आपण कायम शंकराच्या मंदिरात गेलो की, आपल्याला सर्वात आधी दर्शन होते ते शिवाचे वाहन असलेल्या नंदीचे. नंदी कायम आपले आराध्य असलेल्या भगवान शिवाच्या समोर विसावल्याचे आपल्याला दिसते. नंदी हे महादेवांचे वाहन आहे. असे म्हटले जाते की, महादेवांकडे कोणतीही इच्छा मागायची असेल तर ती आधी नंदीच्या कानात सांगावी, तो नक्कीच आपली इच्छा देवापर्यंत पोहचवतो. महादेवाची समाधी भंग होवू नये म्हणून भक्तांनी आधी नंदीकडे आपले गाऱ्हाणे मांडावे यासाठी ती व्यवस्था करण्यात आली आहे. नंदी हे शंभोमहादेवाचं फक्त वाहन नाही तर नंदी शिवाचा परम भक्त आणि सखा आहे. (Mahadev)
हिंदू धर्मामध्ये आपण पाहिले तर प्रत्येक देवी देवतांचे आपले एक वाहन आहे, त्यावर आरूढ होऊन ते या सृष्टीची भ्रमंती करतात. देवी देवतांच्या वाहनामागे देखील एक खास कारण असते. तसेच शिवाचे वाहन नंदी आहे आणि नंदी वाहन असण्यामागे देखील एक खास कारण आहे. कोणते ते जाणून घेऊया. नंदीपुराणामध्ये महादेवाच्या निरनिराळ्या कथा सांगितल्या जातात. एक कथा आहे शिलाद मुनींची आणि दुसरी समुद्र मंथनाची. (Marathi)
शिलाद ऋषींची कथा
नंदीच्या जन्माची आणि महादेवाचे वाहन होण्याची एक आख्यायिका सांगितली जाते, शिलाद मुनी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करत होते. पण एकदा त्यांच्या मनात विचार आला, की यामुळे माझा वंश राहणारच नाही. म्हणुन त्यांनी इंद्रांकडून पुत्र मागितला. परंतु इंद्र त्यांची ही पुत्रप्राप्तीची इच्छा पुर्ण करू शकत नव्हते. इंद्रांनी, शिलाद मुनींना सांगितले, “तुम्ही शंकराची आराधना करा, तुमची इच्छा ते पुर्ण करतील.” शिलाद मुनींनी तपश्चर्या करून भगवान शंकर यांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीची आपली इच्छा सांगितली. (Social Updates)
“तुमची इच्छा नक्कीच पुर्ण होईल” असं महादेवाने सांगितले. एके दिवशी आपल्या आवारात चालत असतांना त्यांना वाटेत एक नवजाच बाळ सापडलं. जेव्हा ते बाळाजवळ गेले त्यावेळी आकाशवाणी झाली, की “याचे संगोपन करं. हा मुलगा तुझं आयुष्य सुख-समृद्धीने भरून देईल” शिलाद मुनींनी या मुलाचे नाव नंदी ठेवले. (Todays Marathi Headline)

नंदी लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि शिवाचा परमभक्त होता. प्रत्येक विद्येत नंदीने निपुणता मिळवली होती. एकदा शिलादी मुनींच्या आश्रमात दोन साधु आले. शिलाद मुनी आणि नंदीने या दोन्ही साधूंची उत्तम व्यवस्था केली. पुढच्या मार्गाला जाण्यापूर्वी दोन्ही साधुंनी शिलाद मुनींना “शतायुषी भवः” असा आशीर्वाद दिला. परंतु नंदीला आशीर्वाद देतांना ते थोडे कचरले. शिलाद मुनींनी हे ओळखले आणि त्याचे कारण दोन्ही साधूंना विचारले, तर साधु म्हणाले,”आम्ही नंदीला शतायुषी होण्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत कारण त्याच आयुष्य कमी आहे.’ (Latest Marathi News)
हे ऐकून शिलाद मुनींना खूप दुःख झाले. नंदीला सगळा प्रकार वडिलांकडून कळला. आपले आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्यापेक्षा नंदी जोरजोरात हसत म्हणाला, “मी सुद्धा तुमच्याप्रमाणे शंभोमहादेवाला प्रसन्न करणार आणि अल्पावधीचे विधीलिखीत बदलण्यास सांगेन”. नंदीच्या या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितला. तेव्हा नंदी म्हणाला, “मला तुमच्याजवळ राहायचं आहे ते पण कायमस्वरूपी.” तेव्हा शंभूमहादेवाने सांगितले, “तु माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्य असशील. (Top Marathi Headline)
समुद्रमंथनाची कथा
समुद्रमंथन ही पुराणकाळातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. या समुद्रमंथानाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर आले होते. ते कोणी तरी प्राशन करायला हवे हा एकमेव मार्ग होता. सगळ्या देवांनी हे काम फक्त महादेवच करू शकतात असा विचार करून त्यांना विषप्राशानाची विनंती केली होती. महादेवांनी हलाहल विष प्यायल्यानंतर त्यांचा गळा निळसर पडला आणि त्यांना जळजळ व्हायला लागली. म्हणुन त्यांना नीळकंठ असे म्हटले जाते. महादेव ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करत परंतु त्यांच्या गळ्यात होणाऱ्या जळजळमुळे ते ध्यान करू शकत नव्हते. त्या वेळेस नंदी त्यांच्यासमोर बसून त्यांच्या गळ्याला फुंकर घालु लागला ज्यामुळे महादेवांच्या गळ्यात होणारी जळजळ थांबली. तेव्हापासून महादेवाची ध्यानस्थ समाधी तुटू नये म्हणुन नंदी त्यांच्यासमोर फुंकर घालत असतो असतो असे सांगितले जाते. (Top Trending Headline)
========
Mahashivratri : मासिक शिवरात्री आणि महाशिवरात्री यात काय आहे फरक?
Mahashivratri : महाशिवरात्रीला घरी अशा पद्धतीने भगवान शंकराची पूजा केल्यास मिळेल उत्तम फळ
Mahashivratra : महाशिवरात्र साजरी करण्यामागच्या आख्ययिका
========
नंदीजींचे मुख भगवान शंकराकडे आहे. त्यांची ही मुद्रा महादेवावर अटळ लक्ष आणि भक्तीचे प्रतीक आहे. त्यांचे लक्ष फक्त त्यांच्या उपासकाकडेच असते. नंदी हा शंकरांच्या गाभाऱ्याबाहेर आहे कारण तो पूर्णतः सावध आहे. सुस्त किंवा निष्क्रिय बसलेला नाहीये. अत्यंत सक्रीय, पूर्णतः जागरूक आणि जीवनाने भरलेला, पण कोणतीच अपेक्षा किंवा मागणी करत नाहीये. तो ध्यान करत बसला आहे. (Top Stories)
नंदीचे मुख कायम भगवान शंकराकडे आहे. त्यांची ही मुद्रा महादेवावर अटळ लक्ष आणि भक्तीचे प्रतीक आहे. त्यांचे लक्ष फक्त त्यांच्या उपासकाकडेच असते. नंदीला आपली इच्छा सांगतांना ती नंदीच्या डाव्या कानात सांगावी. प्रार्थना करतांना दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घ्या जेणेकरून कोणीही तुमची प्रार्थना ऐकू शकणार नाही. नंदीच्या कानात प्राथना सांगितल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
