Home » Mahashivratri : महाशिवरात्रीला घरी अशा पद्धतीने भगवान शंकराची पूजा केल्यास मिळेल उत्तम फळ

Mahashivratri : महाशिवरात्रीला घरी अशा पद्धतीने भगवान शंकराची पूजा केल्यास मिळेल उत्तम फळ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mahashivratri
Share

महाशिवरात्रीचा उत्सव येत्या रविवारी, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्री माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. या वर्षी महाशिवरात्री रविवारी येते आणि दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने शिवभक्तांसाठी ती आणखी शुभ असेल. महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या पूजेचा सर्वात मोठा दिवस आहे. अत्यंत साध्या पण भक्तीपूर्ण विधीने तुम्ही शिवपूजन करू शकता. महाशिवरात्रीला सूर्यास्तानंतर रात्री भगवान शंकराची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचे आणि फलदायक मानले जाते. चार रात्रीच्या पूजेची वेळ शिवरात्रीला रात्रभर जागून चार वेळा पूजा करण्याची प्रथा आहे, ज्याची वेळ खालीलप्रमाणे असणार आहे. पहिला प्रहर: संध्याकाळी ६:११ ते रात्री ९:२३, दुसरा प्रहर: रात्री ९:२३ ते पहाटे १२:३५, तिसरा प्रहर: सकाळी १२:३५ ते पहाटे ३:४७, चवथा प्रहर: पहाटे ३:४७ ते पहाटे ६:५९ असेल. (Mahashivratri)

महाशिवरात्रीबद्दल अशी मान्यता आहे की शिव-पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता, परंतु शिवपुराणासह कोणत्याही धर्मग्रंथात याचा उल्लेख नाही. शिवपुराणात असे लिहिले आहे की फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौदाव्या दिवशी म्हणजेच चतुर्दशी तिथीला शिवलिंग पहिल्यांदा प्रकट झाले. मग भगवान विष्णू आणि ब्रह्माजींनी शिवलिंगाची पूजा केली. या दिवसाला शिवरात्री असे म्हणतात. शिवपुराणाच्या ३५ व्या अध्यायात असे लिहिले आहे की शिवविवाह मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी झाला होता. (Marathi)

महाशिवरात्री दिवशी उपवास, पूजा आणि जागरण यांना महत्त्व आहे. महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, अशी मान्यता आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असते, अशा वेळी तुम्ही घरच्या घरी शिवशंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा करु शकता. असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतात. या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक करणे अधिक लाभदायक मानले जाते. महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते. (Todays Marathi Headline)

Mahashivratri

महाशिवरात्रीला घरी पूजा करण्याचा विधी
– सकाळी स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करुन नंतर भगवान शंकराचे व्रत करावे. दिवसभर ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करावा. या पूजेत त्रिपुंडाचे (चंदनाचा तीन बोटांनी कपाळावर लावलेला टिळा) विशेष महत्त्व आहे. (Top Marathi News)
– सूर्यास्तानंतर संध्याकाळी शुभ मुहूर्तावर घरातील पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे. पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असले पाहिजे.
– आता उत्तर दिशेला तोंड करुन तीन बोटांनी कपाळावर डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला चंदन लावा त्रिपुंड टिळा लावा.
– हातात रुद्राक्ष आणि बेलपत्र घेऊन या मंत्राचा उच्चार करुन उपासनेचा संकल्प करा. ममखिलपापक्षयपुरवक्षलभिष्टसिद्धये शिवप्रित्यर्थम् च शिवपूजन्म करिष्ये
– घरातील शिवलिंगावर दूध, दही, साखर, मध, तूप, गंगा जल, ऊसाच्या रसाने अभिषेक करावा. बेलपत्र अर्पण करुन शिवलिंग नसेल तर मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी. (Top Trending Headline)
– ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वरुकमिव बंधनं मृत्युोर्मक्ष्य ममृतत् ॥ – भगवान शंकराला अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा. या मंत्राचा जप केल्याने भगवान शंकर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
– भस्म किंवा चंदनाने शिवलिंगाला त्रिपुंड टिळा लावा. ११ बेलपत्रांवर ॐ लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना या मंत्राचा जप करा – ‘त्रिदलं त्रिगुणाकरम् त्रिनेत्रम् च त्रिधायुतम्. त्रिजन्मपापसहरं बिल्वपत्र शिवार्पणम् ॥’ (Scoial Updates)
– शिवलिंगावर बेल, भांग, धोतऱ्याचं फूल, अबीर, गुलाल, शमीपत्र, मूठभर अक्षता अर्पण करा. धूप आणि चौमुखी तुपाचा दिवा लावून भगवान शंकर चालिसा पठण करावे.
– धोतरा फोडून त्याचं फळ शिवलिंगावर अर्पण करा. हे भगवान शंकराचे आवडते फळ आहे. भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र, महान, भीम आणि ईशान या आठ नावांनी फुले अर्पण करुन भगवान शंकराची अर्धी परिक्रमा करावी. (Top Stories)

शिवलिंग अभिषेक पद्धत
महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करा, त्यानंतर पूजा सुरू करा. अर्पण करायच्या पाण्याव्यतिरिक्त, दूध, मध, तूप आणि गंगाजलची व्यवस्था करा. प्रथम गंगाजल पाण्यात मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा, नंतर दूध, मध आणि तूपाने अभिषेक करा आणि नंतर पुन्हा एकदा गंगाजलने शिवलिंगाचा अभिषेक करा. यानंतर, शिवलिंगावर बेलपत्र, मोळी, अक्षत, फळे, सुपारी, सुपारी इत्यादी अर्पण करा. नंतर देशी तुपाचा दिवा लावा, आरती करा आणि शिव मंत्रांचा जप करा. देवाला फळे, हलवा, दूधाची खीर आणि सुकामेवा अर्पण करा. यानंतर लोकांना प्रसाद वाटा. (Latest Marathi Headline)

=========

Mahashivratra : महाशिवरात्र साजरी करण्यामागच्या आख्ययिका

Mahashivratri : जाणून घ्या महाशिवरात्रीची तारीख आणि शुभ मुहूर्त

=========

महाशिवरात्रीनिमित्त महादेवाला काय अर्पण करावे?
महादेव यांना पांढरा रंग खूप आवडतो. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर महादेव यांना साबुदाणा किंवा मखानापासून बनवलेली खीर अर्पण करा. यामुळे महादेव प्रसन्न होतात. या दिवशी देवाला खवा बर्फी अर्पण करणे देखील शुभ मानले जाते. शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला थंडाईचा प्रसाद अर्पण करणे देखील लाभदायक असते. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून बाहेर पडलेले विष प्यायल्यानंतर भगवान शंकरचे शरीर खूप जळू लागले. त्यांच्या शरीराची जळजळ कमी करण्यासाठी देवतांनी त्यांना थंडाई अर्पण केली. तेव्हा थंडाई प्यायल्याने भगवान शंकर यांना शांत वाटले असे सांगण्यात येते. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेदरम्यान महादेवाला भांग आणि धतुऱ्याचे फुल अर्पण करा. तसेच या दिवशी तुम्ही भांग थंडाईमध्ये मिक्स करून अर्पण करू शकता. पूजेमध्ये पंचामृताचे विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पूजेदरम्यान शिवलिंगावर पंचामृत अर्पण केले तर पूजा यशस्वी होते. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.