एका वर्षात १२ महिने, एका महिन्यात ३० आणि वर्षाचे एकूण ३६५ दिवस असतात. हे सर्वांनाच माहिती आहे. असे असले तरी फेब्रुवारी महिन्यात केवळ २८ दिवसच असतात. इतर महिन्यांच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात कमी दिवस असतात, मात्र असे असण्यामागे नक्की कारण काय? फेब्रुवारी महिन्यात केवळ २८ आणि २९ दिवस असतात. दरम्यान, दर ४ वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिना २८ ऐवजी २९ दिवसाचा येतो. त्याला लीप ईयर असे संबोधले जाते. दर ४ वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात हा २९ वा दिवस कसा येतो? याचे कारण आज आपण जाणून घेऊया. (February)
रोमन साम्राज्यात कॅलेंडरची सुरुवात झाली. राजा नुमा पॉम्पिलियसने ७१५ ई.पू. १० महिन्यांचे कॅलेंडर बनवले. मार्चपासून वर्ष सुरू होत असे. फेब्रुवारी हा शेवटचा महिना होता. त्यावेळी वर्ष ३५५ दिवसांचे होते. पण हे सूर्याच्या चक्राशी जुळत नव्हते. म्हणून फेब्रुवारीला २७ किंवा २८ दिवस दिले जात. रोमन लोकांना फेब्रुवारी आवडत नव्हता, कारण तो मृत्यू आणि शुद्धीकरणाचा महिना मानला जाई. हे कॅलेंडर चंद्रावर आधारित होते, ज्यामुळे हंगाम आणि वर्ष जुळत नव्हते. जुलियस सीझरने यात बदल केले. (Marathi)
सूर्यावरुन पाहिले असता पृथ्वी ज्या नक्षत्र समुहावर असेल तेथेच ती सूर्याभोवती फेरी मारुन पुन्हा परत येण्यासाठी जो काळ लागतो त्याला नाक्षत्रवर्ष असे संबोधले जाते. त्या वर्षात ३६५.२५६४ दिवस असतात. पृथ्वीवरुन पाहिले असता सूर्य एकदा शरद किंवा वसंत संपात बिंदूपाशी आला, की पुन्हा त्याच ठिकाणी येण्यासाठी जो काळ लागतो त्याला संपातीय वर्ष असे संबोधले जाते. या वर्षात ३६५.२४२२ दिवस असतात. (Todays Marathi Headline)

पृथ्वीला सूर्याला संपूर्ण फेरी मारण्यासाठी ३६५ दिवस आणि सहा तास लावते आणि म्हणूनच प्रत्येक चार वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस वाढवून याचे संतुलन ठेवले जाते, या वर्षाला लीप ईयर असे म्हटले जाते. या सर्व गोष्टी पृथ्वी सूर्याला कशा पर्यंत प्रकारे फेरी मारते यावर अवलंबून असते आणि बाकी अन्य महिने किंवा ३१ दिवसाचे असून सुद्धा फेब्रुवारी महिना ॲडजस्ट करण्यासाठी फक्त २८ दिवस आणि काही तासच असतात म्हणून अशावेळी या महिन्याला ॲडजस्ट केले जाते गेले या कारणामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त २८ दिवस असतात आणि चार वर्षानंतर २९ दिवस येतात. (Top Marathi News)
फेब्रुवारी महिन्यात दिवस ऍडजेस्ट करण्यामागे सुद्धा विशिष्ट असे कारण आहे. सुरवातीला एका वर्षांमध्ये फक्त दहा महिने असायचे व वर्षाची सुरुवात मार्च महिन्यात व्हायची. त्याचबरोबर आता प्रमाणे तेव्हा ही वर्षाचा शेवट डिसेंबर महिन्यानेच व्हायचा. डिसेंबर नंतर ते मार्च महिना यायचा. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने जोडले गेले. वर्ष १५३ BC मध्ये जानेवारी महिन्याची सुरुवात केली गेली परंतु या आधी १ मार्च पासून वर्षाचा पहिल्या दिवसाची सुरुवात व्हायची.. (Latest Marathi Headline)
========
Vikram Samvat 2083: नव हिंदू वर्ष – रुद्र संवत्सर
========
त्याचबरोबर आधी वर्ष हा १० महिन्याचा असायचा तेव्हा महिन्याचे दिवस वर – खाली व्हायचे.जेव्हा मग नंतर वर्षांमध्ये दोन महिने जोडले गेले तेव्हा दिवसांना देखील त्याच पद्धतीने विभागले गेले अन् यामुळे फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस आले आणि ४ वर्षाच्या हिशोबानुसार २९ दिवस येऊ लागले तेव्हापासून ही परंपरा चालत आली त्याआधी सुद्धा कॅलेंडर मध्ये अनेक बदल करण्यात आले होते. (Top Trending Headline)
लियन कॅलेंडर आता वापरात नाही. या कॅलेंडरनुसार, प्रत्येक चौथ्या वर्षात एक दिवस मिळवला जातो. वर्षाला 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष मानले जावे. त्यात ३६६ दिवस असतील. मात्र १७००, १८०० या शतवर्षांना (सेंच्युरी ईयर) लीप वर्ष मानले जाऊ नये. शतवर्षाला ४०० ने भाग जातो ते लीप वर्ष मानले जावे. जसे की २०००, २४००. तसे पाहिले तर वर्षातील दिवसांची संख्या निश्चित करण्यासाठी दोन पद्धती आहेत. त्यामध्ये नाक्षत्र आणि संपातीय वर्षपद्धतीचा समावेश होतो. (Social News)
