही यात महत्त्वाचा वाटा आहे. याच्या जोखमीच्या घटकांचे गांभीर्य समजून घेऊन, सर्वांनी लहानपणापासूनच हा आजार रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मधुमेहामध्ये रक्तप्रवाहात साखरेचे प्रमाण वाढते. याची वेळीच काळजी न घेतल्यास अनेक अवयवांना इजा होण्याचा धोका असतो. हेच कारण आहे की, तज्ज्ञ लहानपणापासूनच प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा सल्ला देतात. यासाठी मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे जाणून घेणे आणि ओळखणे खूप महत्वाचे आहे. चला अशाच काही लक्षणांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्या आधारे मधुमेहाच्या धोक्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. यापैकी बहुतेक लक्षणांकडे आपण सुरुवातीला दुर्लक्ष करतो.
=====
हे देखील वाचा – एसी मध्ये ही घाम येतो ? असू शकतो हा आजार, काय आहे यावर उपाय ?
=====
डोळ्यांच्या समस्या
मधुमेह(Diabetes) शरीराच्या अनेक भागांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. डोळे हे त्यापैकीच एक आहे. मधुमेहाच्या सुरुवातीस काही लोकांमध्ये डोळ्यांशी संबंधित लक्षणे, जसे की अंधुक दृष्टी किंवा दृष्टीशी संबंधित इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या खराब होतात, त्यामुळे अंधुक दिसण्याची समस्या उद्भवू शकते.
जखम बरी होण्यासाठी जास्त वेळ लागणे
जखम बरी होण्यासाठी जास्त वेळ लागणे, हे मधुमेहाच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. सर्वसाधारणपणे, मधुमेह(Diabetes) शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो, ज्यामुळे जखमा बऱ्या होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. जखमा भरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे संसर्गाचा धोका देखील वाढतो. तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील, तर तुम्ही तातडीने आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
थकवा आणि अशक्तपणा येण्याची अनेक कारणे असू शकतात. परंतु मधुमेह देखील यामध्ये एक प्रमुख घटक आहे . मधुमेहामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे, तसेच अन्नाचे पचन आणि पोषक द्रव्ये शोषून घेण्यावरही परिणाम होतात. शरीराला पुरेशा प्रमाणात पोषकद्रव्ये मिळत नसल्यामुळे, अशक्तपणा आणि थकवा येणं अगदी सामान्य आहे. अशा समस्यांना मधुमेहाचे(Diabetes) लक्षण मानले पाहिजे.
हात-पायांवर सूज येणे
सामान्यत: जास्त काम केल्यामुळे हात-पायांवर सूज येण्याची समस्या निर्माण होते. परंतु जर तुम्हाला सतत अशा प्रकारचा त्रास होत असेल, तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या(Diabetes) सुरुवातीच्या टप्प्यातही हात-पायांवर सूज येण्याची समस्या येऊ शकते. काही लोकांना हात-पाय सुजण्यासोबत सुन्नपणाही जाणवू शकतो. या समस्या दीर्घकाळ राहिल्यास रक्तातील साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे.