अनेक मुलींचे स्वप्न असते की, त्यांना एकटीला घरापासून लांब कुठेतरी फिरायला(Travel) मिळावे. पण अनेकदा पालक मुलींना एकटे फिरायला जाऊ देत नाहीत. कारण काही जागा मुलींसाठी सुरक्षित नसतात. पण जर तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत ट्रिपची प्लॅनिंग करत असाल, तर तुमच्या लिस्टमध्ये अशा शहरांना सामील करा, जिथे मुली मुक्तपणे फिरू शकतात आणि मजा करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया, कोणती आहेत ती शहरे…(Travel)
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/05/solo-trip-1024x768.jpg)
बेंगळुरू
बेंगळुरू हे आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. या शहराच्या आजूबाजूला फिरण्यासाठी बरेच काही आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या गर्ल गँगसोबत जाऊ शकता. बेंगळुरूमध्ये लाखो लोक नोकरीसाठी जातात. त्यामुळे येथील संस्कृती खूप वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही बेंगळुरूमध्ये मुक्तपणे फिरू(Travel) शकता.
पुणे
या यादीत महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. त्यापैकी एक पुणे देखील आहे. महाराष्ट्राची सामाजिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर मुलींसाठी सुरक्षित आहे. तुम्ही तुमच्या गर्ल गॅंगसोबत इथे आरामात फिरू(Travel) शकता. तसेच इथल्या संस्कृतीचा आनंद घ्यायला विसरू नका.
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/05/shaniwar-wada-pune-tourism-entry-fee-timings-holidays-reviews-header-1024x512.jpg)
=====
हे देखील वाचा – उन्हाळ्यात करायचंय डेस्टिनेशन वेडिंग, तर बजेटमध्ये बसतील भारतातील ‘हे’ हिल स्टेशन
=====
मुंबई
मुंबई खूप गजबजलेली आहे, पण तरीही हे शहर मुलींसाठी सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक आहे. जिथे तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत मनसोक्त हिंडू शकता. मुंबईत बघण्यासारखे खूप काही आहे. त्याचबरोबर जुहू चौपाटीवर मित्रांसोबत मस्ती करण्याची मजाही खूप असते. त्यामुळे तुम्ही गर्ल गँगसोबत मुंबई शहरात फिरण्याचा(Travel) प्लॅन बनवू शकता.
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/05/Gateway-monument-India-entrance-Mumbai-Harbour-coast-1-1024x683.jpg)
=====
हे देखील वाचा – आयआरसीटीसीचे खास पॅकेज! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरा शिमला आणि मनाली
=====