संपूर्ण जगातील लोकांना कायमच भारतातील पर्यटन आकर्षित करत असते. भारतातील अनेक अशी ठिकाणं आहेत, जी पाहून नक्कीच आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का तर बसेल शिवाय आपल्या देशात अशी ठिकाणं आहेत म्हटल्यावर अभिमान देखील वाटेल. भारतातील अनेक जागा अशा आहेत ज्या मनुष्य निर्मित आहेत. याच मनुष्य निर्मित जागा पाहून आपल्याला नक्कीच अप्रूप वाटणार हे नक्की. आजवर आपण पाण्यावर चालणाऱ्या बोट्स, हाऊसबोट्स, फ्लोटिंग गार्डन, फ्लोटिंग घरं आदी अनेक गोष्टी पाहिल्या असतील. मात्र आज आम्ही पाण्यावर तरंगणाऱ्या अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत जी पाहून नक्कीच तुम्ही चकित व्हाल. (post Office)
सध्या भारतातील पोस्ट ऑफिस फक्त नावापुरतेच राहिले आहे असेच वाटते. कारण मोबाइल आल्यामुळे आजकाल कोणीच कोणाला पत्र पाठवत नाही. मात्र पोस्ट ऑफिसचे काम फक्त पत्रापुरते सीमित न राहता त्याही पुढे जाऊन नानाविध प्रकारच्या बऱ्याच सेवा हे ऑफिस पुरवते. भारतीय टपाल विभाग ही एक प्रमुख सरकारी संस्था आहे, जी पत्रे, पार्सल, आणि बँकिंग सेवा जसे की, बचत खाती, मुदत ठेव, मासिक उत्पन्न योजना आदी सेवा प्रदान करते. भारतीय टपाल विभाग हा अत्यंत सुरक्षित मानला जातो. शिवाय ग्रामीण आणि शहरी भागात यांचे मोठ्या प्रमाणावर काम चालते. (Marathi)
आपण आपल्या आजूबाजूला पोस्ट ऑफिस नेहमीच बघत असतो. नव्या, जुन्या विविध प्रकारच्या बिल्डिंगमध्ये आपण पोस्ट ऑफिस पाहिले आहे. मात्र एक पोस्ट ऑफिस अशा एका ठिकाणी आहे, जे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. भारतामध्ये एक पोस्ट ऑफिस असे जे चक्क पाण्यावर तरंगते. ऐकून आश्चर्य वाटले ना…? मात्र हे खरे आहे. हे तरंगते पोस्ट ऑफिस आहे भारताचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये. स्वर्गसमान सुंदर असलेले काश्मीर कायमच पर्यटकांचे पहिले प्रेम आणि आकर्षण असते. काश्मीरवर निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. त्यामुळे वर्षभ या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल असते. (Todays Marathi Headline)

काश्मीरमधील पाण्यावर तरंगणाऱ्या हाऊसबोट म्हणजेच शिकारा फार लोकप्रिय आहेत. या ठिकाणी गेलेले लोकं शिकारामध्ये बसून त्याचा आनंद नक्कीच घेते. येथे पाण्यावर असणारे भाजी आणि फ्रुट मार्केट तर विशेष आकर्षणाची बाब आहे. या अशा सुंदर काश्मीरमध्ये फ्लोटिंग पोस्ट ऑफिसदेखील आहे बरं का. काश्मीरमधील श्रीनगरच्या सुंदर बर्फाच्छादित पर्वतांच्या मधोमध असलेल्या दल सरोवरात हे फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आहे. आणि संपूर्ण जगभरातील हे एकमेव पाण्यावर तरंगणारे पोस्ट ऑफिस आहे. त्यामुळे हे पोस्ट ऑफिस बघण्यासाठी लांबून लांबून लोकं इथे येतात. (Top Trending Headline)
हे केवळ देशातीलच नाही तर जगातील एकमेव तरंगते पोस्ट ऑफिस आहे. हे पोस्ट ऑफिस पाण्यावर तरंगत असताना लोकांना टपाल सेवा पुरवते. आणि ते पाहायलाही अत्यंत मनमोहक आहे. हे पोस्ट ऑफिस लाकडापासून बनवलेल्या पारंपारिक हाउसबोटीवर बांधले गेले आहे, जे श्रीनगरच्या तलावांमध्ये दिसणाऱ्या शिकारा बोटीसारखे दिसते. हे पोस्ट ऑफिस तब्बल २०० वर्षे जुने आहे. ब्रिटिश राजवटीत हे बांधले गेले असे म्हंटले जाते. १९५३ मध्ये स्थानिकांना टपाल सेवा देण्यासाठी त्याची सुरुवात झाली. पुढे १९७० मध्ये ते अधिकृतपणे उघडण्यात आले. पूर्वी नेहरू पोस्ट ऑफिस म्हणून ते ओळखले जात होते. मात्र आता त्याचे नाव फ्लोटिंग पोस्ट ऑफिस ठेवण्यात आले. (Top Stories)
=======
Train : हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन्स
=======
हे पोस्ट ऑफिस २०११ पर्यंत नेहरू पार्क पोस्ट ऑफिस म्हणून ओळखले जात होते, परंतु नंतर भारताच्या माजी पोस्ट मास्टर जनरलने त्याचे नाव बदलून फ्लोटिंग पोस्ट ऑफिस केले. जगातील कोठूनही लोक येथे येतात, त्यांचे प्राधान्य हे आहे की ते प्रथम फ्लोटिंग पोस्ट ऑफिसमध्ये जातील, तेथून कार्ड घेतील आणि त्यावर कॅन्सलेशन स्टॅम्प लावतील. विशेष म्हणजे येथील टपाल तिकिटांमध्ये डल सरोवराची प्रतिमा पाहायला मिळते. एवढेच नाही तर या पोस्ट ऑफिसमध्ये जगभरातील मेल आणि टेलिफोनची सुविधाही उपलब्ध आहे. डल सरोवराला भेट देणाऱ्या बहुतेक लोकांना हे पोस्ट ऑफिस नक्कीच बघायला आवडते. हजारो पर्यटक येथे येतात आणि सेल्फी घेतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
