सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु आहे. आणि लवकरच व्हॅलेंटाइन डे येणार आहे, हा दिवस म्हणजे प्रेमाचा उत्सव. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम हे खूपच महत्त्वाचे असते. त्यामुळे व्हॅलेंटाइन डे हा केवळ वयानुसार किंवा व्यक्तीनुसार साजरा केला जात नाही. हा डे प्रेमासाठी, प्रेम करणाऱ्या लोकांनी साजरा केला जाणारा विशेष दिवस आहे. आता एवढा खास दिवस म्हटल्यावर आपल्या जोडीदाराला गिफ्ट देणे ओघाने आलेच की. सध्या व्हॅलेंटाइन वीक चालू असून लवकरच येणाऱ्या व्हॅलेंटाइन डे साठी अनेक कपल आपल्या जोडीदाराला काय गिफ्ट द्यावे या विचारत असतील. प्रत्येकालाच असे वाटते की, आपले गिफ्ट हे खास असण्यासोबतच बजेट फ्रेंडली, वापर करता येईल आणि आवडेल असे असावे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला काय गिफ्ट द्यावे हे सुचत नसेल तर आज आम्ही तुम्हाला गिफ्टच्या काही कल्पना सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला गिफ्ट घ्यायला नक्कीच मदत होईल. (Valentine Day)
स्मार्ट वॉच
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या जोडीदाराला काहीतरी खास द्या आणि त्याला/तिला मनगटाचे घड्याळ भेट द्या. या डिजिटल युगात, आपल्या प्रियकराला डिजिटल घड्याळ भेट देणे ही एक चांगली कल्पना आहे. स्मार्ट घड्याळात अनेक वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन चांगली घड्याळ खरेदी करू शकता. याचे अनेक प्रकार आहेत. (Marathi NEws)
ब्लूटूथ स्पीकर
जर तुमच्या प्रियकराला सोलो गाणी आवडत असतील तर तुम्ही त्याला चांगला स्पीकर देऊ शकता. ब्लूटूथ स्पीकर्सचे अनेक प्रकार आहेत. जर तुमच्या जोडीदारालाही गाणे आवडत असेल तर त्याला माइकसह स्पीकर द्या. (Marathi)
ज्वेलरी ऑर्गनायझर
अनेक महिलांना दागिने घालायला आवडतात. म्हणूनच ते सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी ऑर्गनायझर दिलेला तिला आवडेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला आनंदी करायचे असेल आणि त्यांना कस्टमाइज्ड ज्वेलरी बॉक्स देणे हा एक उत्तम पर्याय आहे. आता परवडणाऱ्या किमतीत सुंदर डिझाइनमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. (TOdays Marathi Headline)
डिनर प्लॅन करा
तुमच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी रोमँटिक डिनर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्ही त्यांचे आवडते पदार्थ स्वतः तयार करू शकता किंवा त्यांना त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाऊ शकता. हा दिवस आणखीन खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीचे गाणे त्या ठिकाणी लावू शकता. (Top Marathi HEadline)

अल्बम तयार करा
तुमच्या जोडीदारासोबतच्या तुमच्या नात्यातील सुंदर क्षणांच्या फोटोंचा अल्बम बनवणे हे एक चांगली कल्पना आहे. तुम्ही ते खास फोटो निवडू शकता आणि त्यावर काही प्रेमळ कोट्स लिहू शकता. ही फक्त एक गिफ्ट ठरणार नाही तर या गिफ्टमुळे तुमचे नाते देखील दृढ होईल. तुम्ही स्वतः अल्बम तयार केलेला पाहून तुमच्या जोडीदाराला जास्त आनंद होईल. (Latest Marathi News)
ट्रिप प्लॅन करा
प्रवास करायला आवडणाऱ्या जोडप्यांसाठी लहान सुट्टीचे नियोजन करणे ही एक परिपूर्ण व्हॅलेंटाईन भेट असू शकते. नवीन ठिकाणी एकत्र वेळ घालवल्याने कायमस्वरूपी आठवणी निर्माण होतात. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक खास पद्धतीने आश्चर्यचकित करू शकता. तुम्ही त्यांना एखाद्या ठिकाणी सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी घेऊन जाऊ शकता. जोडीदारासोबत नैसर्गिक आणि शांत ठिकाणी वेळ घालवणे हे खूप रोमँटिक ठरेल. (Top Trending Headline)
हेडफोन
आजकाल बाजारात अनेक प्रकारचे ट्रेंडी हेडफोन्स उपलब्ध आहेत. विशेषत: हेडफोन्स हे गाणी ऐकण्यासाठी फार सुरक्षित असतात. यामुळे तुमच्या कानाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे तुमच्या पार्टनरसाठी हा देखील चांगला ऑप्शन असू शकतो. (Top Marathi News)
पुस्तक
जोडीदाराला वाचनाची आवड असले तर तुम्ही एखादे त्याच्या आवडीचं पुस्तक गिफ्ट देणंच उत्तम ठरेल. अनेकांना पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर तासनतास पुस्तकांसोबत वेळ घालवायला आवडतं. आजच्या आधूनिक जगात अनेक जण इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर पुस्तकं वाचतात. तुमचा प्रियकरही असाच वाचनासाठी वेडा असेल तर त्याला एखादं त्याच्या आवडीचं अथवा बऱ्याच दिवसांपासून तो शोधत असलेलं एखादं पुस्तक गिफ्ट करा. (Social Updates)
पॉवर बँक
जर तुमच्या पार्टनरचं मोबाईलवर जास्त काम असेल किंवा मोबाईलची बॅटरी सतत डाऊन होत असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला पॉवर बँक गिफ्ट करू शकता. प्रवासातही अनेक वेळा पॉवर बँक कामी येते. अशा वेळी तुम्ही व्हॅलेंटाईन गिफ्टमध्ये पॉवर बँक देऊ शकता. (Top Stories)
=======
Valentine Week : गुलाबाच्या प्रत्येक रंगामागचा अर्थ माहितीये का?
Valentine Week : व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात रोझ डे नेच का होते?
=======
परफ्युम
प्रत्येकाची परफ्युमची आवड ही वेगवेगळी असते. ज्यामुळे तुमच्या बॉयफ्रेन्डला नेमका कोणता फ्रेग्नन्स आवडतो हे ठरवून तुम्ही त्याच्यासाठी हे गिफ्ट सिलेक्ट करू शकता. यातून तुमच्या बॉयफ्रेन्डला तुम्ही यातून सरप्राईझ देऊ शकता. त्याच्या आवडीनिवडी जपल्यामुळे त्याला नक्कीच आनंद होईल. (Latest Marathi Headline)
वायरलेस बड्स
जर तुमच्या जोडीदाराला गाणी ऐकण्याची आवड असेल, तर तुम्ही त्यांना कोणतीही वायरलेस बड्स भेट म्हणून देऊ शकता. भेटवस्तू देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हे डिव्हाईस तुम्हाला 22 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देऊ शकते. यामध्ये तुम्हाला इमर्सिव्ह गेम मोड आणि उत्तम आवाजाची गुणवत्ता यांसारखी फीचर्स मिळतील. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
