Home » Somvati Amavasya : सोमवती अमावस्येचे महत्त्व आणि माहिती

Somvati Amavasya : सोमवती अमावस्येचे महत्त्व आणि माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Somvati Amavasya
Share

हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे. अमावस्या ही तिथी अशुभ समजली जास्त असली तरी या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही सोमवती अमावस्येला जास्तच महत्त्व आहे. सोमवती अमावस्या ही हिंदू धर्मात विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेली तिथी आहे. जी अमावस्या सोमवारी येत असल्याने ‘सोमवती’ म्हणून ओळखली जाते. असा योग वर्षातून एक किंवा दोनदा येते आणि या दिवशी पितृ कार्य, स्नान-दान आणि भगवान शिव-पार्वतीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने आणि इतरांना दान केल्याने खूप पुण्य मिळते. शिवाय, शास्त्रांनुसार, सोमवती अमावस्येला देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. (Somvati Amavasya)

फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीनंतर लगेचच सोमवती अमावस्येचा अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. पंचांगानुसार, सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ०५.३५ वाजता अमावस्या तिथीची सुरुवात होत आहे. याची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ०५.३१ वाजता होणार आहे. १६ तारखेला सूर्यास्तापूर्वी अमावस्या येत असल्याने, या दिवशी सोमवती अमावस्येचा उपवास वैध असेल. उदया तिथीनुसार सोमवती अमावस्या सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजीच साजरी केली जाईल. त्याचवेळी, अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी मंगळवारी असल्याने या दिवशी भौमवती अमावस्येचा योग असेल. (Marathi)

शनी आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस विशेष आहे. शनि देवाच्या साडे सातीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शनि देवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तसेच या दिवशी मौन पाळण्याची परंपरा आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा-पाठ, दान आणि अर्पण केल्यास विशेष फळ मिळते. या दिवशी भगवान भोलेनाथाची विधिवत पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी राहते. (Todays Marathi Headline)

Somvati Amavasya

पिंपळात त्रिदेवांचा वास मानला जातो, त्यामुळे या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करावे आणि १०८ परिक्रमा करावी. परिक्रमा करताना कच्चा धागा बांधावा. तुळशीच्या झाडाला धान, पान आणि खडी हळद अर्पण करावी. सुहागिन स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी मौन व्रत किंवा उपवास ठेवू शकतात. पितृ दोषापासून मुक्तीसाठी काळ्या तिळाचे दान करावे. काल सर्प दोषापासून मुक्तीसाठी विशेष पूजा आणि मंत्र जप करावा. (Top Marathi Headline)

सोमवती अमावस्येची कथा
एका सावकाराला सात मुले आणि एकच मुलगी होती. एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे. जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तीला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही. हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची. असे अनेकवेळा घडले, मग एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला, एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो. (Social Updates)

सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की, पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला सांग. एके दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती. नेहमीप्रमाणेच घडले. भिकाऱ्याने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की, तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे,सौभाग्य प्राप्ती नाही. हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाऱ्याला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो, वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस. ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे आहे, तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेले नाही. जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल, त्याच वेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल. (Top Trending Headline)

ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराची बायको दु:खी झाली, पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार हे तुला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही सांगा. सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे तिथे सोना धोबी राहते. ती प्रत्येक सोमवती अमावस्येला उपवास करते. त्यामुळे तिचं सौभाग्य दृढ आहे. तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा नाही होणार. (Top Marathi News)

Somvati Amavasya

ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोना धोबिणीच्या शोधात निघाली. एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती. तेव्हा त्याने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या पिलांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला. सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या मुलांचे रक्षण केले. इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले की, सर्वत्र रक्त पसरले आहे. गरुडला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलांचे नुकसान केले आहे. म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला पण सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की, तिने मुलांचे रक्षण केले आहे. जेव्हा गरुडाला हे सत्य कळले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलांचे रक्षण केले आहे, तर मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू? (Latest Marathi Headline)

तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की, ती सोना या धोबीणीच्या शोधात निघाली आहे, ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील. गरुड सावकाराला सोना धोबीणीच्या गावी घेऊन गेला. सोना धोबीण यांना सात मुले आणि सुना होत्या. पण घरातील कामावरून सूनांमध्ये भांडण व्हायचे. सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोना धोबिणीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून जायची. असे बरेच दिवस चालले असताना एके दिवशी सोना धोबीन लपून बसून सर्व काही पाहिले. सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा धोबीणीने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामे करून का निघून जातेस. सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन पण आधी वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील. सोना धोबीणीने सावकाराच्या पत्नीला वचन दिले. (Top Trending News)

सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोना धोबिणीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले. सोना धोबीन सावकाराच्या घरी गेली आणि तिच्या सुनेला म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरुन जातील. मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा,अंतिम संस्कार करू नका. सोना धोबीन सावकाराच्या घरी आला आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला. सोना धोबीणीने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला. धोबीणीने त्याला मारले. यानंतर सोना धोबन म्हणाली, मी आजवर जे काही सोमवती अमावस्या व्रत केलेत, त्याचे पुण्य फळ मी सावकाराच्या मुलीला देते. यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहीले. (Top Stories)

===============

Mahashivrtari : महाशिवरात्रीला ‘या’ लाभांसाठी न चुकता करा महामृत्युंजय मंत्राचा जप

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी ‘हे’ उपाय करून मिळवा सकारात्मक लाभ

==================

यानंतर सोना धोबिन आपल्या गावी परत जाऊ लागली, वाटेत जातांना मग एके दिवशी सोमवती अमावस्या आली. धोबन यांनी या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली. कथा वाचली. दरम्यान, सोना धोबीन यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. घरी आल्यावर तिने सोमवती अमावस्येचे पुण्य पतीला दिले. यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला. जेव्हा लोकांनी सोना धोबीनला विचारले की तू तुझ्या मृत पतीला कसे जिवंत केलेस, तेव्हा तिनी सांगितले की सोमवती अमावस्येच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे पतीला जिवंत करण्यास मदत झाली. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.