Home » Recipe : महाशिवरात्रीचा सोप्या आणि हटके उपवास रेसिपी

Recipe : महाशिवरात्रीचा सोप्या आणि हटके उपवास रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Recipe
Share

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अतिविशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि आशिर्वाद घेतला जातो. मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता. अनेक भक्त महाशिवरात्रीचे व्रत आणि पूजा करतात. यादिवशी उपवास करण्याला मोठे महत्त्व आहे. अनेक लोक महाशिवरात्रीचा उपवास निर्जळी करतात तर काही लोकं या दिवशी उपवासाचे पदार्थ खातात. मुख्य म्हणजे हा उपवास दोन्ही वेळा असतो. शिवरात्रीचा उपवास थेट दुसऱ्या दिवशी सोडतात. म्हणून या दिवशी दोन्ही वेळेला उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. आता उपवास म्हटल्यावर साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा एवढेच आहे का तर नाही. अनेकांना दोन्ही वेळा साबुदाणा खायला आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या अनेक सोप्या आणि हटके रेसिपी सांगणार आहोत. यंदाच्या महाशिवरात्रीला तुम्ही या रेसिपी करून तुमचा उपवास सार्थकी लावू शकता. (Recipe)

साबुदाण्याची लापशी
साहित्य – १ टेबल चमचा साबुदाणा, १ कप दूध, २ चमचे साखर.

कृती – साबुदाणा थोडावेळ धुऊन ठेवावा, नंतर १/२ कप पाण्यात साबुदाणा शिजवून घ्यावा. वाटल्यास थोडेसे आणखी पाणी घालावे. नंतर त्यात दूध व साखर घालून थोडा वेळ शिजवावे. मग खालती उतरवून गार किंवा गरम आवडी प्रमाणे द्यावी. आयत्यावेळी त्यात चिमूटभर मीठ घातल्यास ही लापशी चांगली लागते. (Top Marathi Headline)

______________________________________________________________________________________________________________________________________

मखना खीर
साहित्य – मखाना, तूप, दूध, साखर, वेलची पूड, सुकामेवा

कृती – मखणाची खीर बनवण्याची पद्धत सर्वप्रथम कढईत 2 ते 3 चमचे तूप गरम करा. त्यात एक कप फुल मखना आणि 10 ते 12 काजू घालून मंद ते मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. काजूही सोनेरी रंगाचे होतील. नंतर ते एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. आता 2 कप दूध (500 मिली) सॉसपॅनमध्ये किंवा जाड तळाच्या पॅनमध्ये मध्यम आचेवर ठेवा. दरम्यान दूध चांगले ढवळत राहावे, जेणेकरून दूध तळापासून जळणार नाही. दुधाला उकळी येऊ द्या. एकीकडे दूध गरम होत असताना, दुसरीकडे ⅓ कप मखना राखून ठेवा आणि उरलेला भाजलेला मखना ग्राइंडर किंवा ब्लेंडरच्या भांड्यात छान बारीक करा. भाजलेले काजू मखन्यासोबत एकाच थाळीत घालायचे नाहीत हे लक्षात ठेवा. खीर शिजल्यानंतर त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालू तुम्ही शकता. आता दुधाला उकळी आली की त्यात चवीनुसार साखर घाला. आणि बारीक केलेला मखना टाकून हे मिश्रण चांगले ढवळा. आता मखणा मऊ होईपर्यंत आणि दूध थोडे घट्ट होईपर्यंत 9 ते 10 मिनिटे मंद आचेवर ते शिजवा. अशाप्रकारे मखनाची स्वादिष्ट खीर तयार होते. (Mahashivratri)

___________________________________________________________________________________________________________________________________

वरईचे डोसे
साहित्य – १ कप भगर (वरई), पाव कप साबुदाणा, २ हिरव्या मिरच्या, दही, मीठ, तेल

कृती – सर्वात आधी भगर आणि साबुदाणा २-३ तास भिजत ठेवा. मिक्सरमधून भगर, साबुदाणा, मिरची आणि थोडे दही घालून बारीक वाटून घ्या. पिठात मीठ घालून डोसा बॅटरसारखे पातळ करा. नॉन-स्टिक तव्यावर डोसे सोडा आणि बाजूने थोडे तेल सोडून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा. (Marathi)

_____________________________________________________________________________________________________________________________________

राजगिरा खीर
साहित्य – राजगिरा दाणे, दूध, साखर, सुकामेवा

कृती – राजगिरा खीर बनवण्यासाठी ⅓ कप राजगिरा दाणे एका गाळणीमध्ये स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते प्रेशर कुकरमध्ये देखील टाकू शकता. प्रेशर कुकरमध्ये 1.5 कप पाणी घाला. आणि माध्यम आचेवर चांगले 3 शिट्ट्या काढा. प्रेशर कुकर थंड झाल्यावर त्यात 1 कप दूध घाला. आणि मिश्रण चांगले ढवळून घ्या. मंद आचेवर 6 ते 7 मिनिटे चांगले शिजू द्या. यादरम्यान काही अंतराने दूध ढवळत राहा जेणेकरून खीर खाली चिकटणार नाही किंवा तळापासून तपकिरी होणार नाही. यानंतर 4 ते 5 चमचे साखर घाला आणि आणखी 2 मिनिटे उकळवा. शेवटी ड्रायफ्रूटस, ½ टीस्पून वेलची पावडर टाका, ही खीर चविष्ट बनवण्यासाठी यात तुम्ही 7 ते 8 वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या देखील घालू शकतात. (Todays Marathi Headline)

______________________________________________________________________________________________________________________________________

Recipe

उपवासाची मिसळ
साहित्य – साबुदाण्याची खिचडी (वाटीभर साबुदाणा असेल तर ३/४ वाटी उकडलेल्या बटाटयाच्या फोडी या प्रमाणात करावे. शेवटी लिंबाचा रस मिसळावा) १ लहान वाटी नॉयलॉन साबुदाणा तळून घेणे, काकडी किंवा कोशिंबीर, खारे दाणे १ लहान वाटी, साखर, कोथिंबीर, १ मोठी वाटी दही.

कृती – हे सर्व पदार्थ तयार करून ठेवावे. प्रत्येकाच्या बशीत खिचडी घालून ती बशीत पसरावी. त्यावर २-४ चमचे खारे दाणे, त्यावर तितकाच तळलेला साबुदाणा, त्यावर तितकाच बटाटयाचा कीस, त्यावर डावभर दही, त्यावर ३-४ चमचे काकडी चव, कोथिंबीर हे सर्व पदार्थ पेरावेत. चवीपुरती साखर पेरावी. खाणार्‍याने आपल्या आवडीप्रमाणे हे सर्व मिसळून घ्यावेत. वरील पदार्थांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे. (Top Marathi News)

______________________________________________________________________________________________________________________________________

उपवासाचे पंचांमृत
साहित्य – १-२ चमचे दाण्याचे कूट, मिरच्या, जिरे, मीठ, साखर किंवा गूळ, तूप, चिंच.

कृती – तूप जिरे यांची फोडणी त्यावर मिरचीचे तुकडे टाकावेत व एक कपभर पाणी फोडणीस घालावे. पाणी उकळले की त्यात दाण्याचे कूट घालून ढवळावे. नंतर त्यात चिंच कोळून घालावी. मीठ व गूळ चवी पुरते घालावे. थोडे घट्ट झाले की खाली उतरवावे. हे पंचामृत ३-४ दिवस टिकते. (Latest Marathi headline)

______________________________________________________________________________________________________________________________________

उपवास कटलेट
साहित्य – उकडलेला बटाटा, साबुदाणे, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ

कृती – उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटे धुवून कुकरमधून उकडवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये साबुदाणे टाकून बारीक पावडर तयार करा. उकडवून घातलेला बटाटा थंड करून साल काढून घ्या. थंड करून घेतलेला बटाटा व्यवस्थित मॅश करून नंतर त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, साबुदाण्याची पावडर आणि शेंगदाण्याचा बारीक कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्याचे कटलेट्स तयार करून गरम तेलात व्यवस्थित भाजून घ्या. लालसर रंग आल्यानंतर कटलेट्स काढा. तयार आहेत उपवासाचे कटलेट्स. (Top Stories)

______________________________________________________________________________________________________________________________________

=========

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीचा उपवास करताय? जाणून घ्या पूजेचे नियम

Mahashivratri : सांसारिक असूनही महादेव स्मशानात का राहतात?

=========

राजगिऱ्याची दशमी
साहित्य – 2 वाटी राजगिऱ्याचे पीठ, 1 वाटी चिरलेला गुळ, 3- पाव चमचा मीठ, 5/6 चमचे साजूक तूप

कृती – पाव वाटी पाणी घेऊन त्यामध्ये 1 वाटी गुळ विरघळून घ्यायचा. राजगिऱ्याचे पीठ चाळून घेऊन त्यामध्ये मीठ घालायचे. हे पीठ तयार केलेले गुळाचे पाणी थोडे – थोडे टाकून पीठ घट्ट मळायचे. ( पाणी थोडे – थोडे टाकून पीठ मळा) थोडेसे तूप लावून पीठ परत व्यवस्थित मळायचे. या पिठाचे पोळी करतो तेवढे आकाराचे गोळे करून दशमी पोळपाटावर लाटायची. (लाटताना पोळपाटाला पीठ चिटकू नये म्हणून कोरडे राजगिऱ्याचे पीठ टाकून त्यावर दशमी लाटायची. हाताला पण पीठ चिटकू नाय म्हणून थोडेसे तूप लावायचे.) लाटून झालेली दशमी तव्यावर दोन्ही साईडने मध्यम आचेवर भाजायची. भाजताना दोन्ही साईडला तूप लावायचे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.