Home » Holashtak : होळीच्या आधी येणारे होलाष्टक म्हणजे काय? ते अशुभ का मानले जाते?

Holashtak : होळीच्या आधी येणारे होलाष्टक म्हणजे काय? ते अशुभ का मानले जाते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Holashtak
Share

हिंदू सणांमधील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणून होळी या सणाची ओळख आहे. होळी केवळ रंग खेळणे नव्हे तर या दिवशी होलिका दहन देखील केले जाते. या होलिका दहनामध्ये आपल्यातील दुर्गुण, वाईट गोष्टींना जाळून नवीन सुरुवात करण्याचा संकल्प केला जातो. असा सर्वत्र आनंद आणि उत्साहाची उधळण करणारा होळीचा सण सगळ्यांच्याच आवडीचा आहे. या सणाची तयारी होळीच्या काही दिवस आधीच सुरु होते. होळीला हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी नवीन गोष्टींची खरेदी देखील केली जाते. असे असले तरी एक गोष्ट नक्की आहे, या होळीच्या सणाच्या आठ दिवस आधी पासून सुरु होते होलाष्टक. हे होलाष्टक अशुभ मानले जाते. मग हे होलाष्टक नक्की काय असते? होलाष्टक अशुभ का समजले जाते? होलाष्टक कधी सुरु होते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आज या लेखातून जाणून घेऊया. (Holashtak)

धार्मिक श्रद्धेनुसार, होळीच्या आधीचे आठ दिवस खूप धोकादायक मानले जातात. होलाष्टकापासून ते होलिका दहनपर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. होळीच्या तिथीची मोजणी होलाष्टाकाच्या आधारे केली जाते, अशी मान्यता आहे. असे म्हटले जाते की या काळात नकारात्मक शक्तींची ऊर्जा वाढते. या काळाला होलाष्टक म्हणतात. होळीच्या आठ दिवस आधी हा काळ सुरू होतो आणि या काळात कोणतेही शुभ किंवा नवीन काम केले जात नाही. या वर्षी होलाष्टकाची सुरुवात २४ फेब्रुवारी २०२६ पासून होणार आहे. हे होलाष्टक होळीच्या दुसऱ्या दिवळी ३ मार्च रोजी संपणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार होलाष्टकाची कथा ही हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांच्याशी जोडली गेली आहे. (Marathi)

होलाष्टकचे वर्णन पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळात भगवान विष्णूचे दोन महान भक्त होते, प्रल्हाद आणि हिरण्यकशिपूची बहीण होलिका. होलाष्टकच्या या आठ दिवसांत प्रल्हादचे वडील हिरण्यकशिपू यांनी त्यांचा मुलगा प्रल्हादला विविध प्रकारचे छळ केले. शेवटच्या दिवशी, हिरण्यकशिपूने त्याची बहीण होलिकेला प्रल्हादासोबत अग्नीत बसण्यास सांगितले, परंतु होलिका जळाली, परंतु प्रल्हाद वाचला. म्हणूनच शास्त्रांमध्ये हे आठ दिवस अशुभ मानले जातात. (Todays Marathi Headline)

Holashtak

फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेले होलाष्टक होलिकादहनापर्यंत सुरू राहते. यामुळे उद्यापासून होलाष्टक प्रारंभ होणार असून, धर्मशास्त्रात वर्णन केलेले १६ संस्कार या होलाष्टकाच्या काळात केले जात नाही. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करणे किंवा १६ संस्कार करणे या कालावधीत अशुभ मानले जाते. अनेक ठिकाणी होलाष्टक सुरू झाल्यापासून रस्त्यांवर ठिकठिकाणी परंपरा स्वरूप होलिका दहन केले जाते. तेथे गंगाजल शिंपडून प्रतीक म्हणून दोन लाकडाच्या काठ्या स्थापित केल्या जातात. एक काठी होलिका आणि दुसरी काठी भक्त प्रल्हाद स्वरुप मानली जाते. यानंतर येथे लाकूड आणि कंडे लावले जातात. याचे होळीच्या दिवशी दहन केले जाते, यालाच होलिका दहन म्हणतात. (Top Marathi News)

होलाष्टकाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारीला फाल्गुन शुक्ल अष्टमीला चंद्राची ऊर्जा सर्वाधिक असते. दुसऱ्या दिवशी नवमीला सूर्याची ऊर्जा प्रबळ असते. तिसऱ्या दिवशी दशमीला शनीची ऊर्जा अधिक असते. चौथ्या दिवशी एकादशीला शुक्र ग्रहाची ऊर्जा प्रभावी असते. पाचव्या दिवशी द्वादशीला गुरुची शक्ती सर्वोच्च असते. सहाव्या दिवशी त्रयोदशीला बुध ग्रहाची ऊर्जा उग्र असते. सातव्या दिवशी चतुर्दशीला मंगळाची ऊर्जा सर्वाधिक असते. आठव्या दिवशी फाल्गुन शुक्ल पोर्णिमेला राहू आणि केतूची ऊर्जा प्रबळ असते. यासर्व ग्रहांची नकारात्मकता कमी करण्यासाठी याकाळात त्यांची शांती केली जाते. (Latest Marathi Headline)

=======

Ekadshi : भगवान शिवांना समर्पित असलेल्या एकमेव अशा रंगभरी एकादशीचे महात्म्य

=======

पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये होलाष्टकाचा प्रभाव सर्वाधिक असतो. येथे या ८ दिवसांत शुभ कार्यांवर पूर्णपणे बंदी असते. असे मानले जाते की या काळात ग्रह ‘उग्र’ स्वरूपात असतात. महाराष्ट्रात होलाष्टकाचा प्रभाव उत्तर भारतासारखा तीव्र नाही. आपल्याकडे पंचांगानुसार मुहूर्त असल्यास काही कार्ये केली जातात, मात्र तरीही अनेक लोक सावधगिरी म्हणून या काळात नवीन वस्तू खरेदी करणे किंवा मोठे व्यवहार टाळतात. (Top Stories)

होलाष्टक दरम्यान गरीब आणि गरजूंना धान्य, कपडे आणि पैसे दान करा. असे केल्याने तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल. होलाष्टकात पूजा आणि जप करा. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. होलाष्टकात विष्णु सहस्रनाम, हनुमान चालीसा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा. होलाष्टकात पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.