Home » Marathi : मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यात नेमका फरक काय?

Marathi : मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यात नेमका फरक काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Marathi
Share

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. कुसुमाग्रजांच्या कार्याला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या निधनानंतर त्यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतामध्ये मराठी लोकसंख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Marathi)

मराठी ही भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून, तिचा इतिहास सुमारे २००० वर्षांहून अधिक जुना आहे. तिचा मूळ आविष्कार प्राकृत भाषांपासून झाला आहे. मराठी ही अतिशय श्रीमंत आणि समृद्ध भाषा समजली जाते. कुसुमाग्रज यांची आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे मराठी साहित्यिक होते. त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा होतो. तर १ मे दिवस हा ‘मराठी राजभाषा दिन’ किंवा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन या दोन दिवसांमध्ये नेमका फरक काय आहे? (Top Marathi News)

मराठी भाषा गौरव दिन
मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या वाढदिवसांनिमित्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. शासन निर्णयानुसार, कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेतला होता. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४७ नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून घोषित करण्यात आला आहे. २०१४ मध्ये पहिल्यांदा २७ फेब्रुवारी रोजी “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला होता. (Latest Marathi Headline)

=======

Senior Citizen Law : आई­बापांची काळजी न घेतल्यास मुलाला घरातून काढता येईल?

=======

मराठी राजभाषा दिन
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० ला होऊनही राज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला नव्हता. त्यामुळं वसंतराव नाईक सरकारने मराठी राजभाषा अधिनियम १९६४ मांडून तो ११ जानेवारी १९६५ ला जाहीर केला. त्या अधिनियमानुसार मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असेल, असं त्यांनी १ मे राजी जाहीर केले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्याच्या निर्मितीनंतर राज्यातील कामकाज करण्यासाठी अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली. त्यामुळेच १ मे हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ किंवा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा कऱण्यात येतो. या संदर्भात ११ जानेवारी १९६५ मध्ये अधिसूचना काढण्यात आली. मात्र, याच दिवशी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असल्याने ‘मराठी राजभाषा दिन’ याच्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर राज्य सरकारने १० एप्रिल १९९७ मध्ये पुन्हा शासन निर्णय काढून ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याचे जाहीर केले. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.