Home » Shiv Jayanti : आत्मविश्वास आणि लढण्याची उमेद देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti : आत्मविश्वास आणि लढण्याची उमेद देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shiv Jayanti
Share

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध उत्सव आहे. दरवर्षी १९ फेब्रुवारी ला महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे शिव जयंती साजरी केली जाते. हा दिवस मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. स्वराज्याचे बाळकडू घेतलेल्या महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षीच रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून “हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा” असे म्हणत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी जे कर्तृत्व गाजवले ते इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिले गेले. (Shiv Jayanti)

काय माझ्या राजाचे कार्य होते जिथे लोकांचा एक वाढदिवस, एक जयंती लोकांना नीट लक्षात राहत नाही तिथे महाराजच्या दोन दोन जयंत्या अतिशय जल्लोषात, उत्साहात साजऱ्या होतात. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शूर, पराक्रमी नव्हते सोबतच ते अतिशय विचारी होते. त्यांचे विचार कायमच मावळ्यांना, सामान्य लोकांना प्रेरणा द्यायचे. शेकडो वर्षांनी आजही महाराजांचे विचार आपल्याला प्रेरणा देत आहे. इतिहासकार कायम सांगत आले आहे. आज शिव जयंतीच्या निमित्ताने आपण महाराजांचे अमूल्य विचार जाणून घेऊया. (Marathi)

“शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो.”

“जेव्हा जिंकणं हेच ध्येय असतं, तेव्हा अविरत मेहनत आणि अगणित किंमत मोजावी लागतेच”

“प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेनं टाकलेलं एक छोटं पाऊल मोठे ध्येय साध्य करतं.”

“जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगारासारखे दिसतात.” (Social Updates)

‘कोणतंही काम करण्यापूर्वी परिणामांचा विचार करा, कारण भावी पिढी त्याच गोष्टींचं अनुसरण करते.”

“जो माणूस काळाच्या दुष्ट वर्तुळातही आपल्या कामात संपूर्णपणे गुंतलेला असतो, त्याच्यासाठी वेळ स्वतःच बदलतो”

“शत्रूला कमकुवत समजू नका, पण त्याला खूप बलवान समजून घाबरू देखील नका.”

“जेव्हा ध्येय जिंकण्याचे असते, तेव्हा ते साध्य करण्यासाठी कितीही कठोर परिश्रम किंवा किंमत मोजावी लागली तरी ते मोजावेच लागते.”

“कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करणे फायदेशीर आहे; कारण आपल्या भावी पिढ्या फक्त त्याचेच अनुकरण करतात.”

“स्वतंत्रतेचा आनंद घ्यायचा असेल, तर स्वतःला शिस्तीत ठेवणे शिका”

“ज्यांचे विचार मोठे असतात, त्यांनाच मोठी फळे मिळतात” (Top Stories)

“एखाद्या झाडावर जो फळ देतो, त्याच्यावरच दगड मारले जातात; राजा म्हणून मी झाडापेक्षा जास्त क्षमाशील असावे”

========

Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ; ‘हे’ होते महाराजांचे अष्टप्रधान

Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची माहिती

========

“प्रत्येक लढाईचे काळजीपूर्वक नियोजन आणि योग्य रणनीती आखणे हे यशाचे रहस्य आहे”

“एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असेल तर तो आपल्या धाडसाने संपूर्ण जगावर विजयी पताका फडकवू शकतो.”

“जो माणूस काळाच्या प्रकोपातही आपल्या कामाला समर्पित राहतो, त्याच्यासाठी काळ स्वतः बदलतो.” (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.