Home » Marius Borg Høiby : अरे देवा…. हा राजकुमार आहे की अट्टल गुन्हेगार

Marius Borg Høiby : अरे देवा…. हा राजकुमार आहे की अट्टल गुन्हेगार

by Team Gajawaja
0 comment
Share

ब्रिटनच्या राजघराण्यानंतर आता नॉर्वेचे राजघराणेही चर्चेत आले आहे. या राजघराण्यातील क्राऊन प्रिन्सेसचा मोठा मुलगा मारियस बोर्ग होइबी याला पोलिसांनी अटक केली आहे. आधीच मारियस बार्ग होइबी याच्यावर बलात्कार, हिंसाचार आणि ड्रग्ज बाळगणे यासह ३८ आरोप आहेत. २०१८ ते २०२४ दरम्यान केलेल्या कथित गुन्ह्यांच्या संदर्भात कारवाई सुरु असतांनाच होइबी यानं आणखी एक गुन्हा केल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे. यातच कुप्रसिद्ध जेफ्री एपस्टाईन फालईमध्येही होइबीचे नाव आल्यानं नॉर्वे राजघराण्यात खळबळ उडाली आहे. मारियस बोर्ग होइबी याला यापूर्वीच राजघराण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. त्याच्याकडे राजघराण्याचे कोणतेही अधिकृत पद नसले तरी त्याच्यावर असलेल्या आरोपांनी राजघराण्याची पार बेइज्जती झाली आहे. त्यातही आता त्याचे नाव एपस्टाईन फाईलमध्ये आल्यावर मारियस बोर्ग होइबी या प्रकऱणात आहे की अन्य कोणी राजघराण्याचे सदस्यही यात आहेत, याचीही चर्चा सुरु झाली आहे. ( Marius Borg Høiby )

नॉर्वेमध्ये सध्या मारियस होईबी याच्या गुन्ह्यांची यादी वाचली जात आहे. तब्बल ३८ गुन्हे केलेल्या होईबीने खटला चालू होण्यापूर्वी आणखी एक गुन्हा केला आहे. त्यात आता त्याला अटक करण्यात आली आहे. मारियस होईबी हा क्राउन प्रिन्सेस मेट-मॅरिटचा मुलगा आणि क्राउन प्रिन्स हाकॉनचा सावत्र मुलगा आहे. नव्या गुन्ह्यात त्याच्यावर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे. हा हल्ला करण्यापूर्वी काही तास आधी मारियस होईबी याच्यासह नॉर्वे राजघराण्यातील काही सदस्यांची नावं एफ्री एपस्टाईनच्या फाइल्समध्ये असल्याचे उघड झाले. सोबतच राजघराण्याशी संबंधित काही ईमेल कनेक्शनही उघड झाल्यामुळेच मारियस होईबीने चाकू हल्ला केल्याची माहिती आहे.

मात्र मारियसच्या काळ्या कारनाम्यांमुळे राजघराण्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागली आहेत. मारियस बोर्ग होईबी याच्यावर बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीच्या एक दिवस आधी नव्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. होईबीवर चाकूने धमकी देणे, हल्ला करणे आणि प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तेथील ओस्लो जिल्हा न्यायालयाने होईबीला पुन्हा गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी चार आठवड्यांची पोलिस कोठडी दिली आहे. मात्र होईबीचे वकील पेटार सेकुलिक यांनी त्याला चुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याचे सांगितले आहे. होईबीनेही हा गुन्हा आपण केला नसल्याचे सांगून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. ( Marius Borg Høiby )

मात्र होईबीची पाश्वभूमी पाहता तो किती अट्टल गुन्हेगार आहे, याची कल्पना येते. २९ वर्षीय होईबी त्याच्या अय्याश जीवनशैलीबद्दल नॉर्वेमध्ये ओळखला जातो. होईबीवर एकूण ३८ आरोप आहेत. यात २०१८ ते २०२४ दरम्यान बलात्काराचे चार आरोप आहेत. त्याच्यावर माजी जोडीदाराविरुद्ध हिंसाचार आणि धमक्या, ३.५ किलोग्राम गांजा बाळगणे, जीवे मारण्याच्या धमक्या आणि वाहतूक उल्लंघनाचे आरोप देखील आहेत. २०२४ मध्ये होईबीला अनेक वेळा अटक करण्यात आली आहे. परंतु त्याच्यामागे असलेले राजघराण्याचे नाव यामुळे त्याची प्रत्येकवेळी जमिनीवर सुटका झाली आहे. होईबीच्या सुटकेवर अनेक नागरिकांनी टीका केली. मात्र या टीकाकारांनाही धमकवण्यात आल्याची माहिती आहे.

होईबीला राजघराण्यातून बेदखल करण्यात आले तरी, त्याच्या पाठिशी राजघराण्यातील काही सदस्य आहेत. याच सदस्यांची नावे एपस्टाईन फाईलमध्ये आहेत. मारियस होईबी हा क्राउन प्रिन्सेस मेट-मॅरिटचा मुलगा आणि क्राउन प्रिन्स हाकॉनचा सावत्र मुलगा आहे. त्याच्याकडे कोणताही राजेशाही पद किंवा अधिकार नाही. होईबीला पहिल्यांदाच अटक झाल्यावर क्राउन प्रिन्स हाकॉनने, होईबी हा राजघराण्याचा भाग नसल्याचे सांगून नॉर्वे देशाचा नागरिक म्हणून सामान्य अधिकार आणि जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आता होईबीची कायदेशीर कार्यवाही १९ मार्चपर्यंत सुरू राहील. होईबी दोषी आढळल्यास त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. ( Marius Borg Høiby )

=======

हे देखील वाचा : Kiswah Epstein Scandal : काबाचा ‘किस्वा’ आणि एपस्टाईन

=======

दरम्यान होईबीवर या सर्वात आरोप होत असतातांना जेफ्री एपस्टाईन फाईलच्या नवीन कागदपत्रांनुसार, २०१३ मध्ये क्राउन प्रिन्सेसने काही दिवसांसाठी एपस्टाईनच्या पाम बीच मालमत्तेचा वापर केला असल्याचे उघड झाले आहे. या कागदपत्रांमध्ये राजकुमारी मेट-मॅरिटचाचे नाव १,००० हून अधिक वेळा आले आहे. ज्यामुळे राजकुमारीचे लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी असलेले अत्यंत जवळचे आणि वैयक्तिक संबंध उघड झाले आहेत. लीक झालेल्या ईमेलनुसार, राजकुमारीने एपस्टाईनचे वर्णन “अत्यंत आकर्षक” असे केले आहे. राजकुमारी मेट-मॅरिटचाने याबाबत जाहीरपणे माफी मागितली आहे. एकूण नॉर्वे राजघराण्यातील या आई-मुलामुळे सर्वच राजघराणे जनतेच्या टीकेचे लक्ष झाले आहे. ( Marius Borg Høiby )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.