काळानुरूप बदलत चालेली संस्कृती आणि टेक्नोलॉजीच्या विश्वात अधिक गुंतत चाललेली पिढी. पण, माझ्या मुलीनेही टेक्नोलॉजीसोबत चालताना, प्रगत देशात वावरताना पारंपरिक गोष्टी वाचत, मोठ व्हाव म्हणून त्याने तिच्यासाठी तिच्या भावविश्वाशी जवळीक साधणारं पुस्तक लिहिण्याचं ठरवलं. कल्पना सत्यात उतरतं गेली, वेणूच्या खेळण्यातील डॉनल्ड डक झाला ‘डीटेक्टीव्ह डकी’, गणपती बाप्पा झाला ‘गणू’, जेलू , सूपरसोनेरी आणि यातील मुख्य पात्र ठरली ती वेणू…
‘वेणू’साठीच्या या पुस्तकातील एक-एक पात्र विनोदाच्या लिखाणातून आकार घेतं गेलं, आणि तयार झाला तब्बल १०० गोष्टींचा एक संच. या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. प्रत्येक गोष्टीतून मिळणारा बोध वेगळा आहे. या अनोख्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या शनिवार, २१ मे तारखेला, दादर-माटुंगा कल्चरल सेंटर,पहिला मजला, रुपारेल कॉलेजजवळ सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर सचिन गोस्वामी, सचिन मोटे, देवेंद्र पेम, अभिनेता विनोद यांची आई लक्ष्मी गायकर यांच्या उपस्थितीत रंगणार आहे. या कार्यक्रमास मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार आपल्या लहान मुलांना घेऊन उपस्थित राहणार आहेत.
====
हे देखील वाचा: चिन्मयी साळवी रुपेरी पडदयावर
====
वेणूच्या पाचव्या वाढदिवशी विनोदने हे पुस्तक वेणूला भेट म्हणून दिलं. वेणूला तिच्या लाडक्या बाबाकडून ‘वेणूच्या गोष्टी’ हे भेट मिळाले पुस्तकं प्रचंड आवडलं. काही दिवसांनी विनोदने सोशल मीडियावर या अनोख्या पुस्तकाविषयी सांगितलं. काहींनी पुस्तकं पाहिलं आणि आपल्या लहानग्यांसाठी हे पुस्तक मिळाव अशी मागणी केली.
ही मागणी वाढली आणि अखेर विनोदने प्रत्येकी २५ गोष्टींचा एक असं ४ पुस्तकांचा एक संच प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. विनोदसाठी हा आनंदाचा क्षण होता. हा आनंद सगळ्यासोबत शेअर करण्यासाठी या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
====
हे देखील वाचा: ‘रानबाजार’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
====
याबद्दल विनोद म्हणतो, अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करताना असणारी जबाबदारी आणि एक बाप म्हणून मुलींसाठी संस्कार करण्याच्या आणि परंपर जपण्याच्या हेतूने लिहिलेलं हे पुस्तक आता सगळ्यांसाठी उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. आता वाचकांनाही हे पुस्तक आवडेल आणि यातूनच अधिक नव्या गोष्टी घेऊन तुमच्या समोरं यायला मला नक्की आवडेल. हा कार्यक्रम निशुल्क आहे.