होळी आणि धूलिवंदन झाले की, वेध लागतात ते रंगपंचमीचे. महाराष्ट्रात किंवा भारतात होळीच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात धुलीवंदनाच्या दिवशीच रंग खेळला जातो. मात्र अनेक ठिकाणी आजही होळीनंतर पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळला जातो. अनेक लोकांच्या मते महाराष्ट्रामध्ये रंगपंचमीच्याच दिवशी रंग खेळला जातो. मात्र उत्तर भारताचे केले जाणारे अनुकरण येथे देखील थांबलेले दिसत नाही. उत्तर भारतात होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशीच रंग खेळला जातो, तसेच येथे सुद्धा आता हेच चित्र दिसत आहे. मात्र असे असेल तरी आजही महाराष्ट्र्रातील अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये रंगपंचमीलाच रंग खेळला जातो. (Marathi )
यंदा २ मार्च रोजी होलिका दहन झाल्यानंतर रंगपंचमी कधी आहे असा प्रश्न विचारला जात होता. तर २०२६ या वर्षी रंगपंचमीचा सण रविवार, ८ मार्च रोजी साजरी केली जाईल. रंगपंचमीचा सण चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी ही तिथी ७ मार्च, शनिवारी संध्याकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी सुरू होईल आणि ८ मार्च, रविवारी रात्री ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत राहील. पंचमी तिथीचा सूर्योदय ८ मार्च, रविवारी होणार असल्याने, त्याच दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जाईल. (Top Marathi News)
रंगपंचमीच्या दिवसाला “देवांची होळी” असेही म्हणतात. या दिवशी देव-देवतांना रंग आणि गुलाल अर्पण केले जातात. धार्मिक श्रद्धा अशी आहे की या दिवशी रंगांचा प्रभाव रज आणि तम चे गुण नष्ट करतो आणि सत्त्वचे सार वाढवतो. हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, जे पाचव्या दिवसापर्यंत चालू राहते. होळीचा उत्सव फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून सुरू होतो आणि चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला संपतो. रंगपंचमीच्या दिवशी होळीच्या सणाची समाप्ती होते. (Latest Marathi Headline)

रंगपंचमीच्या दिवसाची एक खास आख्ययिका देखील सांगितली जाते. आख्यायिकेनुसार, भगवान शिव यांनी त्यांचा तिसरा डोळा उघडल्यानंतर आणि कामदेवाला जाळले. त्यानंतर कामदेवाची पत्नी असलेल्या रतीने त्याच्या पुनरुत्थानासाठी प्रार्थना केली. कामदेवाचा पुनर्जन्म शरीरहीन स्वरूपात पंचमीच्या दिवशी झाला होता. हा आनंद साजरा करून देवतांनी रंगांचा उत्सव साजरा केला. अजून एक कथा रंगपंचमीची सांगितली जाते ती अशी, द्वापार युगात, राधा राणी आणि गोपींसोबत होळी खेळल्यानंतर, श्रीकृष्णाने पंचमी सण विशेष उत्सवात साजरा केला. ब्रज आणि इतर प्रदेशांमध्ये पंचमीला रंग खेळण्याची परंपरा अशा प्रकारे सुरू झाली. (Top Stories)
रंगपंचमीच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पारंपरिक ‘गैर’ काढली जाते. ‘गैर’ म्हणजे एक प्रकारची मिरवणूक. जशी आपल्याकडे पुण्या-मुंबईत गणेश विसर्जनाची मिरवणूक प्रसिद्ध आहे, तशीच इंदूरमध्ये रंगपंचमीची ‘गैर’ प्रसिद्ध आहे. या गैरचं आयोजन स्थानिक प्रशासनाकडूनच केलं जातं. विशेष म्हणजे, या मिरवणुकीत तब्बल ४ ते ५ लाख लोक सहभागी होतात. याच कारणामुळे या ‘गैर’ला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. सध्या ही ‘गैर’ इंदूर शहराची ओळख बनली आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
