Home » Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी ‘हे’ उपाय करून मिळवा सकारात्मक लाभ

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी ‘हे’ उपाय करून मिळवा सकारात्मक लाभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mahashivratri
Share

उद्या संपूर्ण देशामध्ये महाशिवरात्रीचा सण दणक्यात साजरा होणार आहे. मंदिरांमध्ये उद्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असेल. महाशिवरात्र म्हणजे भगवान भोलेनाथाला समर्पित असलेला दिवस. या दिवशी महादेवाचे माता पार्वतीशी लग्न झाले होते असे सांगितले जाते. हिंदू धर्मामध्ये तीन मुख्य देव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाला सृष्टीचा निर्माता म्हटले जाते, विष्णू देवाला या सृष्टीचा पालनकर्ता म्हटले जाते तर महेश अर्थात भगवान शिव यांना या सृष्टीचे संहारक म्हटले जाते. (Mahashivratri)

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची मनोभावे पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. हा दिवस पवित्र दिवसांपैकी एक असल्याने शिव- शक्ती मिलनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त विविध भागात खास पूजा तसेच होम- हवन केले जातात. मात्र या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होतो. मग महाशिवरात्रीला कोणते उपाय करावे जाणून घेऊया.

अभिषेक
या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. शिवलिंगावर पाणी, दूध अर्पण केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते असे म्हणतात. तसेच दही अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. शिवलिंगावर मधाने अभिषेक केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो, आरोग्यही उत्तम राहते. तसेच तूप अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. (Lord Shiv)

बेलपत्र
अभिषेक केल्यानंतर शिवलिंगाला अर्पण केलेले बेलपत्र घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. हे बेलपत्र घरातील तिजोरीत ठेवावे. यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी टिकून राहते.

पार्वतीची उपासना
या दिवशी देवी पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करावे. नंतर देवीला अर्पण केलेल्या बांगड्या, सिंदूर, मेहेंदी किंवा इतर वस्तू घरी आणून नीट ठेवाव्यात. असे केल्याने सौभाग्य आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते. (Mahashivratri News)

प्रगतीचे मार्ग
महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिव मंदिरात 11 दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा.

जीवनात प्रगतीसाठी
महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री जागरण करताना शिवपुराण, शिव सहस्त्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठन करू शकता. भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील. (Marathi)

आर्थिक समस्या निवारणासाठी
शिवपुराणात सांगितले आहे जर एखादी व्यक्ती आर्थिक समस्या कर्ज यामुळे चिंतेत असेल. पैशांचे प्रॉब्लेम सुरु असतील तर अशा व्यक्तींनी एक सोपा उपाय शिवरात्रीच्या दिवशी करावा. तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी प्रदोषकाळात शिवमंदिरात जाऊ शकता. शिवलिंगावर तुम्हाला एक मूठ हरभरा डाळ अर्पण करावी लागेल. हरभरा डाळ शिवलिंगावर अर्पण होणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आयुष्यातील दुःख आर्थिक संकटे दूर होतात असे मानले जाते. (Todays Marathi Headline)

Mahashivratri

विवाह इच्छुकांसाठी
विवाहासाठी किंवा मनपसंत जोडीदार मिळण्यासाठी एक विशेष उपाय सांगितला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवमंदिरात साखर घेऊन जा. महादेवासमोर बसून आपली मनोकामना सांगा व एक मूठ साखर शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने वैवाहिक जीवनात देखील गोडवा येतो व इच्छित जोडीदाराशी लग्न होते असे मानतात. (Top Marathi News)

अपूर्ण कामं पूर्ण होण्यासाठी
अक्षता, हरभरा डाळ यांच्यासोबतच तुम्ही शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण करावेत. हिरव्या मुगाची डाळ शिवलिंगावर अर्पण केल्यास रखडलेली कामे पूर्ण होतात असे मानले जाते. एखादी अपूर्ण इच्छा जी अनेक उपाय करून पूर्ण होत नाही अशा गोष्टी तुमच्या हळूहळू पूर्ण होऊ लागतात अशी मान्यता आहे. त्यामुळे शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर हिरवे मूग एक मूठ अर्पण करावे. (Latest Marathi Headline)

उत्तम आरोग्यासाठी
पंचामृत हे शिवाला दिले जाणारे सर्वात महत्त्वाचे नैवेद्य मानले जाते. ते दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण आहे. भक्तांच्या विश्वासानुसार पंचामृताने शिवाला अभिषेक केल्याने केवळ आरोग्य सुधारत नाही तर इच्छा देखील पूर्ण होतात. वास्तविक जीवनातील उदाहरणांमध्ये असे भक्त समाविष्ट आहेत जे कठीण काळात पंचामृताचे प्रसाद घेतल्यानंतर परीक्षेत यशस्वी झाले. (Top Trending Headline)

इच्छापूर्तीसाठी
महाशिवरात्रीच्या दिवशी तळहातात ७ काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण करतील.

==========

Mahadev : शंकराचा सेवक असलेला नंदी शंकराचे वाहन कसे बनला?

Mahashivratri : महाशिवरात्रीला घरी अशा पद्धतीने भगवान शंकराची पूजा केल्यास मिळेल उत्तम फळ

Mahashivratra : महाशिवरात्र साजरी करण्यामागच्या आख्ययिका

==========

समृद्धीसाठी
महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल, असे भगवान शिवांनी स्वतः सांगितले. त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील. त्यामुळे या दिवशी बेलपत्राखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा. यामुळे सुख-समृद्धी येईल. (Top Stories)

रूद्राभिषेक
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिशेषक अवश्य करा. हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. हा अभिषेक केल्याने ग्रहदोष दूर होतात तसेच आयुष्यात येणारे सर्व अडथळे देखील दूर होतात असे म्हंटले जाते. तुमच्या कुंडलीतील ग्रहदशा जर अत्यंत खराब असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार चांदीचे नाग नागीण शिवलिंगावर अर्पण करू शकता यामुळे सर्व कष्ट पीडा दूर होतात असे म्हटले जाते. (Social News)

(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.