Home » आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनचा अनोखा विक्रम, नेटिझन्सनी केला कौतुकाचा वर्षाव…

आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनचा अनोखा विक्रम, नेटिझन्सनी केला कौतुकाचा वर्षाव…

by Team Gajawaja
0 comment
वेदांत माधवन (Vedaant madhavan)
Share

अभिनेता आर माधवन हा नेहमीच त्याच्या वेगळ्या भुमिकांमुळे चर्चेत राहिला आहे. बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये राहूनही माधवननं आपलं वेगळेपण जपलं आहे. यासोबतच माधवन, त्याचा मुलाग वेदांत माधवन (Vedaant madhavan) मुळेही अलिकडे चर्चेत राहिला आहे.  

बॉलिवूड स्टारची मुलं जशी पार्टीमध्ये व्यस्त असतात, तसाच हा वेदांतही एका कामात व्यस्त असतो. वेदांत पट्टीचा जलतरणपटू आहे. देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी सध्या वेदांत परिश्रम करतोय. वेदांतने त्याची ऑलिम्पिकसाठी तयारी किती कठोरपणे करतोय, याची पावती नुकतीच दिलीय.  (madhavan son olympic)

डेन्मार्कच्या कोपनहेगन येथे झालेल्या डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत वेदांतने देशासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. याच स्पर्धेत वेदांतने रौप्य पदकाचीही कमाई केली आहे. या सर्वांमुळे वेदांत माधवन (Vedaant madhavan) आणि आर. माधवन दोघांवरही अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे. 

‘थ्री इडियट्स’, ‘विक्रम वेधा’, ‘रॉकेट्री’, ‘रहेना है तेरे दिल में’, ‘तनु वेडस मनु’, ‘गुरु’ यासारख्या चित्रपटामधून माधवनने बॉलिवूड बरोबरच टॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही आर.माधवन परिचित आहे. तरीही या अभिनेत्यानं फिल्मी जगापासून आपल्या कुटुंबाला दूर ठेवले आहे. विशेषतः आपला मुलगा वेदांतबाबत माधवन अधिक जागृत आहे. 

वेदांत माधवन (Vedaant madhavan) हा माधवनचा मोठा मुलगा. पोहण्यात तरबेज असलेला वेदांत लहानपणापासून विविध स्पर्धेत भाग घेतो आणि विजयीही होतो. ऑलिम्पिंकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकण्यासाठी तो मेहनत घेतोय. आपल्या मुलाला साथ देत माधवनही काही महिन्यापूर्वी दुबईला शिफ्ट झाला. तिथे त्यांनं मुलासाठी स्वतंत्र कोच नेमला असून ऑलिम्पिकसाठी त्याचा सराव सुरू आहे. 

आता वेदांतने त्याचा सराव किती चांगला चालू आहे, याचा एक पुरावाच दिलाय. वेदांतनं कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये भारतासाठी प्रथम रौप्यपदक जिंकले आणि दुसऱ्याच दिवशी त्यानं सुवर्ण पदकावरही आपलं आणि आपल्या देशाचं नाव कोरलं आहे. वेदांतने 800 मीटर पुरुष फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.   

माधवन आपल्या मुलावर बेहद खुष असून त्यानं सोशल मिडीयावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.  गोल्ड!!! तुमच्या सर्व आशीर्वादाने आणि देवाच्या महानतेने विजयी मार्ग चालू आहे यासोबत त्यानं वेदांतचे प्रशिक्षक प्रदीप कुमार आणि भारतीय जलतरण महासंघाचे आभार व्यक्त केले आहेत.  

वेदांत महादेवच्या या यशाबद्दल त्याचे अनेकांनी कौतुक केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने  “एकदम आश्चर्यकारक मॅडी! हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. अभिनंदन माय डिअर @vedaantmadhavan  तुला खूप प्रेम आणि आशीर्वाद…” अशी प्रतिक्रिया माधवनच्या पोस्टवर केली आहे. तर सिकंदर खेर यांनी, “जय हिंद”, म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  

=====

हे देखील वाचा – रिव्हिलिंग ड्रेसमधून दिसला रिचा चड्ढाचा मादक आणि ग्लॅमरस अंदाज

=====

वेदांत महाजन (Vedaant madhavan) याने यापूर्वी मार्च 2021 मध्ये लॅटव्हियन ओपन स्विमिंग चॅम्पियन्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.   वेदांतने बेंगळुरू येथे झालेल्या ४७ व्या ज्युनियर नॅशनल ॲक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये चार रौप्य पदके आणि तीन कांस्यपदके अशी सात पदकांची कमाई केली होती.  

आता सोळा वर्षाचा वेदांत भारतातर्फे ऑलिम्पिंक स्पर्धेमध्ये खेळण्याचे स्वप्न बघतोय.  त्याचा हा चढता आलेख बघता त्याचे स्वप्न पूर्ण होईल, शिवाय तो भारतासाठी पदकही जिंकेल असा विश्वास माधवनच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.