महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. सर्वच मराठी लोकांची आण, बाण आणि शान म्हणजे महाराज. ज्यांनी आपल्याला स्वराजायचे केवळ स्वप्न दाखवले नाही तर ते स्वप्न सत्यात देखील उतरवले आणि स्वराज्यात जगायला शिकवले देखील असा आपला सर्वांचा लाडका राजा म्हणजे शिवाजी महाराज. उत्तम राजा कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले महाराज. १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले. (Shivaji Maharaj)
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून “हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा” असे म्हणत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेची शपथ घेतली. शिवाजी महाराजांनी आपल्या अफाट बुद्धिमत्ता, शौर्य आणि कुशल प्रशासनाच्या जोरावर गुलामगिरीच्या अंधारात असलेल्या जनतेला स्वातंत्र्याची पहाट दाखवली. शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्यच स्थापन केले नाही, तर स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे हित आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला. आज शिव जयंतीच्या निमित्ताने आपण महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांबद्दल जाणून घेऊया. (Marathi)
तोरणा किल्ला जिंकणे
स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला तो म्हणजे ‘तोरणा’. वयाच्या केवळ १७ व्या वर्षी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. महाराजांनी अत्यंत चतुरपणे आणि कमीत कमी सैन्यासह हा किल्ला जिंकला. तोरणा जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. या किल्ल्याचे नाव बदलून ‘प्रचंडगड’ ठेवले. किल्ल्याच्या दुरुस्तीदरम्यान त्यांना गळलेल्या भारांमध्ये सोन्या-नाण्यांचे घडे सापडले. याचा वापर स्वराज्याच्या मजबुतीकरणासाठी केला गेला. हा स्वराज्याचा पहिला किल्ला होता. (Todays Marathi Headline)

अफजलखानाचा वध
विजापूरच्या आदिलशाहीने स्वराज्याला चिरडण्यासाठी अत्यंत क्रूर आणि महाकाय अफजलखानाला पाठवले होते. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराज आणि खान यांची भेट ठरली. खानाने महाराजांना आलिंगन देण्याच्या बहाण्याने दगा केला आणि पाठीत खंजीर खुपसला. मात्र, महाराजांनी आधीच अंगात चिलखत घातल्याने ते वाचले. यानंतर त्यांनी खानाचा डाव ओळखून त्याच्या पोटात वाघनखे खुपसली आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. या विजयामुळे मुघल आणि आदिलशाहीला महाराजांच्या शक्तीची जाणीव झाली. (Top Marathi Headline)
पावनखिंडीतील बाजीप्रभूंची लढाई
सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता. यामुळे महाराज गडावर अडकले होते. येथे देखील कावा करून महाराज अत्यंत गुप्तपणे गडावरून निसटले आणि विशालगडाकडे निघाले. परंतु सिद्धीच्या सैन्याने महाराजांचा पाठलाग केला. सिद्धीचे सैन्य मागे येत असल्याची चाहूल लागताच बाजीप्रभू देशपांडे यांनी केवळ ३०० मावळ्यांसह घोडखिंडीत शत्रूला रोखून धरले. महाराज विशालगडावर सुरक्षित पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी रक्ताचा शेवटची थेंब असेपर्यंत लढा दिला. बाजीप्रभूंच्या बलिदानामुळे महाराजांचे प्राण वाचले आणि ही खिंड ‘पावनखिंड’ म्हणून इतिहासात अमर झाली. (Latest Marathi News)
पुरंदरचा तह
औरंगजेबाने पाठवलेल्या मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांच्या अफाट मुघल सैन्याने स्वराज्याला वेढा घातला होता. स्वराज्याचे मोठे नुकसान टाळण्यासाठी महाराजांनी जयसिंगाशी तह केला. या तहानुसार महाराजांनी आपले २३ किल्ले आणि ४ लाख होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना दिला. हा महाराजांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा तह होता. परंतु स्वराज्य वाचवण्यासाठी महाराजांनी घेतलेली ही माघार तात्पुरती होती. ही महाराजांची सैन्य उभारणीसाठी ‘एक पाऊल मागे, दोन पावले पुढे’ अशी रणनीती होती. (Top Stories)
शाहिस्तेखानाची बोटं छाटली
औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखानला १ लाखाच्या सैन्यासह महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले होते. त्याने पुण्यात महाराजांच्याच लाल महालात मुक्काम ठोकला होता. ५ एप्रिल १६६३ रोजी रात्री महाराजांनी अवघ्या ५०० मावळ्यांसह लाल महालावर छापा टाकला आणि शाहिस्तेखानाच्या सैनिकांना झोपेत गाठलं. महाराजांनी गुप्त मार्गाने लाल महालात प्रवेश केला आणि शाहिस्तेखानवर आक्रमण केले. तो खिडकीतून पळून गेला, परंतु पळून जाताना महाराजांच्या तलवारीने त्याची तीन बोटे छाटली गेली. या घटनेने मुघल साम्राज्याची मुळं हादरवली. औरंगजेबाची मोठी नाचक्की झाली आणि महाराजांचे शौर्य पुन्हा सिद्ध झाले. (Social Updates)
सुरतेची लूट
मुघलांच्या सततच्या आक्रमक मोहिमांमुळे स्वराज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. यामुळे महाराजांनी मुघलांचे उत्पन्नाचे मोठे केंद्र असलेल्या सुरत शहरावर छापा टाकला. १६६४ साली शिवाजी महाराज सुरतेवर चालून गेले. सलग ४ दिवस महाराजांनी सुरतेची लुट केली. सुरतेच्या लुटीतील हाती सापडलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इ. मिळून एक कोटीच्या आसपास होती. त्यांनी केवळ व्यापारी आणि श्रीमंत लोकांच्या मालमत्तेवर छापा टाकला. सामान्य जनतेला महाराजांच्या सैन्याने त्रास दिला नाही. यातून मिळालेल्या अफाट संपत्तीचा वापर महाराजांनी किले बांधण्यासाठी, सैन्यासाठी आणि स्वराज्याच्या उभारणीसाठी केला. हा एक लष्करी रणनीतीचा आणि आर्थिक कूटनीतीचा भाग होता. (Top Marathi News)

कोल्हापूरची लढाई
शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळाल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमण करण्याच्या बेतात रुस्तमजमान होता. परंतु २८ डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तमजमानच्या सेनेवर जोरदार हल्ला चढवला. पुर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेला नामोहरम केले. रुस्तमजमान रणांगण सोडून पळून गेला. (Latest Marathi Headline)
आग्र्याहून सुटका
पुरंदरच्या तहानंतर महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा येथे गेले. परंतु तिथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. काही दिवस उलटल्यानंतर महाराजांनी या नजरकैदेतून सुटण्यासाठी गनिमी कावा करत आपण आजारी पडल्याचे नाटक करून बरे वाटण्यासाठी गरिबांना दान वाटण्यासाठी दररोज मिठाई वाटायला सुरुवात केली. ही मिठाई मोठमोठ्या पेट्यांमधून बाहेर जाऊ लागली. हा सिलसिला अनेक दिवस चालू होता. असाच एक दिवस, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मिठाईच्या पेट्यांमध्ये बसून आग्रा किल्ल्यातून निसटले. महाराजांनी अत्यंत चातुर्याने आणि जिवाची बाजी लावून मिठाईच्या पेट्यांमध्ये बसून स्वतःची आणि संभाजी महाराजांची सुटका करून घेतली. (Top Trending News)
===========
Shiv Jayanti : आत्मविश्वास आणि लढण्याची उमेद देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार
Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ; ‘हे’ होते महाराजांचे अष्टप्रधान
Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची माहिती
===========
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
शिवाजी महाराज हे स्वराज्याचे राजे होते. असे असले तरी परकीय सत्तेच्या नजरेत ते केवळ एक ‘जमीनदार’ होते. त्यामुळे ६ जून १६७४ रोजी रायगडावर वाराणसीमधील प्रसिद्ध पंडित गागाभट्ट या विद्वान पंडिताच्या हस्ते महाराजांचा राज्याभिषेक झाला. हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. संपूर्ण स्वराज्याला त्यांचा राजा या दिवशी मिळाला. महाराजनी ‘क्षत्रिय कुलावतंस छत्रपती’ ही पदवी धारण केली. यानंतर महाराजांनी स्वतःचे चलन सुरू केले आणि नवीन कालगणना राज्याभिषेक शक देखील सुरू केली. यामुळे स्वराज्य हे एक कायदेशीर, सार्वभौम आणि स्वतंत्र राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
