लवकरच भगवान शिवाची पूजा करण्याचा वर्षातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस येणार आहे. अर्थात महाशिवरात्री. भगवान शंकराना समर्पित असलेला हा दिवस वर्षातील महत्त्वाच्या सणांपैकी एक समजला जातो. शिवपार्वतीचा विवाहसोहळा या दिवशी पार पडला अशी कथा असल्याने महाशिवरात्रीला शिवशक्तीची पूजा केली जाते. जो भक्त मनापासून व्रत आणि पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी करतो त्याच्यावर महादेवाची पूर्ण कृपा होते व मनोकामना देखील पूर्ण होतात असे मानले जाते. येत्या रविवारी अर्थात १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र साजरी होणार आहे. त्याच निमित्ताने आपण महादेवांशी संबंधित काही गोष्टींची माहिती करून घेत आहोत. याआधी आपण शिवांनी आपल्या डोक्यावर चंद्र का परिधान केला याचे उत्तर जाणून घेतले. आज आपण शंकराला भस्म का अर्पण केले जाते? यामागचे कारण जाणून घेऊया. (Mahashivratra)
भगवान शिव कायम आपल्या शरीरावर चिंतेचे भस्म लावतात असे आपण ऐकले आहे. म्हणूनच त्यांना भस्म अर्पण करणे देखील शुभ समजले जाते. पण देवांना भस्म का आवडते, माहिती आहे का? भगवान शिव आपल्या शरीरावर भस्म लावतात. शिवभक्त ते भस्म टिळा म्हणूनही लावतात. भगवान शिव शरीरावर भस्म का वापरतात याचा उल्लेख शिवपुराणात आहे. त्यांच्या अंगावर सतत दिसणारी भस्म ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती जीवनाचे गूढ सत्य सांगणारी आहे. भस्म म्हणजे प्रेत जळाल्यानंतर उरलेली राख. याचाच अर्थ सगळं काही नाशवंत आहे पण सत्य हे अंतिम आहे. म्हणूनच शंकर आपल्या अंगाला भस्म लावून मोह माया यापासून लांब राहण्याची शिकवण देतात. (Lord SHiv)
पौराणिक कथेनुसार, असे म्हटले जाते की, देवी सतीच्या वडीलांनी महादेवांचा भर सभेत अपमान केला त्यामुळे क्रोधीत झालेल्या सतीने स्वत: ची अग्नीकुंडात आहुती दिली. त्यावेळी तिची झालेली राख महादेवांनी अंगाला फासली. तर काही दंतकथेनुसार असं देखील सांगितलं जातं की, एकदा भगवान शंकर स्मशानभूमीत ध्यानस्थ होते. पंचमहाभूतांचे संतुलन टिकवण्यासाठी ते लीन झाले होते. त्या वेळी देवता, ऋषी-मुनी आणि गण त्यांच्या दर्शनासाठी तेथे आले. धर्मग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की भगवान शिव कैलास पर्वतावर वास करत होते. तिथे खूप थंडी होती. अशा परिस्थितीत थंडीपासून वाचण्यासाठी ते अंगावर राख लावायचे. आजही बेल, मदारची फुले आणि दूध अर्पण करण्याव्यतिरिक्त जवळपास प्रत्येक शिवमंदिरात भस्म आरती केली जाते. (Todays Marathi Headline)

अजून एका आख्ययिकेनुसार आणि पौराणिक कथेनुसार, एक साधू होता जो खूप तपश्चर्या करून शक्तिशाली बनला होता. तो फक्त फळे आणि हिरवी पाने खात असे म्हणून त्याचे नाव ‘प्राणद’ असे ठेवले. त्या साधूने आपल्या तपश्चर्येने जंगलातील सर्व प्राण्यांवर ताबा मिळवला होता. एकदा एक साधू आपली झोपडी दुरुस्त करण्यासाठी लाकूड कापत असताना त्याचे बोट कापले गेले. बोटातून रक्ताऐवजी रस निघत असल्याचे साधूने पाहिले. (Top Marathi NEws)
साधूला वाटले की तो इतका शुद्ध झाला आहे की त्याचे शरीर रक्ताने नाही तर वनस्पतींच्या रसाने भरले आहे. यामुळे त्याला खूप आनंद झाला आणि तो अभिमानाने भरला. या घटनेनंतर साधू स्वत:ला जगातील सर्वात धार्मिक व्यक्ती समजू लागला. हे पाहून भगवान शंकरांनी वृद्धाचे रूप धारण केले आणि ते तेथे पोहोचले. म्हातार्याच्या वेशात भगवान शिवाने ऋषींना विचारले, ‘तो इतका आनंदी का आहे?’ साधूने कारण सांगितले. सर्व काही जाणून देवाने त्याला विचारले की हा फक्त वनस्पती आणि फळांचा रस आहे, परंतु जेव्हा झाडे आणि वनस्पती जळून जातात तेव्हा ते देखील राख होतात. शेवटी फक्त राख उरते. (Latest Marathi Headline)
भगवान शिवाने वृद्धाचे रूप धारण केले आणि लगेचच त्याचे बोट कापले आणि मग त्यातून राख निघाली. त्या साधूला जाणवले की स्वतः भगवान त्याच्यासमोर उभे आहेत. ऋषींनी आपल्या अज्ञानाबद्दल क्षमा मागितली. असे म्हणतात की तेव्हापासून भगवान शिवांनी आपल्या भक्तांना हे नेहमी लक्षात राहावे म्हणून त्यांच्या शरीरावर भस्म लावायला सुरुवात केली. शारीरिक सौंदर्याचा अभिमान बाळगू नका, अंतिम सत्य नेहमी लक्षात ठेवा असा संदेश यातून मिळतो. (Marathi News)
एकदा देवतांनी पाहिले की भगवान शंकर अंगाला भस्म लावून स्मशानात राहत आहेत. तेव्हा त्यांनी शंकरांना विचारले, “हे महादेवा, आपण वैभव, सुवर्ण, रत्ने सोडून भस्म का धारण करता?” त्यावर भगवान शंकर म्हणाले, “हे भस्म म्हणजेच अंतिम सत्य. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट नष्ट होते, पण भस्म उरते. जो या सत्याला ओळखतो, तोच मुक्तीच्या मार्गावर जातो.”अशी मान्यता आहे की, त्या वेळी देवतांनी स्मशानातील चिताभस्म गोळा करून मंत्रोच्चार करत भगवान शंकरांची आरती केली. हीच पहिली भस्म आरती मानली जाते. त्या आरतीत भस्म अर्पण करून देवतांनी अहंकाराचा त्याग आणि वैराग्य स्वीकारण्याची प्रतिज्ञा केली. आणखी एका आख्यायिकेनुसार, त्रिपुरासुराच्या वधानंतर त्या राक्षसांच्या तीन नगऱ्या जळून भस्म झाल्या. त्या भस्माने भगवान शंकरांनी अंग लेपले, ज्यातून त्यांनी दाखवून दिले की अधर्माचा अंत आणि धर्माचा विजय शेवटी भस्मातच विलीन होतो. (Top Stories)
========
Mahashivratra : महाशिवरात्र साजरी करण्यामागच्या आख्ययिका
Importance of the 12 Jyotirlingas : १२ ज्योतिर्लिंगांचे महत्त्व
========
महाशिवरात्रीच्या पूजेसाठी घरच्या घरी भस्म बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, बेल, पिंपळ, शमी, पालाश, वटवृक्ष, अमलता या वृक्षांचे लाकूड, मनुका, कडुलिंबाची साल, काजू, बदाम आदिसह शुद्ध गाईचे तूप आणि त्रिफळा चूर्ण हे साहित्या घ्या. भस्म बनवणे अगदी सोपे असून सर्वात आधी भस्मासाठी अवश्यक असलेले वरील सर्व साहित्य एकत्र करा. त्यानंतर हे सर्व साहित्याचे मिश्रण जाळून राख करा. जाळल्यानंतर उरलेल्या अवशेषांपासून पांढरा भाग वेगळा करा. हा पांढरा भाग म्हणजे भस्म, जो भगवान शिवाच्या पूजेत वापरला जातो. मान्यतेनुसार, महादेवाच्या पूजेच्या वेळी भस्म अर्पण केल्याने भक्तांच्या मनोकमना पूर्ण होतात. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
