फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये धुळवड साजरी केली जाते. अनेक ठिकाणी पंचमीच्या दिवशी अर्थात रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवशी एकमेकांना रंग लावून आनंद व्यक्त केला जातो. शतकानुशतके पाणी, गुलाल आणि रंगांनी होळी खेळण्याची परंपरा आहे. पूर्वी नैसर्गिक गोष्टींचा वापर करून होळी साजरी केली जायची, परंतु गेल्या काही दशकांमध्ये रासायनिक रंगांचा वापर झपाट्याने वाढला आहे. हे रंग त्वचा आणि केसांसाठी हानिकारक आहेत. अशा रंगांपासून मुक्त होणे देखील कठीण आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या शरीरावर लागलेला रंग निघण्यासाठी काही सोपे आणि सहज करता येतील असे घरगुती उपाय सांगणार आहोत. (Holi)
* होळी खेळण्याआधी त्वचेवर खोबरेल किंवा बदाम तेल लावल्यास रंग पटकन निघतो. होळी झाल्यावर देखील कापसाच्या मदतीने तेल लावून हलक्या हाताने रंग काढू शकता.
* होळी खेळताना केसांना लागलेला रंग काढून टाकण्यासाठी नारळाचे दूध हा एक चांगला उपाय आहे. केस धुण्यापूर्वी नारळाचे दूध संपूर्ण केसांना व्यवस्थित लावून घ्या आणि १५ ते २० मिनिटे ठेऊन स्वच्छ धुवून काढा. यामुळे केसांवर लागलेला रंग दूर होतो (Marathi)
* रंग खेळवून आल्यावर एक वाटी दही संपूर्ण केसांना लावून घ्या आणि सुमारे ४५ मिनिटे तसेच ठेवा. मग अंघोळ करताना केस साध्या पाण्याने धुवा आणि नंतर नेहमीप्रमाणे शॅम्पू वापरून केस स्वच्छ धुवून टाका. यामुळे केसातील रंग देखील निघून जाईल आणि केसांना कोणतेही नुकसान होणार नाही.
* होळीचा चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी बेसन अतिशय उत्तम पर्याय आहे. यासाठी बेसन आणि दूध वापरून एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट १० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि मग हलक्या हाताने त्वचा घासा. यामुळे होळीला त्वचेवर लागेलेले रंग सहजपणे निघून जातात. (Todays Marathi Headline)

* शरीरावरील रंग काढण्यासाठी काकडीचा रस काढा. हा रस काढल्यानंतर त्यात थोडे गुलाबजल आणि एक चमचा व्हिनेगर मिसळून पेस्ट तयार करा. नंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर चोळा. याच्या वापराने चेहऱ्याचा रंगही निघून जाईल आणि त्वचाही चमकदार होईल. (Top Trending Headline)
* अर्ध्या लिंबाचा रस आणि १ चमचा कोरफडीचे जेल घाला. ते रंगलेल्या भागांवर लावा आणि हलक्या हाताने घासून घ्या. काही वेळाने कोमट पाण्याने धुवा. ते त्वचेला ब्लीच करून रंग काढून टाकण्यास मदत करते. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर लिंबू वापरू नका.
* जर रासायनिक रंगामुळे त्वचेला खाज सुटली असेल तर एक बादली पाण्यात 2 चमचे व्हिनेगर मिसळा आणि आंघोळ करा. यामुळे खाज कमी होईल आणि त्वचेची जळजळ देखील कमी होईल. पण जर जळजळ तीव्र होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Top Marathi News)
* रंग काढण्यासाठी तुम्ही फेसपॅकचा देखील तुम्ही वापर करू शकता. यासाठी पपईची पेस्ट, मध आणि मुलतानी माती एकत्र करून एक फेसपॅक तयार करता येईल. समप्रमाणात लिंबाचा रस आणि मध चेहेऱ्याला लावणं हा देखील एक उत्तम पर्याय आहे. या उपायाने कदाचित पाहिल्या झटक्यात रंग पूर्ण निघून जाणार नाही, पण निदान तो फिका होण्यास मदत होईल. रंग पूर्ण निघेपर्यंत दररोज हा फेसपॅक लावत राहा.
* चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी क्लिजिंग फेस वॉशचा वापर करा. त्यानंतर चेहऱ्याला आठवणीने मॉइस्चराइजर लावा. किंवा फेस मास्कचा देखील उपयोग करू शकता. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील रंग घालवण्यासाठी बेसन, दही आणि लिंबूच्या मिश्रणाचा वापर करा. याने त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत होईल. (Latest Marathi Headline)
========
Holika Dahan : नात्यांमधील प्रेम आणि आपुलकी वाढवणाऱ्या होळीच्या सणाचे महत्त्व
========
* नखांमधील रंग काढण्यासाठी कोमट पाण्यात बदामाचे तेल किंवा व्हिनेगर घ्या. बदाम तेल किंवा व्हिनेगरच्या पाण्यात नखे बुडवून ठेवा. असे ३-४ दिवस सतत करा नखांमधील रंग हळूहळू कमी होईल. रंग साफ करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा देखील वापर करू शकता. (Top Stories)
* होळीच्या दिवशी बाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर बर्फ लावू शकता. बर्फामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर बर्फाच्या तुकड्याने हलक्या हाताने १० मिनिटे मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील त्वचेच्या छिद्रात रंग अडकून राहणार नाही.
* नखांवरील होळीचा रंग काढणं खूप कठीण काम असतं. जवळपास आठवडाभर हे रंग नखांवर राहतात. यासाठी सोपा उपाय म्हणजे नेलपेंट लावणे. यामुळे तुमची नखं स्वच्छ आणि सुरक्षित राहतील. (Social News)
