Home » Holi : जाणून घ्या होळीच्या विविध रंगांचे महत्त्व

Holi : जाणून घ्या होळीच्या विविध रंगांचे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Holi
Share

होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळी, रंगांचा सण. या काळात सर्वत्र विविध रंगांची उधळण होत असते. सर्वच जणं या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. दरवर्षी फाल्गुन महिन्यात, पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे होते. यंदा होलिका दहन हा सण २ मार्च रोजी आला असून, धूलिवंदन हे ३ मार्च रोजी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने रंगांची उधळण करत साजरे केले जाणार आहे. धूलिवंदनाच्या दिवशी किंवा रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना रंग लावले जातात. लाल, हिरवा, निळा, पिवळा अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये प्रत्येक व्यक्ती न्हाऊन निघते. (Holi)

पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण आणि राधा यांनी होळीमध्ये रंग लावण्याच्या पद्धतीला सुरुवात केली. या कथेनुसार श्रीकृष्ण सावळे होते. तर राधा या गोऱ्या होत्या. मी सावळा का आहे? अशी तक्रार बाल श्रीकृष्ण त्यांच्या आई यशोदा यांना सतत करत असे. यशोदा मैय्याने तुझ्यासारखाच रंग राधेला लाव. त्यामुळे तुम्ही दोघेही एकसारखे दिसाल असा सल्ला दिला.आईच्या सल्ल्यानं खुश झालेला श्रीकृष्ण त्यांच्या मित्रासह राधाला रंग लावण्यास निघाले. श्रीकृष्ण आणि त्यांच्या मित्रांनी राधा आणि गोपीकांसोबत जोरदार रंग खेळले. त्यानंतरच मोठ्या उत्साहानं रंग खेळण्यास सुरुवात झाली. त्याला होळी असे म्हटले जाऊ लागले. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, होळीमध्ये आपण एकमेकांना जे विविध रंग लावतो त्यांना एक खास अर्थ असतो. तो रंग एका विशेष गोष्टीचे प्रतीक मानला जातो. मग कोणत्या रंगाला कोणता अर्थ असतो, चला जाणून घेऊया. (Festival)

लाल रंग
लाल रंग हा प्रेम, उत्कटता यांचे प्रतीक आहे. तसेच, वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टींचा विजय मिळवण्याचे देखील हे एक प्रतिक आहे. तो ऊर्जा, शक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानला जातो. (Todays Marathi Headline)

Holi

पिवळा रंग
पिवळा रंग हा शिक्षण, ज्ञान आणि आत्मज्ञान दर्शवणारा रंग आहे. तसेच हा सकारात्मकतेचेदेखील प्रतीक आहे. हा रंग वापरल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता येऊ शकते. याचा संबंध गुरू ग्रहाशी असल्याने गुरु ग्रहाचा शुभ प्रभाव वाढवतो. (Marathi News)

हिरवा रंग
हिरवा रंग सुसंवाद, वाढ आणि नवीन सुरुवात यांचे प्रतीक आहे. तसेच हिरवा रंग हा वसंत ऋतूची सुरुवात, नूतनीकरण आणि नवजीवनाच्या बहराचे प्रतिनिधित्व करते. (Top Marathi News)

निळा रंग
हिंदू धर्मात निळा रंग हा अनेकदा भगवा श्री कृष्ण किंवा प्रभू श्री रामाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. निळा रंग हा शांतात, प्रसन्नता या भावनांचे प्रतिनिधित्त्व करत असून; समुद्र आणि आकाशाच्या विशालतेचे / अथांगतेचे प्रतीक आहे. (Latest Marathi Headline)

केशरी रंग
केशरी हा एक अत्यंत उत्साही, चैत्यन्य आणि आनंदी असा रंग आहे. या रंग सूर्यापासून, उन्हापासून मिळणाऱ्या उबेचे प्रतीक आहे. तसेच केशीर रंग हा एक अत्यंत सकारात्मक आणि आशावादी रंग असल्याचेही आपण म्हणू शकतो. (Top Trending News)

========

Vikram Samvat 2083: नव हिंदू वर्ष – रुद्र संवत्सर

========

जांभळा रंग
जांभळा रंग हा श्रीमंती, समृद्धी, आलिशान जीवनाचे यांचे प्रतीक आहे. तसेच, कल्पनाशक्ती, अध्यात्मिक प्रबोधन यांचेही प्रतिनिधित्त्व जांभळा रंग करत असतो. (Top Stories)

गुलाबी रंग
मैत्री, प्रेम, आपुलकी यांचे प्रतीक म्हणजे गुलाबी रंग. तसेच गुलाबी रंग हा खेळकर नातेसंबंध आणि मैत्रीतील गोडवा यांचे प्रतिनिधित्वदेखील करते. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.