सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना “महादेव” असे संबोधले जाते. महादेव यांच्यावर श्रद्धा नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. या संपूर्ण त्रैलोक्याचा संहार करण्याची ताकद फक्त आणि फक्त महादेवांमध्ये आहे. अशा महादेवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे ‘महाशिवरात्री’. रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी होणारी महाशिवरात्री साजरी होत आहे. पौराणिक मान्यतेनुसार, महादेव नेहमी ध्यानमग्न असतात; परंतु, महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यानावस्थेतून बाहेर येतात. या दिवशी शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात, त्यामुळे भक्ताने केलेली थोडीशी सेवा आणि आर्त साद थेट महादेवांपर्यंत पोहोचते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण महादेवांशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती घेत आहोत. यातलीच एक गोष्ट म्हणजे महादेवाचे निवासस्थान. महादेव हे स्मशान भूमीमध्ये राहतात असे आपण कायम ऐकतो. पण महादेव स्मशानामध्ये का राहतात याचे उत्तर कोणाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया. (Mahashivratri)
भगवान शिव संसारिक असूनही ते स्मशानात निवास करतात. शिव हे संहारक आणि परिवर्तनाचे देवता मानले जातात, आणि स्मशानभूमी ही मृत्यू आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे. यामुळे त्यांचे स्मशानाशी असलेले नाते खोलवर आहे. शिव स्मशानभूमीत राहतात कारण ते म्हणतात की या जीवनात काहीही कायम नाही. शिव आपल्याला आपले जीवन संतुलित ठेवण्यास शिकवतात. स्मशानभूमी ही जीवनाच्या नश्वरतेची आठवण करून देते. शिव जे वैराग्य आणि तपस्वी जीवनाचे प्रतीक आहेत, स्मशानात राहून मानवाला मायेच्या बंधनातून मुक्त होण्याचा आणि आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाचा विचार करण्याचा संदेश देतात. शिव संहारक असले तरी त्यांचा संहार हा सृष्टीच्या नवनिर्मितीसाठी आहे. स्मशानभूमी ही जिथे शरीर नष्ट होते, तिथे शिवाचे निवासस्थान त्यांच्या परिवर्तनशील शक्तीचे प्रतीक आहे. (Todays Marathi Headline)

हा संसार मोह-मायेचा प्रतिक असून स्मशान वैराग्याचे. महादेव सांगतात की, या संसारात राहून आपले कर्तव्य पूर्ण करावेत, परंतु मोहमायेपासून दूर राहावे. कारण हा संसार नश्वर आहे. कधी न कधी हे सर्व नष्ट होणार आहे. यामुळे संसारात राहून कोणताही मोह न बाळगता आपले कर्तव्य पूर्ण करत वैरागीप्रमाणे आचरण करावे. जेव्हा मनुष्य आपल्या सर्व मर्यादा तोडू लागतो तेव्हा महादेव त्याचा संहार करतात. ज्या लोकांना आपल्या पाप कर्माचे फळ भोगावे लागते तेच प्रेतयोनी प्राप्त करतात. या सर्वांना महादेव दंडित करतात, कारण शिव संहार देवता आहेत. या कारणामुळे यांना भूत-प्रेतांचा देवता मानले जाते. (Latest Marathi HEadline)
वास्तवामध्ये जे भूत-प्रेत आहेत ते केवळ एक सूक्ष्म शरीराचे प्रतिक आहेत. महादेवाचा यामागे असा संदेश आहे की, प्रत्येक प्रकारचा जीव ज्याची सर्वजण घृणा करत किंवा त्याला घाबरतात तोसुद्धा महादेवाजवळ पोहोचू शकतो, अट केवळ एवढीच आहे की त्याने स्वतःचे सर्वस्व महादेवाला समर्पित करावे. स्मशान ही शांत आणि एकांताची जागा आहे, जिथे सांसारिक व्याकरणापासून दूर राहून ध्यान आणि तपश्चर्या करता येते. शिव, जे योगी आणि तपस्वी आहेत, अशा ठिकाणी ध्यानमग्न राहणे पसंत करतात. (Top Trending News)
========
Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीचा उपवास करताय? जाणून घ्या पूजेचे नियम
========
शिवाला भूतनाथ किंवा भूतांचा स्वामी म्हणतात. स्मशानात राहून ते सर्व प्रकारच्या आत्म्यांवर नियंत्रण ठेवतात आणि त्यांचे रक्षण करतात, ज्यामुळे त्यांचे स्मशानाशी नाते अधिक दृढ होते. शिव सर्वांचे स्वीकार करतात, मग ते साधू असोत, भूत असोत किंवा समाजाने नाकारलेले असोत. स्मशानात राहून ते सर्व जीवांप्रती समानता आणि करुणा दाखवतात. पौराणिक कथांनुसार, शिव अनेकदा स्मशानात भस्म लावून, ध्यानमग्न अवस्थेत दिसतात, जे त्यांच्या वैरागी आणि अलिप्त स्वभावाचे दर्शन घडवते. त्यामुळे स्मशान हे शिवाच्या तत्त्वज्ञानाचे आणि शक्तीचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. (Social News)
(टीप : येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे दिलेली आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
