नदी हा जमिनीवरून वाहणारा पाण्याचा नैसर्गिक आणि वाहता प्रवाह आहे. ही नदी गोड्या पाण्याचा मोठा स्रोत असून, शेवटी ती समुद्र किंवा तलावाला मिळते. नदीचा उगम पर्वतांवरील हिमनद्या किंवा झऱ्यांपासून होतो. नदी ही अनेक शतकांपासून मनुष्याचा प्रगतीचा महत्त्वाचा भाग आहे. नदीने कायम आपल्या पाण्याच्या आणि प्रवाहाच्या माध्यमातून माणसाला विविध टप्प्यांवर प्रगतीसाठी मदतच करत आली आहे. भारतातील नद्यांना तर धार्मिक महत्त्व देखील आहे.
भारतात नद्यांना जीवनदायनी सुद्धा म्हटले जाते. याच नद्यांच्या आजूबाजूला मनुष्याने विकास केला आहे. नद्या कायम पिण्याच्या पाण्यासाठी, सिंचनासाठी आणि वाहतुकीसाठी त्या जीवनरेखा ठरल्या आहेत. आज प्रत्येक शहरात, गावात आपल्याला किमान एकतरी नदी पाहायला मिळते. भारतात लहान मोठ्या अगणित नद्या आहेत. अशाच नद्या जगभरात देखील आहे. आज आपण जगातील सर्वात जुन्या नद्या कोणत्या ते जाणून घेऊया. (River)
फिंके नदी, ऑस्ट्रेलिया
फिंके नदीला स्थानिक लोक लारापिंटा म्हणतात. ही नदी मध्य ऑस्ट्रेलियातील एक अत्यंत प्राचीन नदी आहे, जिला जगातील सर्वात जुन्या नद्यांपैकी एक मानले जाते. सुमारे ३०० ते ४०० दशलक्ष वर्षांहून अधिक जुनी असलेली ही नदी डायनासोरच्या काळापूर्वीपासून अस्तित्वात आहे. हे उत्तर प्रदेश आणि दक्षिण ऑस्ट्रेलियातून वाहते. फिंके नदी वर्षभर वाहत नाही; ती बहुतांश काळ कोरडी असते आणि फक्त जोरदार पाऊस पडल्यावरच त्यात पाणी येते. (Marathi)
मेयुस नदी, युरोप
मेयुस नदी ही सुमारे ३४०-३२० दशलक्ष वर्षे जुनी आहे. या नदीने हर्सिनियन ओरोजेनी दरम्यान आर्डेनेस जंगलांना आकार दिला. मेयुस नदी ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे, जी फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड्समधून वाहते. अंदाजे ९५० किमी लांबीची ही नदी फ्रान्समधील लँग्रेस पठारावरून उगम पावते आणि उत्तर समुद्राला मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची व व्यापारउद्योगासाठी महत्त्वाची ही जलवाहिनी आहे. (Top Marathi Headline)

फ्रेंच ब्रॉड नदी, अमेरिका
फ्रेंच ब्रॉड नदी ही अमेरिका खंडातील, विशेषतः उत्तर कॅरोलिना आणि टेनेसी राज्यांमधून वाहणारी एक प्राचीन आणि अत्यंत महत्त्वाची नदी आहे. फ्रेंच ब्रॉड नदी ३४०-३२० दशलक्ष वर्षे. ही नदी उत्तरेकडे वाहते आणि ४,००० मैलपेक्षा जास्त प्रवाहक्षेत्राला पाणी पुरवते. ही नदी टेनेसी नदीची एक मोठी उपनदी असून, तिचा उगम ब्ल्यू रिज माउंटन्समध्ये होतो आणि ती नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहत जाऊन, अखेरीस होल्स्टन नदीला मिळून टेनेसी नदी तयार करते. (Marathi News)
न्यू रिव्हर, अमेरिका
न्यू रिव्हर गॉर्ज ही नदी ३२५-२६० दशलक्ष वर्षे जुनी आहे. ही नदी ॲपलाशियन पर्वतांना छेदून वाहते आणि अटलांटिक महासागर तयार होण्यापूर्वीपासून अस्तित्वात असावी असा अंदाज आहे. न्यू रिव्हर गॉर्ज हे अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया राज्यात स्थित एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आणि नैसर्गिक ठिकाण आहे, ज्याला २०२० मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. ही नदी जगातील सर्वात जुन्या नद्यांपैकी एक मानली जाते, जी त्याच्या निसर्गसौंदर्य, वन्यजीव आणि खोरं साठी ओळखली जाते. (Latest Marathi Headline)
राइन नदी, युरोप
राइन नदी ही जवळपास २४० दशलक्ष वर्षे जुनी आहे. ही नदी ट्रायसिक काळात तयार झाली असावी आणि ती आल्प्स पर्वतांपेक्षा जुन्या पर्वतरांगांना छेदून वाहते. राइन नदी ही मध्य आणि पश्चिम युरोपातील दुसरी सर्वात लांब आणि प्रमुख जलवाहतूक करणारी नदी आहे. सुमारे १,२३० ते १,३२० किमी लांबीची ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स मधून उगम पावून जर्मनी, फ्रान्स आणि नेदरलँड्समार्गे वाहत जाऊन उत्तर समुद्राला मिळते. (Top Stories)
सेव्ह नदी, दक्षिण आफ्रिका
सेव्ह नदी ही २०५ दशलक्ष वर्षे जुनी नदी असून, ही नदी गोंडवाना खंडाच्या विघटनादरम्यान तयार झाली आणि हिंदी महासागराला मिळते. सेव्ह नदी ही दक्षिण आफ्रिका खंडातील, प्रामुख्याने झिम्बाब्वे आणि मोझांबिक मधून वाहणारी एक प्रमुख आणि प्राचीन नदी आहे. प्राचीन काळी या नदीचा वापर हस्तिदंत, सोने आणि तांबे व्यापारासाठी धमन्या म्हणून केला जात असे. (Top Trending News)
नर्मदा नदी, भारत
नर्मदा ही भारतातील पाचवी सर्वात मोठी आणि पश्चिम वाहिनी नद्यांपैकी सर्वात लांब (सुमारे १३१२ किमी) नदी आहे. नर्मदा नदी १६० दशलक्ष वर्षे जुनी नदी असून, ही नदी पश्चिम वाहिनी असून एका रिफ्ट व्हॅलीतून वाहते आणि गोंडवाना खंडाच्या विघटनादरम्यान तयार झाली आहे. मध्य प्रदेशातील अमरकंटक पठारावरून उगम पावून ती खचदरीतून पश्चिमेकडे वाहत जाऊन गुजरातमध्ये अरबी समुद्राला (खंभातचे आखात) मिळते. मध्य प्रदेश व गुजरातची “जीवनरेखा” मानल्या जाणाऱ्या या नदीवर सरदार सरोवर धरण बांधले आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
