अनोख्या, ऐतिहासिक आणि सर्वोत्कृष्ट मंदिरांसाठी भारताची जगभर ओळख आहे. भारतामध्ये प्रत्येक देवी देवतांची एक किंवा एकापेक्षा अधिक अशी सुरेख आणि जुनी मंदिरं पाहायला मिळतात. आजवर आपण अनेक मंदिरांबाबत विविध प्रकारच्या आख्ययिका ऐकल्या आहेत. अनेक मंदिरांची रहस्य आजही आपल्याला चकित करतात. यातलेच एक अनोखे मंदिर म्हणजे, ‘शारदा देवी मंदिर’. सोशल मीडियावर सध्या या मंदिरासंदर्भात एक व्हिडिओ खूपच गाजत आहे. या व्हिडिओमध्ये या मंदिराचे वैशिष्ट्य सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. (Temple)
मध्यप्रदेशमधील सतना जिल्ह्यामधील शारदा देवीचे मंदिर हे शक्तीपीठांपैकी एक आहे. जेव्हा देवी सतीने दक्ष राजाच्या यज्ञांमध्ये आपला देह विलीन केला त्यानंतर भगवान शिवांना अतीव दुःख झाले. ते देवी सतीचे पार्थिव घेऊन संपूर्ण सृष्टीमध्ये फिरत शोक व्यक्त करत होते. त्यांचा शोक कमी करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या शरीराचे ५२ तुकडे केले. हे ५२ तुकडे पृथ्वीवरील विविध ठिकाणी फेकले गेले. जिथे जिथे हे तुकडे पडले ते ठिकाणं शक्तीपीठ म्हणून नावारूपास आले. याच ५२ शक्तिपीठातील एक शक्तीपीठ म्हणजे मध्यप्रदेशमधील सतना जिल्ह्यामधील शारदा देवीचे मंदिर. हे मंदिर भक्तांमध्ये अतिशय प्रसिद्ध असून, या मंदिरातील अनेक गोष्टी आजही लोकांना आश्चर्य चकित करतात. जाणून घेऊया याच मंदिराबद्दल. (Marathi)
तमसा नदीच्या काठावर त्रिकुटा पर्वतरांगाच्या मध्ये ६०० फूट उंचीवर असलेले हे मंदिर नैसर्गिकरित्या समृद्ध अशा कैमूर आणि विंध्य पर्वतरांगांच्या कुशीत वसले आहे. हे शारदादेवी मंदिर इच्छापूर्ती म्हणूनही प्रसिद्ध आहे. मैहर म्हणजे माईचा हार. देवी सतीचा हार या ठिकाणी पडल्याची गाथा सांगण्यात येते, त्यामुळेच मैहर देवी शारदा मंदिर देवीच्या ५२ शक्ती पिठांपैकी एक आहे. या मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका म्हणजे मंदिराचे दरवाजे रात्री बंद केल्यावर येथे शारदा देवीचे परमभक्त येऊन देवीची आरती आणि पूजा करतात अशी धारणा आहे. सकाळी मंदिर उघडल्यावर देवीवर ताजी फुले मिळतात. त्यामुळेच अत्यंत जागृत शक्तीस्थळ म्हणून शारदा देवी मंदिराची ओळख आहे. (Todays Marathi Headline)

मध्यप्रदेशच्या सतना जिल्ह्यातील मैहर तालुक्याच्या जवळ त्रिकूट पर्वतावर असलेल्या या शारदादेवी शक्तीपीठ मंदिरात जाणं म्हणजे भाविकांची परीक्षा असते. मंदिरात जाण्यासाठी १०६५ पायऱ्या चढाव्या लागतात. पूर्ण भारतात शारदा मातेचे हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. या भागातील दोन वीर बंधू आल्हा आणि ऊदल यांनी या मंदिराचा शोध घेतला. आल्हा यांनी याच स्थानावर १२ वर्षे शारदादेवीची तपस्या केली. देवी शारदा प्रसन्न झाली आणि त्यांना अमर होण्याचे वरदान दिले. (Top Marathi News)
असेही म्हटले जाते की आल्हा आणि उदल यांनी त्यांची जीभ कापली होती आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी त्यांना अर्पण केले होते. मग देवी तिच्या भक्तीवर प्रसन्न झाली आणि जीभ पुन्हा जोडली. ही शारदा मातेची मुर्ती विक्रम संवत ५५९ मध्ये असल्याचे बोलले जाते. मैहर पर्वताचा उल्लेख काही ग्रंथामध्ये महेंद्र पर्वत असाही करण्यात आला आहे. शारदादेवी मंदिर, आणि त्याचे प्राचीन महत्त्व सांगणारे अनेक शिलालेखही या परिसरात आढळतात. या भागात आलेल्या प्रत्येक राजांनी मंदिरात सुधारणा केली. बांधकाम केले. त्यामुळे अत्यंत प्राचीन इतिहास असूनही मंदिर आजही अत्यंत देखणे आणि प्राचिन स्थापत्यकेलेची साक्ष देणारे आहे. (Latest Marathi Headline)
या मंदिराबाबत सर्वात प्रचलित आख्यायिका सांगितली जाते ती बुंदेलखंण्ड येथील महोबामधील बीर योद्धे आल्हा यांची. जगनिक नावाच्या एका कवींनी आल्हाखण्ड नावचे एक काव्य लिहिले आहे. हे काव्य येथे पोवाड्यासारखे गायले जाते. त्यातून आल्हा यांच्या वीरतेची आणि शारदा देवीवरील त्यांच्या भक्तीची गाथा भक्तांना समजते. वीर आल्हा यांना शारदा देवीचा आशीर्वाद मिळाला होता. त्यांनी पृथ्वीराज चौहान यांनाही एका युद्धात पराभूत केले होते. तब्बल ५२ युद्ध त्यांच्या नेतृत्वात झाली आणि त्यात आल्हा विजयीही झाले. हे आल्हा आजही अदृश्य रुपाने मंदिरात येतात, ब्रह्म मुहूर्तावर देवीची पुजा करतात, अशी धारणा या भागात आहे. मैहर येथील या शारदा मंदिरात जाण्यासाठी भक्तांना १०६५ पायऱ्या चढाव्या लागतात. खास बाब म्हणजे या पायऱ्यांपैकी पहिल्या ४८५ चढतांना फार दमछाक होत नाही. मात्र दुसऱ्या वळणावरील २३२ पायऱ्या चढतांना दमछाक होते. (Top Stories)
========
Narsimha Dwadashi : नरसिंह द्वादशी का साजरी केली जाते?
=========
शारदा देवी मंदिरापर्यंत सहजपणे जायचे असेल, तर रोपवेचीही व्यवस्था आहे. या रोप वे मधून मंदिरात गेल्यास संपूर्ण पर्वताचे सुंदर दृष्य बघता येते. सकाळी सात ते सायंकाळी सातवाजेपर्यंत ही रोपवेची सेवा चालू असल्यामुळे मंदिरात सायंकाळीही मोठी गर्दी असते. मैहर मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर पन्नी नावाचा मोठा धबधबा आहे, हा परिसर अत्यंत सुंदर असल्यामुळे पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते. बडा अखाडा मंदिर हे सुद्धा भाविकांसाठी आकर्षणाचे स्थळ आहे. भगवान शंकराच्या या मंदिरात १०८ शिवलिंग आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
