Home » Ekadshi : भगवान शिवांना समर्पित असलेल्या एकमेव अशा रंगभरी एकादशीचे महात्म्य

Ekadshi : भगवान शिवांना समर्पित असलेल्या एकमेव अशा रंगभरी एकादशीचे महात्म्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ekadshi
Share

एकादशी म्हणजे भगवान विष्णू यांच्या पूजेचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी भगवान विष्णू यांची अतिशय मनोभावे पूजा केली जाते. एका महिन्यात दोन अशा वर्षात २४ एकादशी येतात. मुख्य म्हणजे प्रत्येक एकादशीचे नाव, महत्त्व वेगळे आहे. अनेक लोकांना फक्त आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशीच माहिती असतात. मात्र याव्यतिरिक्त इतर २२ एकादशी देखील अतिशय महत्त्वाच्या असतात. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी रंगभरी एकादशी देखील खूप महत्त्वाची मानली जाते. ही एकादशी आमला एकादशी किंवा आमलकी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. रंगभरी एकादशीला भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. (Ekadashi)

फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२.३३ वाजता होणार आहे. ही तिथी २७ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३२ वाजता संपेल.  उद्यतिथीनुसार रंगभरी एकादशी शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. रंगभरी एकादशीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०६.४८ वाजता सुरू होईल आणि ११.०८ पर्यंत राहील. होळीच्या सणादरम्यान येणारी ही एकादशी विशेष मानली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याचीही परंपरा आहे. रंगभरी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. (Marathi News)

सामान्यपणे एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. परंतु ही एकमेव एकादशी आहे जी भगवान शंकराशी संबंधित आहे. म्हणूनच काशी विश्वनाथ वाराणसीमध्ये या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, रंगभरी एकादशीच्या दिवशी, लग्नानंतर प्रथमच भगवान शिव माता पार्वतीसोबत आपल्या नगरी काशीला आले. त्यानंतर शिवगण व भक्तांनी माता पार्वती व विश्वनाथ यांचे गुलालाची उधळण करून स्वागत केले. (Todays Marathi HEadline)

Ekadshi

तेव्हापासून दरवर्षी रंगभरी एकादशीला काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. त्यांना गुलाल अर्पण केला जातो. त्यामुळे रंगभरी एकादशीला लाल गुलाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कशी विश्वनाथ आणि माता पार्वतीला संपूर्ण शहरात फिरवले जाते आणि लाल गुलाल आणि फुलांनी त्यांचे स्वागत केले जाते. रंगभरी एकादशीला काशी विश्वनाथ मंदिरात विशेष पूजेचे आयोजन होते. रंगभरी एकादशीच्या दिवसापासून वाराणसीमध्ये रंगांचा उत्सव सुरु होतो. तो सलग सहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. (Latest Marathi News)

धार्मिक मान्यतेनुसार, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आमलकी, रंगभरी किंवा आवळा एकादशी म्हणूनही साजरी केली जाते. ब्रह्मांड पुराणानुसार या दिवशी विष्णूसह आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. तसेच या दिवसी आवळ्याने स्नान करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, एकादशीला सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर पाण्यात गंगाजलाचे सात थेंब, एक चिमूटभर तीळ आणि एक आवळा टाकून त्या पाण्याने स्नान करावे. या पवित्र स्नानाने कळत-नकळत केलेली सर्व पापे नष्ट होतात. यासह आवळा सेवनाने आजार बरा होतो. तसेच या दिवसापासून बनारसमध्ये देव विश्वनाथांना होळी खेळून उत्सव सुरू होतो. (Top Marathi Headline)

पद्म आणि विष्णू धर्मोत्तर पुराणानुसार, विष्णूला तुळशीच्या रोपाप्रमाणेच आवळ्याचे झाड देखील प्रिय आहे. आवळा वृक्षात श्री हरी विष्णूसोबत देवी लक्ष्मीही वास करते. त्यामुळे आमलकी एकादशीच्या दिवशी लोक आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णूची पूजा करतात. तसेच या दिवशी आवळा दान केल्याने १००० गायी दान केल्याचे तसेच सर्व यज्ञांचे फळ मिळते. या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. (Social Updates)

रंगभरी एकादशी पूजा पद्धत
सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून निवृत्त व्हावे. घरातील मंदिरात दिवा लावावा. भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करा. भगवान विष्णूला फुले आणि तुळशीची अर्पण करा. भगवान शंकर आणि माता पार्वतीला पाण्याने अभिषेक करा. शक्य असल्यास या दिवशीही व्रत ठेवावे. देवाची पूजा करा. देवाला अन्न अर्पण करा. भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे ध्यानात ठेवा. भगवान विष्णूच्या भोगामध्ये तुळशीचा समावेश करावा. तुळशीशिवाय भगवान विष्णू भोग ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते. या पवित्र दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा करा. या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करावे. (Top Marathi News)

Ekadshi

रंगभरी एकादशी व्रत कथा
असे म्हटले जाते की पहिली होळी भगवान शिव आणि माता पार्वती यांनी काशीमध्ये खेळली होती, कैलास पर्वतावर नाही. खरं तर, जेव्हा भगवान शिव पहिल्यांदाच माता पार्वतीला काशीला घेऊन आले तेव्हा सर्व गणांनी त्यांचे गुलाल आणि अबीरने स्वागत केले. एकादशीला गुलाल आणि अबीर उधळून भगवान शिव आणि माता पर्वताची पूजा केली जात असे. म्हणूनच या एकादशीला रंगभरी असे नाव देण्यात आले. (Latest Marathi Headline)

माहितीनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते, परंतु लग्नानंतर माता पार्वती तिच्या सासरच्या घरात, कैलासमध्ये व्यस्त होती. एके दिवशी भगवान शिव यांनी माता पार्वतीला काशीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या दिवशी भगवान शिव यांनी पहिल्यांदा देवी पार्वतीला काशीत प्रवेश दिला. भगवान शिव आणि माता पार्वती यांनी एकत्र होळी खेळली. जरी होळीशी याचा काहीही संबंध नाही, तरीही ही एकादशी रंगांशी संबंधित आहे. रंगभरी एकादशीपासून बनारसमध्ये होळीचा महान उत्सव सुरू होतो. (Top Trending News)

यासोबतच माता पार्वतीचा गौण सोहळा देखील रंगभरी एकादशीच्या दिवशी झाला अशी एक पौराणिक कथा आहे. गौण म्हणजे लग्नानंतर मुलगी तिच्या आईवडिलांच्या घरातून तिच्या पतीच्या घरी राहण्यासाठी येते. गौण नंतर जेव्हा माता पार्वती भगवान शिवासोबत कैलासला जात होत्या, तेव्हा वाटेत तिने काशीला जाण्याची इच्छा व्यक्त केली. भगवान शिव यांनी माता पार्वतीची इच्छा पूर्ण केली आणि काशीला घेऊन गेले. रंगभरी एकादशीच्या दिवशी शिव-शक्तीची पूजा केल्याने आणि ही व्रतकथा ऐकल्याने वैवाहिक जीवन आनंदी होते असे मानले जाते. (Top Stories)

========

Baidyanath Dham : ‘खरे स्थान’ कुठे? देवघर का महाराष्ट्र-हिमाचल? ज्योतिर्लिंग ठिकाणावादाची चर्चा आणि पुरातन मान्यता

Chardham Yatra : भाविकांकडून नोंदणी शुल्क आकारणार आणि कधीपासून लागू?

========

यासोबत अशी देखील आख्ययिका आहे की, पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाचा जन्म भगवान विष्णूच्या नाभीतून झाला होता. एकदा ब्रह्माजींनी स्वतःला जाणून घेण्यासाठी परब्रह्माची तपश्चर्या सुरू केली. त्यांच्या भक्तिमय तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले. नारायणाला पाहताच ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याचे अश्रू नारायणाच्या चरणी पडत होते. असे म्हणतात की विष्णूच्या पाया पडल्यानंतर त्या अश्रूंचे रूपांतर आवळ्याच्या झाडात झाले होते. (Social News)

(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.