आपण कायमच आजारी पडलो की लगेच डॉक्टरकडे जातो आणि खूप महागडे आणि भरपूर औषधं घेऊन येतो. मात्र आपल्या पूर्वजांनी आपल्या प्रत्येक लहान मोठ्या आजाराचे औषध आपल्या घरातच किंबहुना आपल्या किचनमध्ये असल्याचे आधीच लिहून ठेवले आहे. आयुर्वेदानुसार आपल्या सर्वच आजारांचे औषध किचनमध्ये आहे. आपल्या किचनमध्ये आणि स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू या कुठे ना कुठे आपल्या निरोगी ठेवण्यामध्ये मोठी भूमिका बजावत असतात. त्यामुळे आपण काही त्रास झाल्यानंतर लगेच डॉक्टरकडे जाण्याआधी घरातील काही उपाय करून पाहावे. जेणेकरून आपला वेळ, पैसा तर वाचेल सोबतच आपल्या शरीराला कोणताही त्रास किंवा साइड इफेक्ट होणार नाही अशी औषध पोटात जातील. (Health)
आता तुम्ही म्हणाल किचनमधल्या थोड्याफार गोष्टींचा वापर आम्ही आजारपणात करतच असतो. जसे की सर्दी खोकला झाला की आलं आणि मध वापरतो. उष्णता वाढली की, ताक पितो आदी गोष्टी वापरतो, पण यापेक्षा अजून दुसरे काय करता येईल? तुम्हाला जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल आपल्या किचनमधील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पदार्थ आपल्या आजारांवर एक उत्तम उपाय आहे. मात्र आपण याबद्दल जाणूनच घेत नाही. आज आम्ही तुम्हाला किचनमधल्या अशाच एका वस्तूचे गुणधर्म सांगणार आहोत. जे ऐकून तुम्ही नक्कीच हा पदार्थ, ही गोष्ट खाण्यास सुरुवात कराल. हा पदार्थ आहे ‘मेथी दाणे’. (Methi Water)
आता मेथी दाणे ऐकून अनेकांच्या कपाळावर आठ्या आल्या असतील, अनेकांची तोंडं वाकडी झाली असतील. कडू मेथी दाणे नको असे विचार डोक्यात येत असतील. मात्र असे असले तरी मेथी दाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अमृतच आहे. कारण मेथी दाण्यांचा आपण आपल्या जेवणामध्ये दररोजच्या जीवनामध्ये वापर केला तर नक्कीच तुम्ही निरोगी राहाल आणि डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही. अभ्यासानुसार, प्रत्येक १०० ग्रॅम मेथीच्या दाण्यामध्ये ६०% कर्बोदके, २५% आहारातील फायबर, २३ ग्रॅम प्रथिने, ६ ग्रॅम चरबी आणि ९ ग्रॅम पाणी असते. मेथीमध्ये विशेषतः पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. (Marathi)

ताज्या मेथीच्या पानांमध्ये सुमारे ८६% पाणी, ६% कार्बोहायड्रेट, ४% प्रथिने आणि सुमारे १% फायबर आणि चरबी असते. मेथी दाण्याचे पाणी उपाशीपोटी पिण्याचा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. भिजवलेल्या मेथी दाण्याचे पाणी हे अनेक आजारांवर गुणकारी ठरते. मेथी दाण्याचे पाणी पिण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. मेथी दाण्याचे पाणी पिण्याने पचनशक्ती सुधारण्यासह शरीरातील कमकुवतपणा कमी होतो आणि हाडंही मजबूत होतात. तसंच पोटातील चरबी कमी होऊन त्वरीत वजन कमी होते. मेथीच्या पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असतात, जे शरीराला हेल्दी ठेवत अनेक आजारांना दूर करतात. मात्र याचे सेवन कसे आणि किती प्रमाणात करावे हेदेखील माहीत असायला हवे. मेथीचे पाणी उपाशीपोटी पिण्याचे फायदे जाणून घ्या. (Health Care)
वजन कमी करण्यासाठी
तुम्हाला बऱ्याच काळापासून वजन कमी करायचे असेल तर मेथीचे पाणी यासाठी उपयुक्त ठरू शकते. या पाण्यात अधिक प्रमाणात फायबर असते, जे पोट भरलेले ठेवते. यामुळे अतिरिक्त भूक लागत नाही आणि उगीचच पदार्थ खाल्ले जात नाहीत. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसंच मेथी दाण्यातील आढळणारे गुण पोटावरील चरबी जाळण्यास मदत करतात. (Marathi News)
हाडे मजबूत करण्यासाठी
हाडे मजबूत ठेवण्यासाठी दररोज सकाळी भिजवलेल्या मेथीचे सेवन करावे. यामध्ये असलेले गुणधर्म आणि पोषक तत्व शरीराला निरोगी बनवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत.मेथीचे दाणे रोज रिकाम्या पोटी खाणे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. रोज अंकुरलेली मेथी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन सामान्य राहण्यास मदत होते. (Todays Marathi Headline)
कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत
मेथीच्या बियांमध्ये सॅपोनिन संयुगे असतात, जे कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करतात. मेथीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉल (LDL)ची पातळी कमी होते आणि चांगले कोलेस्टेरॉल (HDL)वाढते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. (Marathi)
पचनशक्तीसाठी फायदेशीर
भिजवलेल्या मेथी दाण्याचे पाणी पिण्यामुळे पचनाशी निगडीत समस्या दूर होतात. हे पाणी पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते. मेथीमधील फायबर हे मलत्याग करण्यास उपयुक्त ठरते. शौचाला कडक होत असण्याची समस्या असेल तर यामुळे त्यातून सुटका मिळते. तसंच मेथीच्या पाण्यात पाचक एंजाईम असून जेवण सोप्या पद्धतीने पचवते. (Top Marathi Stories)
ॲसिडिटीपासून आराम
अनेकांना थोडे जरी खाल्ले तरी देखील त्यांचे पोट फुगते. जर तुम्हाला असे जाणवत असेल तर त्यावर मेथी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला ॲसिडिटीची समस्या जाणवत असेल तर तुम्ही रात्री मेथी पाण्यात भिजत घाला आणि त्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी त्या भिजवलेल्या मेथी दाण्याचे सेवन करा. (Social Updates)

रोगप्रतिकारशक्ती वाढते
या सर्व व्यतिरिक्त, मेथीच्या दाण्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोहासह शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. भिजवलेल्या मेथीचे सेवन केल्याने तुमच्या शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास बळकट होण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला संसर्ग आणि रोग होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होतो. (Marathi Trending Headline)
मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी
भिजवलेल्या मेथी पाण्याच्या सेवनाने मधुमेह अर्थात डायबिटीस नियंत्रणात येण्यास मदत मिळते. मेथी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. हे पाणी नियमित पिण्याने डायबिटीस नियंत्रणात राहतो आणि शरीरही हेल्दी राहाते. हे पाणी डायबिटीसमुळे होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळवून देते. (Top Marathi NEws)
कफ कमी
मेथीचे दाणे उष्ण असतात. यामुळेच खोकल्यामध्ये याचा फायदा होतो. ज्यांना कफ होण्याची शक्यता असते ते मेथीचे दाणे चूर्ण, भिजवलेले, अंकुरलेले किंवा पूर्ण अशा कोणत्याही स्वरूपात खाऊ शकतात. पित्त असणाऱ्यांनी मेथीचे पाणी प्यावे किंवा बिया भिजवून खाव्यात. यामुळे आम्लपित्त आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळेल. (Latest Marathi HEadline)
हृदयासाठी फायदेशीर
हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यासाठीही भिजवलेल्या मेथी दाण्याच्या पाण्याचा उपयोग करून घेता येतो. मेथीचे पाणी पिण्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि हार्टसंबंधी आजारांपासून बचाव होतो. तसंच या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते. (Top Marathi Headline)
केसांना ठेवते निरोगी
मेथी केसांसाठीही आरोग्यदायी आहे. मेथीचे पाणी केसांना लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. जर तुमचे केस सतत तुटत असतील तर केसांमध्ये मेथी दाणे वापरणे सुरू करा. केसांमध्ये मेथीचा वापर करण्यासाठी दोन चमचे मेथी दाणे पाण्यात उकळा. थंड झाल्यावर या पाण्याने डोके धुवा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. मेथीच्या दाण्यांची पेस्ट तयार करा आणि ओल्या केसांना लावा. ३० मिनिटांनी केस थंड पाण्याने धुवा. (Marathi Trending News)
========
Health : थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
Health : काळे गाजर आहेत आरोग्याची खाण, सेवनाने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
========
त्वचेसाठी होईल फायदा
भिजवलेल्या मेथी पाण्यामुळे त्वचेला फायदा मिळतो. हे पाणी त्वचेची अलर्जी कमी करण्यास मदत करते. तसंच मेथीच्या पाण्याच्या सेवनाने त्वचेला पोषण मिळते आणि चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग निघून जाण्यास मदत मिळते. हे पाणी त्वचा मुलायम करण्यासह चमकदार होण्यासही मदत मिळते. (Top Stories)
मेथीचे पाणी कसे त्यावर करावे?
एक कप पाण्यात एक चमचा मेथीदाणे टाका. मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर मेथीदाण्यांचे पाणी गाळून घ्या. हे पाणी रिकाम्या पोटी प्या. मात्र लक्षात ठेवा मेथीचे पाणी जास्त खाल्ल्याने जुलाब होऊ शकतात. तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर मेथीचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मेथीचे पाणी पिण्याआधी गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Social News)
(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
