Home » Mahashivratri : मासिक शिवरात्री आणि महाशिवरात्री यात काय आहे फरक?

Mahashivratri : मासिक शिवरात्री आणि महाशिवरात्री यात काय आहे फरक?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mahashivratri
Share

हिंदू धर्मामध्ये भगवान शिव हे या सृष्टीचे संहारक म्हणून ओळखले जातात. त्रिमूर्तीमधील मुख्य देवता असलेल्या भगवान शिवांना समर्पित अनेक दिवस आणि सण साजरे केले जातात. चातुर्मास, श्रावण, प्रदोष, शिव चतुर्दशी, महाशिवरात्री दर महिन्याला येणारी मासिक शिवरात्री. आदी सर्वच दिवस शंकरांना समर्पित आहेत. यातला महाशिवरात्रीचा हा भगवान शिव यांना समर्पित सर्वात महत्त्वाचा व्रत आणि सण आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यंदा १५ फेब्रुवारीला महाशिवरात्रचा उत्सव आहे. महाशिवरात्र साजरी करण्यामागे अनेक मान्यता आहेत. महाशिवरात्रीसोबतच दर मासिक शिवरात्री देखील साजरी केली जाते. अनेक लोकं मासिक शिवरात्री आणि महाशिवरात्रींमध्ये गोंधळन जातात तर काहींना या दोन्ही शिवरात्री एकच वाटतात. आज आपण या लेखातून या दोन शिवरात्रींमधला फरक जाणून घेऊया. (Shiv)

शिवरात्री कधी साजरी करतात?
शिवरात्रीचा सण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. त्यामुळे याला मासिक शिवरात्री असेही म्हणतात. या व्रताचे दुसरे नाव शिव चतुर्दशी असेही प्रसिद्ध आहे. अशाप्रकारे, शिवरात्रीचा सण वर्षातून १२ वेळा आणि महाशिवरात्रीचा सण वर्षातून फक्त एकदाच साजरा केला जातो. यामुळेच महाशिवरात्रीचे महत्त्व शिवरात्रीपेक्षा अधिक मानले जाते. (Todays Marathi Headline)

महाशिवरात्री कधी साजरी करतात?
धर्मग्रंथानुसार, महाशिवरात्रीचा सण वर्षातून एकदा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. असे मानले जाते की याच तिथीला महादेव पहिल्यांदा लिंग रूपात प्रकट झाले होते. याच रूपात त्यांनी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची परीक्षा घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी या तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्रीचा सण १५ फेब्रुवारी, रविवार रोजी साजरा केला जाईल. (Marathi)

Mahashivratri

शिवाय धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न या दिवशी झाले होते. म्हणून हा दिवस खूप शुभ मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि शक्ती एक झाले, म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस आध्यात्मिक उन्नती देणारा मानला जातो. यानिमित्ताने मंदिरांमध्ये शिव-पार्वतीची विशेष पूजा केली जाते, भाविक या दिवशी उपवास करतात आणि अनेक ठिकाणी शिव मिरवणूक देखील काढली जाते. या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते. असे म्हटले जाते की ही रात्र मोक्ष मिळविण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते. या दिवशी रात्रभर जागरण करून खऱ्या मनाने शिवाची पूजा करतो तर भोलेनाथ त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. (Latest Marathi News)

धार्मिक मान्यतेनुसार, मासिक शिवरात्रीला फक्त महादेवाची पूजा केली जाते. तर महाशिवरात्रीमध्ये महादेवासह पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. मासिक शिवरात्रीची उपासना म्हणजे महादेवाला आपल्या मनात ठेऊन आणि स्वतःला त्यांचा अंश मानून स्वतःला शरण जाणे. तर महाशिवरात्रीची पूजा म्हणजे मनातील अग्नी तत्व जागृत करणे, कारण या दिवशी महादेवाने शिवलिंगाच्या रूपात प्रथमच दर्शन दिले होते. शिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने महादेवाचा आशीर्वाद मिळतो, तर महाशिवरात्रीला पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व दुःख दूर होत नात्यात मधुरता येते. (Top Marathi Headline)

=========

Shanipradosh : जाणून घ्या शनि प्रदोष व्रताचे महत्व आणि मुहूर्त

=========

शिवाची पूजा रात्रीच का करतात?
मासिक शिवरात्री आणि महाशिवरात्रीमध्ये महादेवाची पूजा रात्री करण्याची परंपरा आहे, कारण महादेवांनी रात्रीच्या वेळी लिंग रूपात अवतार घेतला होता. या दोन्ही व्रतांमध्ये रात्रीच्या चारही प्रहरी शिवजींची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण केले जाते. या व्रतांशी संबंधित असे अनेक नियम आहेत, जे त्यांना खास बनवतात. (Social News)

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.