संपूर्ण जगामध्ये भारतीय रेल्वे कायम चर्चेचा विषय असतो. कारण दररोज लाखो लोकं रेल्वेने प्रवास करत असतात. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे. मुख्य म्हणजे भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरलेले आहे. त्यामुळे दळणवळणासाठी रेल्वे अतिशय उत्तम आणि सोयीस्कर पर्याय आहे. रेल्वे देशाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करता येतो. रेल्वे प्रवास सामान्य लोकांना परवडणारा असल्याने आणि संपर्क व्यवस्था अतिशय चांगली असल्याने कायमच प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते. रोज देशभर हजारो गाड्या धावत असतात. अनेक गाडया राज्याबाहेर देखील जातात, ज्या हजारो किलोमीटरचा प्रवास करून लोकांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहचवतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, की भारतातील सर्वात जास्त तासांचा प्रवास करणाऱ्या ट्रेन कोणत्या? (Marathi)
विवेक एक्सप्रेस
विवेक एक्सप्रेस ही एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे जी संपूर्ण भारत भ्रमण करते. ही ट्रेन आसाममधील डिब्रूगढ येथून तामिळनाडू येथील कन्याकुमारीपर्यंत धावते. हा रेल्वेमार्ग भारतातील सर्वात लांब पल्ल्याचा मार्ग आहे. हा पल्ला गाठण्यासाठी ट्रेनला ७४ तास ३५ मिनिटे इतका कालावधी लागतो. इतक्या काळात ट्रेन ४२१८.६ किलोमीटरचा प्रवास करते. ही ट्रेन ८ राज्यांतून प्रवास करते. ही ट्रेन स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत सुरू केली होती. (Todays Marathi Headline)

अनोराई सुपरफास्ट एक्सप्रेस
अरोनाई एक्सप्रेस ही त्रिवेंद्रम सेंट्रल येथून सुरू होते आणि सिलचरपर्यंत धावते. हा प्रवास एकूण ३९३२ किलोमीटरचा आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी अनोराई सुपरफास्ट एक्सप्रेसला ७४ तास ४४ मिनिटांचा काळ लागतो. ही ट्रेन एकूण ८ राज्यांतून प्रवास करते. सुरुवातीला ही ट्रेन त्रिवेंद्रम सेंट्रल येथून गुवाहाटी पर्यंत चालवली जात होती. पण नंतर ट्रेनचा सिलचरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. (Top Marathi News)
हिमसागर एक्सप्रेस
आठवड्यातून एक दिवस चालणारी ही एक स्पेशल ट्रेन आहे. कन्याकुमारी येथून श्री माता वैष्णोदेवी कटरा पर्यंत ही ट्रेन घेऊन जाते. ३७८७ किलोमीटरचा हा प्रवास हिमसागर एक्सप्रेस ७२ तासांत पूर्ण करते. या दरम्यान ट्रेन १२ राज्यांतून प्रवास करते आणि या प्रवासात प्रवाशांना भारताची एक खास झलक पहायला मिळते. तसेच ही ट्रेन आपल्या प्रवासात एकूण ७३ रेल्वे स्टेशन्सवर थांबते. (Latest Marathi Headline)
तिरुनेलवेली जंक्शन
एका आठवड्यात एकदा चालणारी ही ट्रेन आहे. ही ट्रेन जम्मू आणि काश्मीरच्या कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिर आणि तामिळनाडूतील तिरुनेलवेली जंक्शन यांना जोडते. लांब पल्ल्याची ही ट्रेन ३६३३ किलोमीटरचा प्रवास ६९ तासांत पूर्ण करते. ही जगातील ४०वी सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. ही ट्रेन १३ राज्यांतून प्रवास करते आणि या दरम्यान एकूण ६४ रेल्वे स्टेशनवर थांबते. (Top Stories)
========
Post Office : भारतात आहे जगातील एकमेव तरंगते पोस्ट ऑफिस
========
नवयुग एक्सप्रेस
नवयुग एक्सप्रेस ही श्री माता वैष्णो देवी कटरा आणि मंगळुरु सेंट्रल/तिरुनेलवेली दरम्यान धावणारी एक साप्ताहिक लांब पल्ल्याची ट्रेन आहे. ३,६०० किमी पेक्षा जास्त अंतर कापणाऱ्या या ट्रेनला भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन्सपैकी एक मानले जाते, जी अनेक राज्यांमधून प्रवास करते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
