उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतात. या भेटींमध्ये प्रामुख्याने थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत तुम्हालाही थंड हवेच्या ठिकाणी फिरायचं असेल, तर आयआरसीटीसीचे ‘हे’ पॅकेज तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. (IRCTC Tour Package)
बहुतेक लोकांना उन्हाळ्यात उत्तरेकडच्या पर्वतरांगांना भेट द्यायला आवडतं. कारण या ठिकाणी हलकीशी थंडी असते. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी शिमला आणि मनाली ही ठिकाणे पर्यटकांची पहिली पसंती असते. तुम्हीही या उन्हाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर आयआरसीटीसीचे हे पॅकेज नक्की जाणून घ्या. इथे फिरणे, राहण्याची, तसेच जेवणाची सोय असेल.
पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा समाविष्ट असतील?
हे आयआरसीटीसी पॅकेज ७ रात्री आणि ८ दिवसांचे आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत इतक्या मोठ्या सहलीचा विचार करत असाल, तर या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती घ्या. या पॅकेजमध्ये राहण्याच्या सुविधेबरोबरच जेवणाचीही सोय आहे. तिकीट, व्हिडिओ कॅमेरा शुल्क, बोटिंग किंवा इतर शुल्क, अटल बोगद्यावरील वाहन शुल्क तसेच लॉन्ड्री, वाईन, टेलिफोन शुल्क, टिपिंग ड्रायव्हर, मार्गदर्शक यांचा समावेश या पॅकेजमध्ये करण्यात येत नाही. (IRCTC Tour Package)
कधी सुरू होणार प्रवास?
जर तुम्हाला हे पॅकेज घ्यायचे असेल, तर हे जाणून घ्या की हा प्रवास ९ मे २०२२ पासून सुरू होणार आहे. जो १६ मे पर्यंत चालणार आहे. यामध्ये ७ रात्री आणि ८ दिवसांच्या पॅकेजचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये सात ब्रेकफास्ट तसेच सात डिनरचा समावेश आहे. संपूर्ण ट्रिपमध्ये, तुम्हाला शिमला येथे दोन रात्री, मनालीमध्ये तीन रात्री तसेच चंदीगडमध्ये एक रात्र आणि दिल्लीमध्ये एक रात्र राहण्याची संधी मिळेल.
या सहलीसाठीचा भाडेखर्च एका व्यक्तीसाठी ५८,५७० रुपये आहे, तर जर तुम्ही कपल शेअरिंग बेसवर बुक केलं, तर प्रत्येक व्यक्तीचे भाडे ४२,७३० रुपये असेल. तर ट्रिपल शेअरिंग बुकिंग असेल, तर ४०,२२० रुपये प्रति व्यक्ती खर्च करावे लागतील. (IRCTC Tour Package)
७ रात्र आणि ८ दिवसांच्या पॅकेजचा संपूर्ण तपशील
- टूर पॅकेज ७ रात्री आणि ८ दिवसांचे असेल
- पॅकेजचे नाव- शिमला, मनाली, चंदीगड
- दिवस – ७ रात्र आणि ८ दिवसांचा टूर
- तारीख – ९ मे २०२२
- प्रवास मोड – फ्लाइट
- सकाळी ९.१५ वाजता कोची विमानतळावरून फ्लाइटचे प्रस्थान
तुम्ही ही टूर आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर ऑनलाइन बुक करू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला ऑनलाइन बुकिंग करायचे नसेल, तर तुम्ही पर्यटक सुविधा केंद्र किंवा प्रादेशिक कार्यालयांमधूनही ही टूर बुक करू शकता.