छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यापद्धतीने स्वराज्याचा राज्यकारभार सांभाळला आणि स्वराज्य उभारले त्याचे कौतुक आजही इतक्या वर्षांनी केले जाते. आजही त्यांच्या राज्यकारभाराचा आदर्श घेऊन देशाचा कारभार चालवला जातो, त्यात बदल केले जातात. जेव्हा जेव्हा महाराजांच्या राज्यकारभाराचा विषय निघतो तेव्हा सर्वात आधी डोक्यात येते ते म्हणजे ‘अष्टप्रधान मंडळ’. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करत एक आदर्श आणि कल्याणकारी राज्य उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा अत्यंत शिस्तप्रिय, प्रजाहितदक्ष आणि प्रगत प्रशासनावर आधारित होता. ६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक करून त्यांनी ‘हिंदवी स्वराज्य’ अधिकृत केले. महाराजांनी अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून कार्यक्षम प्रशासन, शेतकऱ्यांचे संरक्षण, लष्करी शिस्त आणि धार्मिक सहिष्णुतेचे धोरण राबवले. (Chatrapati Shivaji Maharaj)
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराच्या सुलभतेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी आठ मुख्यमंत्र्यांचे ‘अष्टप्रधान मंडळ’ नियुक्त केले होते. हे मंडळ, ज्याची स्थापना प्रामुख्याने १६७४ च्या राज्याभिषेकावेळी झाली, प्रशासनात सुधारणा, लष्करी धोरण आणि न्यायदानासाठी जबाबदार होते, ज्यामध्ये पंतप्रधान पेशव्यांच्या नेतृत्वाखालील सदस्य थेट महाराजांना जबाबदार असत. या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रत्येक प्रधानाचे कार्यक्षेत्र निश्चित केले गेले होते. स्वराज्याचे सर्वांगीण संरक्षण प्रशासन, न्याय, अर्थ, सैन्य, धर्म, राजकीय धोरण अशा सर्व अंगांना हे मंडळ हाताळत असे. अष्टप्रधान मंडळ हे शिवरायांच्या सुशासन, दूरदृष्टी आणि राजकीय प्रतिभेचे प्रतीक मानले जाते. आजच्या काळातही या प्रकारच्या व्यवस्थेचा अभ्यास करणे म्हणजे आदर्श नेतृत्व, पारदर्शी प्रशासन व लोककल्याणकारी धोरणांचा मूलगामी पाठ आहे. (Marathi)
छत्रपती शिवाजी महाराजांनी मंत्र्यांची नेमणुक करतांना अत्यंत विचारपूर्वक निवड केली होती. राज्यभिषेकाच्या वेळी अष्टप्रधानांची नेमणुक पूर्ण झाली होती. तसेच छत्रपतींनी आपल्या या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ‘सर्वात महत्वाचे म्हणजे ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तुत्वावर ठरवण्यात यावी असे सांगितले होते. व्यक्तीचे गुणदोष बघून नेमणुक केली गेली होती अशा प्रकारे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते. शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केवळ तलवारीच्या जोरावर न चालवता बुद्धिबळाच्या चालीसारखी प्रशासन यंत्रणा उभी केली होती. अष्टप्रधान मंडळ हे त्या यंत्रणेचे प्रमुख केंद्र होते. (SHiv Jayanti)
निष्ठा आणि कौशल्य शिवाजी महाराजांनी प्रधानांची नेमणूक केवळ जात, वंश, श्रीमंतीवर नाही तर प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता, निष्ठेच्या आधारावर केली होती. संघटन व निर्णय क्षमता या मंडळामुळे शिवरायांना युद्ध, स्वारी, राजकारण, महसूल, न्याय या सर्व क्षेत्रांत तज्ज्ञ सल्ला मिळत असे. हे मंडळ केवळ सल्लागार मंडळ नसून, ते कार्यकारी मंडळ होते. त्यामुळे स्वराज्याच्या छोट्या गावांपासून राजधानी रायगडपर्यंत एकच शिस्त होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले अष्टप्रधान मंडळ हे आजच्या मंत्रालयासारखेच एक प्रभावी कार्यसंघ होते. प्रत्येक प्रधानाची स्पष्ट जबाबदारी आणि कार्यक्षमता यामुळे संपूर्ण स्वराज्य मजबूतपणे उभे राहिले. चला माहित करून घेवू या छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री. (Todays Marathi Headline)

१. पंतप्रधान पेशवा : मोरोपंत त्रिंबक पिंगळे
हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील सर्वात प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हे छत्रपतींच्या राज्याभिषेकवेळी हाती सुवर्णकलश घेवून पूर्व दिशेला उभे राहिले होते. छत्रपतींनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. सर्व राज्यकारभरावर मोरोपंत पिंगळे हे लक्ष ठेवून असत. छत्रपतींच्या गैरहजेरित राजाचा प्रतिनिधि या नात्याने हे सर्व कारभार पाहत असत. यावरून या मुख्य पदाचे महत्व लक्षात येते. (Top Marathi Stories)
२. पंत अमात्य मुजुमदार : रामचंद्र नीळकंठ
रामचंद्र नीळकंठ हे मंत्रिमंडळातील महत्वाचे मंत्री होते. छत्रपतींच्या राज्यभिषेकाच्या वेळी हे दही-दुधाने भरलेला तांब्याचा कलश घेवून पश्चिम दिशेला उभे होते. रामचंद्र नीळकंठ हे स्वराज्यातील सर्व महाल आणि परगण्यांचा एकूण जमा खर्च व त्या त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेवून तो व्यवस्थित तपासून घेणे हे आमात्यांचे काम होते व तो लिहून, तपासून महाराजांसमोर सादर करायचे. (Top Trending Headline)
३. पंत सचिव सुरनीस : अण्णाजीपंत दत्तो
हे सुद्धा एक महत्वाचे मंत्री होते. सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पत्रव्यवहार यावर हे लक्ष ठेवायचे. छत्रपतींच्या राज्यभिषेकाच्या वेळी यांनी उपदिशांच्या ठायी क्रमाने आग्नेयला छत्र घेतलेले सचिव अण्णाजीपंत दत्तो हे होते. छत्रपतींकडून वेगवेगळ्या सुभेदारांना व अधिकाऱ्यांना आज्ञापत्रे पाठवली जात असत. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी यांना त्यावर लक्ष ठेवावे लागत असे. तसेच स्वराज्याचे दफ्तर आणि जमीन महसूल व्यवहारांवर हे लक्ष ठेवत असत. (Top Marathi News)
४. मंत्री वाकनीस : दत्ताजीपंत त्रिंबक
हे छत्रपतींच्या खाजगी कामाकडे लक्ष ठेवत असत. रोजनीशी, भोजनव्यवस्था, वैयक्तिक संरक्षण यांवर यांचे लक्ष असायचे. तसेच खाजगी कौटुंबिक आमंत्रण करण्याचे काम दत्ताजीपंत त्रिंबक हे करीत असत. (Latest Marathi Headline)
५. सेनापती सरनौबत : नेतोजी पालकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ आणि पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर यांची हुकूमत चालत असे हे खूप महत्वाचे होते. (Social Updates)
६. पंत सुमंत डबीर : रामचंद्र त्रिंबक
हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. पराष्ट्रांना खलिते पाठवणे तसेच पर राष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे व परराष्ट्र संबंधित माहिती नियमितपणे महाराजांना देणे व सल्ला देणे तसेच पराष्ट्रांतून हेरांच्या मदतीने माहिती काढण्याचे हे जबाबदारीचे काम रामचंद्र त्रिंबक यांच्याकडे होते. (Top Trending Headline)
=========
Kedarnath : ‘या दिवशी उघडणार केदारनाथ मंदिराचे दरवाजे
Shivpuja : जाणून घ्या शिवपूजनात बेलपत्राचे महत्व
=========
७. न्यायाधीश काझी-उल-ऊझत : निराजीपंत रावजी
हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. स्वराज्याच्या दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून तसेच न्यायनिवाडा करून निराजीपंत रावजी हे रयतेला न्याय दयायचे. (Top Stories)
८. पंडितराव दानाध्यक्ष सद्र-मुहतसिव : मोरेश्वर पंडित
छत्रपतींच्या धर्मखात्याचे हे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान तसेच ब्राह्मणांचा सन्मान करणे व यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबद्दल सल्ला देणे. शास्त्रार्थ पाहणे इत्यादी काम मोरेश्वर पंडित पाहत असत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
