Home » Mahashivrtari : महाशिवरात्रीला ‘या’ लाभांसाठी न चुकता करा महामृत्युंजय मंत्राचा जप

Mahashivrtari : महाशिवरात्रीला ‘या’ लाभांसाठी न चुकता करा महामृत्युंजय मंत्राचा जप

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mahashivrtari
Share

आज सर्वत्र महाशिवरात्रीचा सण साजरा होत आहे. सर्वच शिव मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असून घरी देखील शिवाची मनोभावे पूजा केली जात आहे. आज महाशिवरात्र असल्याने आज महादेवाचे भक्त त्यांची विविध पद्धतीने उपासना करत असतील. त्यांच्या नानाविध मंत्रांचा जप देखील करत असतील. भोलेनाथांचा सर्वात प्रसिद्ध मंत्र म्हणजे ‘ओम नमः शिवाय’. मात्र यासोबतच महादेवाचा अजून एक अतिशय जाज्वल्य असा मंत्र आहे, ज्याचा मनापासून जप केल्यास दीघायुष्याची प्राप्ती होते. अनेकांना या मंत्राबद्दल लक्षात आलेच असेल. हा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. “ॐ त्र्यम्बकं स्यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥” महामृत्युंजय मंत्र हा सर्वात प्रभावी आणि दिव्य मंत्र मानला जातो. (Mahashivratri)

जर तुम्हाला भयमुक्त, रोगमुक्त जीवन हवे असेल किंवा अकाली मृत्यूच्या भीतीपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर भगवान शंकराच्या सर्वात प्रिय ‘महामृत्युंजय मंत्राचा’ जप करा. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात. या मंत्राचा उल्लेख ऋग्वेद ते यजुर्वेदात आढळतो. संस्कृतमध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारी व्यक्ती. म्हणूनच भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो. शिवपुराणानुसार महामृत्युंजय मंत्राच्या जपाने जगातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. (Marathi)

महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वरुकमिव बंधनं मृत्युोर्मक्ष्य ममृतत् ॥

अर्थात हे त्रिनेत्रीधारी महादेवा आम्ही सर्व जण तुझी पुजा आराधना करतो.जो आमचे पोषण करतो,ज्याप्रमाणे फळ हे फांदीच्या बंधनातुन मुक्त होत असतात.त्याचप्रमाणे आम्ही मृत्यु अणि नश्वरतेपासुन मुक्त होऊ. हे देवा आम्हास पुन्हा पुन्हा संसार चक्रामध्ये अडकवणारया मृत्युच्या विळख्यातुन आम्हास बाहेर काढ.अणि आम्हाला अमृतत्व प्रदान कर.आम्ही हा संसार सोडुन तुझ्या चरणाशी येऊ अणि अमर होऊ असा तु आम्हाला आशीर्वाद दे. (Todays Marathi Headline)

Mahashivrtari

महामृत्युंजय मंत्राचा १.१५ लाख वेळा जप करावा. जर तुम्हाला १.२५ लाख वेळा जप करणे शक्य होत नसेल. तर तुम्ही १०८ वेळा जप देखील करू शकता. श्रावण महिन्यात या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण या मंत्राचा जप इतर कोणत्याही महिन्यात करायचा असेल तर सोमवारपासून सुरुवात करा. या मंत्राचा जप करताना रुद्राक्षाची जपमाळ वापरावी. (Social Updates)

महामृत्युंजय मंत्र जपाने होतात हे लाभ
अकाली मृत्यू टळतो
महादेवाच्या आवडत्या महामृत्युंजय मंत्राचा रोज जप केल्यास अकाली मृत्यूची भीती नसते. या मंत्राचा जप केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि दीर्घायुष्याचे वरदान देतात. (Top Marathi News)

सुदृढ आरोग्य
महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्याने व्यक्तीला सुदृढ आरोग्य लाभतं. तसेच त्याला मानसिक तणाव आणि आजारांपासून आराम मिळतो. शरीरात सकारात्मक ऊर्जा, शक्ती प्राप्त होत व्यक्तीचे आयुर्मान वाढते.

सुख आणि समृद्धी
महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होत व्यक्तीला जीवनात संपत्ती, सुख, शांती आणि सौभाग्य लाभते. महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्याने आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळते.(Latest Marathi Headline)

रोगांपासून मुक्तता
महामृत्युंजय मंत्राचा रोज जप करणार्‍या व्यक्तीला शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळतेच पण भीती आणि अशक्तपणापासूनही मुक्ती मिळते. त्यामुळे निरोगी शरीर मिळविण्यासाठी दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

संपत्तीत वाढ
महामृत्युंजय मंत्राचा दररोज जप केल्यास धनात वाढ होते. या मंत्राचा जप केल्याने भोळेची कृपा तुमच्यावर राहते ज्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. (Top Trending News)

========

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी ‘हे’ उपाय करून मिळवा सकारात्मक लाभ

Mahashivratri : महाशिवरात्रीला घरी अशा पद्धतीने भगवान शंकराची पूजा केल्यास मिळेल उत्तम फळ

========

आदरात वाढ
महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रभावी बनते. त्यामुळे समाजात त्यांची कीर्ती आणि आदर वाढू लागतो. महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप करणार्‍या व्यक्तीला भोले शंकराचा अपार आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. (Top Stories)

संतान सुख
जे जोडपे पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना अद्यापही संतती सुख प्राप्त झालेले नाही अश्यांनी रोज १०८ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जाप करावा आणि दर सोमवारी तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करून महादेवाला पुत्र प्राप्तीचा आशिर्वाद मागावा. (Social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.