भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे होळी. होळी हा एक हिंदू सण आहे. वाईट प्रवृत्तीवर चांगल्याच विजय होतोच हा संदेश देणारा हा सण आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी सण पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. या दिवशी होळी पेटवली जाते आणि आपल्यातील सर्व वाईट गुण या होळीत जाळून टाकून नव्याने पुन्हा सुरुवात करण्याचा विचार यामागे आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. मुख्यत्वे होळीचा हा सण फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत साजरा होतो. मात्र देशातील विविध राज्यांमध्ये होळी साजरी करण्याच्या पद्धतीने अतिशय वेगवेगळ्या आहेत. आज आपण कोणत्या राज्यात कशी होळी साजरी केली जाते ते जाणून घेऊया. (Holi)
उत्तरप्रदेश
होळी आणि रंगपंचमीचा सण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मथूरा, वृंदावन, गोकूळ या ठिकाणची होळी पाहण्यासाठी देशभरातीलच काय तर परदेशातूनही लोकं खास उत्तर प्रदेशमध्ये येतात. मथुरा जवळील बरसाना या गावातील लठमार होळी विशेष प्रसिद्ध आहे. होळीच्या दिवशी इथले स्त्री-पुरुष एकमेकांना काठीने मारतात. उत्तरप्रदेशमधील ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या अनोखी प्रथा आहे. (Marathi)
गोवा
गोव्यात होळीचा सणही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे म्हणतात की होळी शिमागो-उत्सव म्हणून ओळखली जाते आणि होळीच्या दिवशी रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. गोव्यातील होळीच्या शेवटच्या दिवशी गोव्यातील सर्व समुद्रकिनारे रंगांनी सजलेले आहेत ज्यात देशातील परदेशी तसेच परदेशी होळी खेळायला येतात. (Social Updates)

मणिपुर
मणिपूरमधील होळी योसांग उत्सव म्हणून ओळखली जाते आणि उत्सव पाच दिवस चालतो. या पाच दिवसांत अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. होळीच्या आदल्या दिवसाआधी येथील स्थानिक व मुले घरोघरी पैसे गोळा करतात आणि होळीच्या दिवशी वाद्याच्या तालावर थिरकतात. (Top Marathi News)
पंजाब
शीख धर्मियांचं पवित्र धर्मस्थान श्री आनंदपूर साहिब इथं होळीच्या दुसऱ्या दिवशी सुरु होणाऱ्या यात्रेला होला महल्ला असं म्हटलं जातं. शीख धर्मींयांमध्ये होला मोहल्लाचं खास महत्त्व आहे. इथ होळी पौरुषी प्रतीक म्हणून साजरी केली जाते. यासाठी गुरु गोविंद सिंह यांनी होळी याचा पुल्लिंग शब्द होल असा प्रयोग सुरु केला. होला मोहल्ला सहा दिवस साजरा केला जातो. या दरम्यान घोड्यावर स्वार होत हातात तलवार घेत साहसी खेळ दाखवले जातात. तसंच किर्तन आणि रंगांची बरसात केली जाते. (Latest Marathi Headline)
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये दोल जात्रा हा होळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. यादिवशी स्त्रिया लाल काठाच्या पारंपारिक सफेद साड्या परिधान करतात. तसंच शंख वाजवत राधा-कृष्णाची पूजा करतात. त्या दिवशी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढली जाते. यात कोरड्या रंगांची आणि फुलांची उधळण केली जाते. दोल या शब्दाचा अर्थ झोपाळा. या दिवशी झोपाळ्यावर राधा-कृष्णाची मूर्ती ठेवून भक्तीगीत गायलं जातं. (Top Trending News)
========
Holi : होळीसाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा नैसर्गिक रंग
========
राजस्थान
राजपूत म्हणजे राजेशाही हिंदू घराण्यांचा वारसा लाभलेलं राज्य म्हणजे राजस्थान. येथील अजमेर, उदयपुर, पुष्कर, बीकानेर आणि जयपुर या शहरांत होणारा होळीचा उत्सव पाहणं म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी असते. तुन्ही जर इतिहासप्रेमी असाल तर एकदातरी राजस्थानमधील होळी अनुभवायला पाहिजेच. (Top Stories)
केरळ
महाराष्ट्र आणि उत्तरेच्या राज्यांप्रमाणेच दाक्षिणात्य राज्यात देखील होळी साजरी केली जाते. मात्र या ठिकाणी असेलेली प्रथा परंपरा पूर्णत: वेगळी आहे. होळी म्हणजे वसंत ऋतूची चाहूल असते. याकाळात शेतातील धान्य पिकलेलं असतं त्यामुळे निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यालाठी केरळमधील येथील शेतकरी यज्ञात धान्य अर्पण केलं जातं. अशा पद्धतीने केरळमध्ये होळी साजरी केली जाते. (Social News)
