2022 हे वर्ष सिनेप्रेमींसाठी खूप खास आहे. या वर्षी अनेक छोटे-मोठे चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. दाक्षिणात्य अभिनेता अदिवी शेषचा आगामी चित्रपट ‘मेजर’चाही या यादीत समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे ‘मेजर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेक वेळा बदलण्यात आली होती आणि अखेरीस हा चित्रपट 27 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. आदिवी शेषने सोशल मीडियावर एक पोस्ट जारी केली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या चित्रपटाची नवीन तारीख जाहीर केली आहे.
या दिवशी हा चित्रपट होणार प्रदर्शित
आदिवी शेषने आपल्या चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले असून त्यासोबत त्याने चित्रपटाची नवीन रिलीज डेटही दिली आहे. या पोस्टरमध्ये तो मेजरच्या भूमिकेत दिसत आहे. पार्श्वभूमीवर युद्धाचे वातावरण असून अभिनेत्याच्या कपाळावर एक जखम आहे. चित्रपटात देशभक्तीने ओतप्रोत भरलेली अनेक दृश्ये पाहायला मिळणार असल्याचे या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने म्हटले आहे की, हा चित्रपट तेलगू व्यतिरिक्त हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये 3 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
====
हे देखील वाचा: दाक्षिणात्य ‘या’ अभिनेत्यावर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप, इंडस्ट्रीमध्ये हंगामा
====
आदिवी शेष अक्षय कुमारला देणार टक्कर
वेंकटेश आणि वरुण तेज स्टारर ‘F3’ हे आदिवी शेष यांच्या ‘मेजर’च्या रिलीज डेटमध्ये बदल होण्याचे कारण आहे. ‘F3’ 27 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे आणि ‘मेजर’च्या निर्मात्यांना थिएटरमध्ये ‘F3’शी टक्कर नको आहे आणि म्हणूनच त्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे. मात्र आता ‘मेजर’ची टक्कर अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाशी होणार आहे. अक्षय कुमारचा चित्रपटही 3 जूनला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
====
हे देखील वाचा: ‘अवतार’चा सिक्वेल येणार, लवकरच ट्रेलर होणार रिलीज
====
ही आहे चित्रपटाची कथा
आदिवी शेषाचा हा चित्रपट मेजर उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी देशसेवेसाठी स्वत:ला कसे पुढे केले आणि एक मजबूत मेजर बनले हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात उन्नीकृष्णन यांचे बालपणही दाखवण्यात येणार आहे, ज्याची झलक चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळाली. आदिवी सेश व्यतिरिक्त या चित्रपटात शोभिता धुलिपाला, सई मांजरेकर, प्रकाश राज, रेवती आणि मारली शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.