फाल्गुन शुद्ध येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते. आमलकी एकादशी एकादशीलाच रंगभरी एकादशी असेही म्हटले जाते. ही एकादशी येत्या शुक्रवारी, २७ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. रंगभरी एकादशीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०६.४८ वाजता सुरू होईल आणि ११.०८ पर्यंत राहील. होळीच्या सणादरम्यान येणारी ही एकादशी विशेष मानली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याचीही परंपरा आहे. रंगभरी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाही, त्यांनी आवळ्याचे सेवन केले पाहिजे. (Ekadshi)
रंगभरी एकादशीच्या या पवित्र व्रतामुळे विष्णुलोकाची प्राप्ती होते असे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूची त्यांच्या परशुराम रूपात पूजा केली जाते. पद्म पुराणानुसार, या तिथीला भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला, ज्यापासून आवळा या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला. त्याच्या मुळात विष्णू, त्याच्या वर ब्रह्मा, खोडात रुद्र, फांद्यांत ऋषी, पानांमध्ये देव, डहाळीत वसू, फुलांत मरुदगन आणि फळांत सर्व प्रजापती वास करतात. त्यामुळे आवळा भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. (Amlaki Ekadshi)
आमलकी एकादशी एक २४ एकादशींपैकी एक महत्त्वाची एकादशी मानली जाते. मुख्य म्हणजे सर्वच एकादशी या भगवान विष्णूंना समर्पित असताना ही एकमेव एकादशी भगवान शंकर यांना समर्पित आहे. त्यामुळेच या एकादशीचे महत्त्व जरा जास्तच वाढते. या दिवशी भगवान विष्णू आणि शिवची पूजा आणि उपवास करण्यासोबतच इतर काही उपाय करावे. या दिवशी दान केल्याने किंवा इतर काही उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी कोणते उपाय करावे. (Marathi)
– आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन रात्री तेथे दिवे लावावेत आणि रात्री जागरण करून हरि कीर्तन करावे. याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन हजारो यज्ञ व यज्ञांचे फळ प्राप्त करतो. (Todays Marathi Headline)

– आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला स्पर्श करून प्रदक्षिणा घालाव्यात आणि शक्य असल्यास त्याखालील ब्राह्मणांना भोजन द्यावे. असे केल्याने मिळणारे पुण्य हे सर्व तीर्थक्षेत्री जाऊन आणि सर्व प्रकारचे दान देऊन मिळणाऱ्या पुण्यपेक्षाही मोठे असते.
– भगवान विष्णूंना आवळा हे फळ खूप आवडीचे आहे. रंगभरी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी तुम्ही आवळ्याचे दान करा. कारण आवळ्याचे दान केल्याने तुमचे आरोग्य सुधारते. जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्यासोबतच तुम्हाला सौभाग्य सुद्धा प्राप्त होते. (Top Marathi News)
– व्यवसायाशी संबंधित कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी एकादशीला आवळ्याचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या. तर नोकरीत चांगला बदल किंवा संधी हवा असल्यास एकादशीच्या दिवशी तुम्ही दामोदर मंत्र ‘ओम दामोदराय नमः।’ चा १०८ वेळा जप करावा.
– कौटुंबिक संबंध सुधारायचे असतील तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या ‘ओम नमो भगवते नारायणाय’ मंत्राचा १०८ वेळा जप करावा. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी ब्राह्मणाला पिवळे वस्त्र भेट द्या आणि त्याच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. (Latest Marathi Headline)
– ज्यांना आपला इच्छित जीवनसाथी मिळवायचा आहे किंवा लग्नाला उशीर होत आहे त्यांनी अमलकी एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूची पूजा करावी. भगवान विष्णूला आवळा अर्पण करा. यामुळे विवाहाची शक्यता निर्माण होईल आणि विवाह लवकर होऊ शकतो.
– वैवाहिक जीवनात अशांतता असल्यास पती-पत्नीने मिळून आमलकी एकादशीचे व्रत करावे. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. आवळा फळाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे वैवाहिक जीवन सुखी होईल. (Marathi News)
– आमलकी एकादशीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी अन्नदान करतो त्या व्यक्तीला गायीच्या दाना इतके पुण्य मिळते. तसेच घरात धन आणि समृद्धी वाढते.
========
Dhulivandan : होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदनाचे महत्त्व
========
– आमलकी एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करावेत. हे दान खूप शुभ मानले जाते. एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच आमलकी एकादशीच्या दिवशी गरजूंना पैसे आणि कपडे दान करावेत. या देणगीतून तुम्हाला निश्चितच आर्थिक फायदा होतो. यासोबतच घरातून नकारात्मक ऊर्जाही निघून जाते. या एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. यामुळे घरात सुख आणि शांती येते. याशिवाय, गुरु ग्रह देखील बलवान होतात. (Top Stories)
– आमलकी एकादशीच्या दिवशी दान, जप आणि तपश्चर्या या सर्व गोष्टी अक्षय असतात, म्हणजेच त्यांचा कधीही क्षय होत नाही. भविष्य, स्कंद, पद्म आणि विष्णू पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि आवळा वृक्षाची पूजा केली जाते. पूजेनंतर या झाडाच्या सावलीत बसून भोजन केले जाते. असे केल्याने सर्व प्रकारचे पाप आणि रोग दूर होतात. (Social News)
(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
