आज ६ फेब्रुवारी शुक्रवार. शुक्रवार हा देवीचा दिवस समजला जातो. आज देवी लक्ष्मीची पूजा करून तिला प्रार्थना केल्याने नक्कीच तुम्हाला लाभ होईल. आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल जाणून घेऊया.
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. नोकरीत प्रमोशन होण्याचे योग बनतात. आज तुम्हाला तुमच्यात सकारात्मक बदल दिसतील. तुमचे काही महत्त्वाचे काम पूर्ण होईल.
वृषभ
आज तुम्हाला तुमच्या कामात यश प्राप्त होईल. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांना कौतुकाची थाप मिळेल. विद्यार्थी आपल्या मेहनतीने यश कमावतील. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला राहणार आहे.
मिथुन
आजचा दिवस अनुकूल आहे. आजचा दिवस उत्साहवर्धक असून, तुम्हाला तुमच्या कामाचे फळ देणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या वाढणाऱ्या खर्चाकडे लक्ष ठेवणे आवश्यक असून खर्च कंट्रोल करावा लागेल.
कर्क
कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमची वैयक्तिक कामे पूर्ण करण्यात बिझी असाल. नोकरीत तुमचे प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहेत. आज तुमची तुमच्या कार्यक्षेत्रात नक्कीच प्रगती होईल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या.
सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना आज यश मिळणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल शिवाय तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल असे काही घडेल.

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन प्रयत्न करण्याचा असेल. तुमच्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आज कोणी जवळची व्यक्ती मदत करू शकते. ऑफिसमध्ये तुमच्यावर जास्त काम असेल.
तूळ
आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सहलीचे नियोजन केल्यास नक्कीच यश मिळेल.आर्थिक बाबतीत तुम्हाला व्यवस्थित पैशांचे नियोजन करावे लागेल. आज तुम्ही आपल्या मित्रांना नक्की वेळ द्या. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्ही नियोजित केलेले काम आज पूर्ण होईल. आर्थिक स्थिती खूप सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नक्कीच लाभदायक ठरू शकतो. नोकरदार लोकांना आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल.
धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांचा आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण मदत मिळेल. आज महत्त्वाच्या कामांना आराम द्या. आरोग्याकडे देखील लक्ष द्या आणि आराम करा.
मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. घरात चांगली सुख शांती नांदेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्ही पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल.
कुंभ
आज तुमची सर्व जुनी कामे सहज पूर्ण होतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होईल.व्यापारात लाभ होईल. प्रमोशन होण्याची संधी मिळेल. तुमच्या काही समस्या आज कमी होतील.
मीन
आज तुमची प्रलंबित काम पूर्ण होईल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. काही खर्च नियंत्रित करणे कठीण होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल.
