प्रथिनांनी युक्त अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. विशेषतः वाढत्या मुलांना आई प्रथिनांच्या स्त्रोतासाठी अंडी देते. जर तुमच्या मुलाला रोज एकाच प्रकारे बनवलेले ऑम्लेट खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी नवीन पद्धतीने ऑम्लेट (irani omelette) तयार करून त्यांना द्या. तसेच ऑम्लेट खाणं मुलांनाच आवडतं असं नाही, तर ते जवळजवळ प्रत्येक अंडी खाणाऱ्या व्यक्तीला आवडते. तर यावेळी नाश्त्यात इराणी रेसिपीने ऑम्लेट बनवा. जाणून घ्या ऑम्लेट बनवण्याची इराणी रेसिपी.(irani omelette)

इराणी ऑम्लेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य
इराणी ऑम्लेट (irani omelette) बनवण्यासाठी तुम्हाला दोन अंडी, दोन टोमॅटो, एक कांदा, अर्धा चमचा काळी मिरी, चार ते पाच पाकळ्या लसूण, दोन चमचे तेल, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि चवीनुसार मीठ लागेल.
====
हे देखील वाचा – सकाळी नाश्त्यासाठी इडली ऐवजी खाऊन बघा ‘साबुदाण्याची इडली’!
====
इराणी ऑम्लेट बनवण्याची पद्धत
तुम्ही अनेकदा सकाळी घाईघाईत ऑम्लेट (irani omelette) तयार केले असतील. पण यावेळी जुने पदार्थ आणि नवीन पद्धत वापरून तुम्ही चविष्ट ऑम्लेट तयार करू शकता. इराणी पद्धतीने ऑम्लेट बनवण्यासाठी प्रथम गॅसवर तवा ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यात एक चमचा तेल टाका.
एक लसूण सोलून ठेचून घ्या किंवा त्याची पेस्ट बनवा. तव्यात तेल गरम झाल्यावर, हा ठेचलेला लसूण त्यात टाका. त्यात बारीक चिरलेला टोमॅटोही घाला. टोमॅटो शिजल्यावर त्यात मीठ टाका. तसेच एक चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा लाल तिखट टाका. त्यासोबत दालचिनी पावडरही टाका. आता या सर्व गोष्टी नीट मिक्स करा. गॅस मंद करून टोमॅटो व मसाले चांगले परतून घ्या.
तव्यामध्ये टोमॅटो चांगले पसरवा आणि दोन अंडी घ्या आणि या भाजलेल्या आणि मसालेदार टोमॅटोच्या वर अंडी फोडून टाका. ही अंडी चांगली शिजू द्या. ही अंडी चांगली शिजल्यावर, त्यावर परतलेले कांदे टाका. गॅस बंद करा आणि हे ऑम्लेट (irani omelette) नाश्त्यात सर्व्ह करा.