Home » Valentine Day : उद्यापासून सुरु होतोय ‘व्हॅलेंटाईन वीक’

Valentine Day : उद्यापासून सुरु होतोय ‘व्हॅलेंटाईन वीक’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Valentine Day
Share

प्रेमवीर ज्या महिन्याची वर्षभर वाट बघतात तो फेब्रुवारीचा महिना सुरु झाला असून, याच महिन्यात १४ तारखेला सर्वच लोकांचा आवडता असा व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. आपले प्रेम व्यक्त करण्याचा आणि आपल्या जोडीदारासोबत राहण्याचा आहे ऑफिशियल दिवस असतो. मात्र व्हॅलेंटाइन डे हा फक्त १४ फेब्रुवारी याच एका दिवशी साजरा न करता १४ तारखेच्या आधीच संपूर्ण आठवडा हा व्हॅलेंटाइन वीक म्हणून ओळखला जातो. या व्हॅलेंटाइन वीकमध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारचे डे साजरे करत मुख्य असलेल्या व्हॅलेंटाइन डेचा उत्साह आणि उत्सुकता अधिक वाढवली जाते. उद्यापासून हा व्हॅलेंटाइन वीक सुरु होत आहे. त्यामुळे या वीकमध्ये नक्की कोणत्या दिवशी कोणता दिवस कसा साजरा करतात हे आपण जाणून घेऊया.(Valentine Day)

७ फेब्रुवारी, रोझ डे
व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात ७ फेब्रुवारी रोजी रोझ डेने होते. या दिवशी कपल्स एकमेकांना लाल गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. या दिवशी फक्त प्रेमीच नाही तर कोणीही त्यांच्या खास व्यक्तीला गुलाब देऊन त्यांच्या भावना व्यक्त करू शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबासारखे दुसरे फूल नाही असे कायमच आपण ऐकत असतो. म्हणूनच या वीकच्या पहिल्या दिवशी आपण लाल गुलाब देऊन आपल्या आवडत्या व्यक्तीला देऊ शकतो. (Top Marathi Headline)

Valentine Day

८ फेब्रुवारी​, प्रपोज डे
दुसरा दिवस म्हणजे ८ फेब्रुवारी रोजी प्रपोज डे साजरा केला जातो. या दिवशी तुम्हाला जी व्यक्ती अगदी मनापासून आवडते त्या व्यक्तीला तुमच्या मनातील भावना तुम्ही सांगू शकता. या दिवशी तुमच्या आवडत्या व्यक्तीला हटके प्रपोज करून स्पेशल फिलिंग देऊ शकता. (Marathi News)

Valentine Day

९ फेब्रुवारी, चॉकलेट डे
प्रपोज डे नंतर चॉकलेट डे साजरा केला जातो. चॉकलेट हे नात्यांमध्ये गोडवा आणण्याचे प्रतीक मानले जाते. व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट देऊन प्रेमात गोडवा वाढवण्याची परंपरा आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेट अतिशय परफेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याचे आवडते चॉकलेट देऊ शकता. (Marathi Trending Headline)

Valentine Day

१० फेब्रुवारी, टेडी डे
व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. प्रेमीयुगुल एकमेकांना टेडी बेअर भेट देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. टेडी बेअरचे सॉफ्ट टॉईज एकमेकांना देऊन हे मन कायम जपण्याची भावना आणि वचन एकमेकांना देण्याचा हा दिवस आहे. (Top Marathi News)

Valentine Day

११ फेब्रुवारी, प्रॉमिस डे
प्रेम करणे सोपे असले तरी ते निभावणे सर्वात कठीण. त्यामुळे प्रपोज केल्यानंतर तुमचे हे खास नाते आयुष्यभर निभावण्यासाठी आणि जपण्यासाठी वचन देण्याचा दिवस म्हणजे प्रॉमिस डे. (Latest Marathi HEadline)

Valentine Day

 

१२ फेब्रुवारी, हग डे
असे म्हणतात की आपल्या व्यक्तीला आपण काहीही न बोलता एक मिठी मारली तर ती मिठी त्या व्यक्तीच्या सर्वच भावना व्यक्त करते. त्यामुळे ज्यांना आपल्या भावना व्यक्त करायला अवघड जात असेल त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला नक्कीच प्रेमाची ती खास मिठी मारण्याचा हा दिवस आहे. (Top Trending News)

Valentine Day

१३ फेब्रुवारी, किस डे
प्रेमी युगुलांसाठीही हा दिवस खूप खास असतो. व्हॅलेंटाईन आठवड्याचा सहावा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. Kiss Day च्या दिवशी आपल्या जोडीदाराला चुंबन देत आपले प्रेम व्यक्त केले जाते. (Top Stories)

Valentine Day

१४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे
व्हॅलेंटाईन वीकचा सर्वात खास, महत्त्वाचा आणि शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. प्रेम वर्षभर साजरे करावे हे खरे असले तरीही हा स्पेशल दिवसही साजरा करायलाच हवा. हा दिवस म्हणून खास प्लॅन करून तुमच्या जोडीदारासोबत घालवू शकता. त्याला स्पेशल फील करून देऊ शकता. (Social News)

Valentine Day

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.