भारतातील अनेक मंदिरे ही विज्ञानाला आव्हान देणारी आहेत. त्यातही दक्षिण भारतातील मंदिरे ही त्यांच्या अनोख्या वास्तुशास्त्रासाठी आणि त्यातील विज्ञानांसाठी ओळखली जातात. येथील काही मंदिरे चमत्कारांसाठी आणि गूढतेसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यातील भगवान विष्णूचे रूप असलेल्या भगवान नरसिंह यांना समर्पित एका मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. असे मानले जाते की, हे मंदिर ज्वालामुखीच्या टेकडीवर आहे. आंध्रप्रदेश या राज्यातील मंगलगिरी टेकडीवर असलेल्या पानकला लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. हे मंदिर म्हणजे, एक प्राचीन स्वयं-प्रकट गुहा मंदिर आहे. येथे भगवान नरसिंहाची मूर्ती भाविकांना दिसते. ही मूर्ती प्रसाद म्हणून गुळ आणि पाणी यांचे मिश्रण म्हणजेच स्थानिक भाषेत पनकम स्विकारते. देवाला फक्त शंखातून हे पाणी अर्पण केले जाते. ( Panakala Lakshmi Narasimha Swamy )

भगवान नरसिंह यांनी हे पाणी स्विकारल्यावर ते नेमके कुठे जाते, याचा शोध अद्यापही लागलेला नाही. मंदिरातील हे गुढ उलगडण्यासाठी अनेक संशोधकांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. भगवान नरसिंहाचा चमत्कार म्हणून या घटनेकडे पाहिले जाते. भारतातील भगवान नरसिंहाच्या ८ महत्त्वाच्या महाक्षेत्रांपैकी एक हे मंदिर असून येथे भाविकांची मोठी गर्दी होते. विज्ञान आणि अध्यात्माबाबात नेहमी वादविवाद आणि चर्चा होतात. मात्र आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे चमत्कार सरस ठरतात. तेथील गुढ गोष्टींबाबत उत्सुकता कधीही कमी होत नाही.
अशा मंदिरांमध्ये दक्षिण भारतातील काही मंदिरांचा समावेश होतो. त्यातील आंध्रप्रदेशचे पानकला लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे प्रमुख आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मंगलागिरी येथील या पानकला नरसिंह स्वामी मंदिरात अनेक रहस्ये आहेत. या मंदिरात भगवान नरसिंहाची एक मोठी दगडी मूर्ती असून ही मूर्ती प्रत्यक्ष कोणी तयार केली, याबाबतही अनेक मतं आहेत. भगवान नरसिंह यांना भाविक येथे नैवेद्य म्हणून गोड पाणी देतात. हे पाणी मोठ्या शंखाच्या माध्यमातून देण्यात येते. भाविक शंखातून भगवान नरसिंहाच्या मूर्तीला गुळाचे पाणी अर्पण करतात आणि जेव्हा पाणी देवाच्या मुखामध्ये देण्यात येते, तेव्हा गुरगुरण्याचा आवाज ऐकू येतो. कोणी मनुष्य पाणी पितांना जसा आवाज असतो, तसाच हा आवाज असतो. हे गोड पाणी कुठे जाते हे कोणालाही कळत नाही. ( Panakala Lakshmi Narasimha Swamy )
मंदिरातील भगवान नरसिंह मूर्तीचे तोंड धातूचे बनलेले आहे. या तोंडात पाणी ओतल्यानंतर काही पाणी बाहेर येते, भाविक हे पाणी प्रसाद म्हणून भक्तीभावानं घेतात. मात्र कितीही गोड पाणी देवाला समर्पित केले तरी भगवान नरसिंहाच्या मूर्तीवर गोड पाण्याचे कुठलाही अंश दिसत नाही. भगवान नरसिंहाची मूर्ती ही पूर्णपणे काळ्या दगडाची आहे. या दगडात पाणी शोषून घेण्याची क्षमता नाही, असे असतांनाही हे पाणी कुठे जाते, याचा शोध अद्यापही लागलेला नाही. या पाण्याचे रहस्य उलगडण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी मंदिराला भेट दिली आहे. परंतु त्यांनाही अपयश आले आहे. अनेकवेळा गोड पदार्थ जिथे असेल तिथे मुंग्या येतात. मात्र या मंदिरात कधीही एकही मुंगी दिसत नाही, याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जाते.
=======
हे देखील वाचा : Jakhu Hanuman Temple : या मंदिरात आहेत, हनुमानाच्या पावलांचे ठसे
=======
येथील स्थानिक मंदिराच्या या रहस्याचा आणि ज्वालामुखीचा संबंध असल्याचे सांगतात. त्यांच्यामते, नरसिंह भगवान मंदिर ज्वालामुखीच्या टेकडीवर आहे. भगवान नरसिंहांचे स्थान असल्यामुळे हा ज्वालामुखी शांत आहे. भगवान नरसिंहांना अर्पण केलेले गोड पाणी ज्वालामुखीची तीव्रता कमी करते आणि त्याचा उद्रेक होण्यापासून रोखत असल्याचे भाविक सांगतात. या भव्य मंदिराच्या गोपुरमबाबतही अनेक आख्यायिका आहेत. मंदिराचे भव्य ११ मजली गोपुरम बगण्यासाठीही मोठी गर्दी होते. १८०७-१८०९ दरम्यान स्थानिक जमीनदार राजा वासिरेड्डी वेंकटाद्री नायडू यांनी हे गोपुरम बांधल्याचे सांगण्यात येते. स्थानिक जमिनदार हे भगवान नरसिंह यांचे परम भक्त होते. त्यांनी बांधलेल्या या गोपुरमला २०० वर्ष पूर्ण झाली, तरी हे गोपुरम आजही नवीन असल्यासारखे भासतात. दरवर्षी या मंदिर परिसरात पानकला लक्ष्मी नरसिंह स्वामी ब्रह्मोत्सवाला देशभरातून भाविक दाखल होतात. ११ दिवस चालणा-या या उत्सवाची सुरुवात फाल्गुन शुद्ध सप्तमीपासून होते. एरवी वर्षभरही या मंदिरामध्ये भगवान नरसिंह यांचे भक्त देवाचा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करतात. ( Panakala Lakshmi Narasimha Swamy )
सई बने
