Home » Health : पपई खाल्ल्याने होतात ‘हे’ मोठे चमत्कारिक फायदे

Health : पपई खाल्ल्याने होतात ‘हे’ मोठे चमत्कारिक फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

आपल्या आरोग्यासाठी अन्न जेवढे आवश्यक आहे त्याहून अधिक लाभदायक आहे फळं. एकवेळेस तुम्ही जेवण केले नाही तरी चालेल मात्र फळं खाणे खूपच आवश्यक आणि फायदेशीर आहे. निरोगी जीवनासाठी कायमच फळं खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात. बाजारात नानाविध प्रकारचे असंख्य फळं मिळतात. प्रत्येक फळाचे आपले स्वतःचे असे खास वैशिष्ट्य असते. ते फळ खाल्ल्याने शरीराला विविध प्रकारचे अनेक फायदे होतात. याच फळांमधील अतिशय लोकप्रिय आणि आवडीने खाल्ले जाणारे एक फळ म्हणजे ‘पपई’. अतिशय रसाळ, गोड चवीची पपई अनेकांचा तर जीव की प्राण आहे. मात्र हीच पपई आरोग्याच्या आणि शरीराच्या दृष्टीने अमृत समजली जाते. ती खाण्याचे अनेक उत्तम फायदे आपल्या शरीराला होतात. त्यामुळे ही पपई जर तुम्ही खात नसाल तर हा लेख वाचून नक्की खायला सुरुवात करा आणि जर खात असाल तर आता अधिक सकारात्मक दृष्टीने खा. चला जाणून घेऊया याच पपईचे नक्की कोणते फायदे होतात. (Health)

रोगप्रतिकारशक्ती वाढते
पपईमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. तसेच व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. इतकंच नाही तर पपईमध्ये ल्युटिन आणि झेक्सॅन्थिन कॅरोटीनोईड्स सारखे घटकदेखील आढळतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. (Todays Marathi Headline )

मधुमेहींसाठी लाभदायक
पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमध्ये केवळ काही ग्रॅमच साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे चांगले आहे. पपई खाल्ल्याने मधुमेह होण्यापासून देखील बचाव होतो. (Health Care)

डोळ्यांचे आरोग्य सुधारते
पपईमध्ये व्हिटमिन ए मोठ्या प्रमाणात असते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत आवश्यक आहे. वाढणाऱ्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता दाट असते. त्यामुळे या समस्येपासून वाचण्यासाठी पपईचा आहारात समावेश केल्यास नक्कीच फायदा होईल. (Marathi)

सांधेदुखीपासून आराम
पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच चांगले आहे. पपईतील व्हिटामीन सी सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात. (SOcial Updates)

पचन सुधारते
आजकालच्या आधुनिक काळात खाण्याच्या सवयी बदल्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता देखील वाढलेली दिसून येते. अशावेळी पपई खाल्ल्याने चुकीच्या खाण्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते. पपईमध्ये कॅरोटेनॉइड्स, अल्कालॉइड्स, मोनोटेरपेनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स असतात. (Top Marathi Headline)

Health

वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी पपई खूप प्रभावी आहे हे तुम्हाला माहित नसेल. जे लोकं बऱ्याच काळापासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यात पपई खावी. पपई खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. (Latest Marathi News)

त्वचेसाठी फायदेशीर
पपई हे एक असे फळ आहे जे व्हिटॅमिन सी सह अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे त्वचेसाठी देखील खूप आरोग्यदायी आहे. याशिवाय शरीर डिटॉक्सही होते. (Top Trending Headline)

मासिक पाळीचा त्रास कमी
अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.

कर्करोगापासून बचाव
पपईमधील ऍन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते. (Top Marathi News)

ताण-तणाव कमी
दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

कोलेस्टेरॉल नियंत्रणात
ज्यांचे कोलेस्टेरॉल वाढले आहे किंवा ज्यांना मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी पपई खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज रिकाम्या पोटी पपईचे सेवन करावे. कारण यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही पपई फायदेशीर मानली जाते. (Latest Marathi HEadline)

बॉडी डिटॉक्स
आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तसेच अपौष्टिक जेवणामुळे आपल्या आहारातून शरीरात अनेकदा विषद्रव्यांची निर्मिती होते. हे विषारी द्रव्य आपल्याला वेळोवेळी बाहेर फेकावे लागतात. याला बॉडी डिटॉक्स म्हणजे शरीर विषमुक्त करणे म्हणतात. पपई हे नैसर्गिकरित्या शरीर विषमुक्त करते. त्यामुळे आपला खर्चही वाचतो. (Top Stories)

========

Health : भिजलेल्या मेथी दाण्याचे पाणी अमृतापेक्षा कमी नाही, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Health : थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

========

लक्षात ठेवा
पपईमध्ये ऑक्सॅलिक ॲसिड असते. ज्यामुळे व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. ज्यांना आधीच किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी देखील पपई खाणे टाळले पाहिजे. कारण यामुळे तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात. पपईचे सेवन केल्याने काहींना अतिसार, बद्धकोष्ठता किंवा पोटदुखी यांसारख्या पोटाच्या समस्या वाढवू शकते. त्यामुळे ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी पपई खाणे टाळले पाहिजे. काही लोकांना पपई खाल्ल्याने ऍलर्जी असू शकते. जसे की, तोंडात खाज येणे, पुरळ येणे, पोटदुखी किंवा श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे पपई खाल्ल्यानंतर ही लक्षणे दिसत असतील तर त्यांनी पूर्णपणे खाणे टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही औषधे पपईवर घेतल्याने रिअॅक्शन होऊ शकते. तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल तर पपई खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Social News)

(टीप : या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.