Home » Health : ‘या’ आजारांवर ओव्याची पाने आहेत रामबाण उपाय

Health : ‘या’ आजारांवर ओव्याची पाने आहेत रामबाण उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

आपल्या सगळ्यांच्याच घरात फार पूर्वीपासूनच लहान मोठ्या आजारांसाठी कधीही डॉक्टरकडे जाण्याची पद्धत नाहीये. आपल्या घरातील किचनच आपल्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी सर्वात मोठे मेडिकल. प्रत्येक लहान मोठ्या आजारावरील रामबाण इलाज येथे नक्कीच सापडतो. आपल्या जेवणाची चव वाढवणाऱ्या सर्वच गोष्टी आपले आरोग्य राखण्यासाठी खूपच लाभदायी आहेत. असाच आपल्या स्वयंपाक घरातील अतिशय ओळखीचा आणि रोजच्या वापरातील पदार्थ म्हणजे, ‘ओवा’. घरात कधीही कोणाला पोटाशी संबंधित काहीही त्रास झाला की, लगेच ओवा खाण्यास दिल्या जातात. पोटाच्या सर्व तक्रारींवर अतिशय लाभदायक उपाय म्हणजेच ओवा. मात्र तुम्हाला माहित आहे का, की या ओवांसोबतच ओवांची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ही पाने खाल्ल्यानंतर अनेक त्रासांपासून आपली सुटका होते. (Health)

सकाळी उठल्यानंतर नियमित एक ओव्याचे पान चावून खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. ओव्याची हिरवी पाने खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला लोह मिळते. तसेच लोहासोबत आपल्या शरीराला फायबर, कॅल्शियम, जीवनसत्वे, प्रथिने हे देखील मिळते. ओव्याच्या पानांमुळे आपली पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते. उन्हाळ्यात या पानांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते. त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात. (Marathi)

ओव्याच्या पानांना कर्पूरवल्ली असे सुद्धा म्हंटले जाते. ही पाने केवळ शोभेसाठी नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा खजिना आहेत. ओव्याची पाने दिसायला जाड आणि आतून मऊ असतात. मागील अनेक पिढ्यांपासून आयुर्वेदात ओव्याच्या पानांचे सेवन केले जात आहे. अपचन, गॅस पोट फुगणं किंवा एसिडीटी इत्यादी समस्या उद्भवल्यास ओव्याच्या पानांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस बाहेर पडून जातो. याशिवाय तुम्ही ओव्याच्या पानांचा रस सुद्धा पिऊ शकता. (Todays Marathi Headline)

Health

ओव्याची पाने ही आपले वजन नियंत्रणात आणण्यास मदत करतात. ओव्याच्या पानांमध्ये फायबरचे, कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ओव्याची पाने खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातील चरबी नष्ट होण्यास मदत होते. तसेच ही पाने खाल्ल्यानंतर आपल्याला जास्त भूक लागत नाही. ओव्याची पाने खाल्ल्यानंतर आपलं पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे ओव्याचे पाने खाल्ल्यानंतर आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. ओव्याच्या पानांमुळे ॲनिमियाच्या आजारापासून देखील आपली सुटका होते. त्यामुळे जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर ओव्याचे पाने जरूर खा. (Social Updates)

ओव्याची पाने पाण्यात उकळून प्यायल्याने सर्दी, खोकला आणि दमा यासारख्या श्वसनाच्या समस्या दूर राहण्यास मदत होते. त्याच्या पानांची पेस्ट बनवून त्याचा वास घ्या. ओव्याच्या पानांमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात, जे दातदुखी, डोकेदुखी आणि शरीरदुखीपासून आराम देतात. यासाठी पाने बारीक करून त्याची पेस्ट दुखणाऱ्या भागावर लावा. पोटदुखी झाल्यास कोमट पाण्यात ओव्याची पाने आणि हिंग आणि काळे मीठ मिसळून प्यायल्याने त्वरित आराम मिळतो. (Top Trending Headline)

डिहायड्रेशन रोखण्यासाठी ओव्याची पाने खूप फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात उष्माघात आणि डिहायड्रेशनचा त्रास मोठ्या प्रमाणावर होतो. या त्रासामुळे अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते. ओव्याची पाने शरीराला थंडावा देतात आणि ते हायड्रेटेड ठेवतात. त्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे असतात, जे उष्णतेपासून संरक्षण करतात. ओव्याची पाने पाण्यात भिजवा आणि ते पाणी दिवसातून २-३ वेळा प्या. ओव्याच्या पानांमध्ये असलेले थायमॉल पोटात गॅस, फुगणे आणि आम्लता कमी करते. उन्हाळ्यात पचनक्रिया बिघडणे आणि अपचनाच्या समस्या निर्माण होतात. तेव्हा ही पाने आपल्या पचनसंस्थेला थंड करते आणि चयापचय सुधारते. ५-६ ओव्याची पाने पाण्यात उकळून ते पाणी कोमट असताना प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. ही चघळल्याने पोटाच्या समस्याही दूर होतात. (Top Stories)

=========

Summer Health Care : उन्हाळ्यात पोटाच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी रामबाण उपाय, मिळेल आराम

=========

ओव्याच्या पानांचा रस बनवून प्यायल्यास दोन दिवसात घशात साचून राहिलेला कफ बाहेर पडून जाईल. लहान मुलांसाठी ओव्याची पाने सुरक्षित मानली जातात. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि श्वसनमार्ग मोकळा करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. एवढेच नाही तर ही ओव्यांची पाने तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी माऊथ फ्रेशनर म्हणून काम करतात. रोज ओव्याची पाने चावल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. (Social News)

(टीप : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी दिली आहे. आम्ही या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.