२०२६ हे वर्ष सुरु झालं आणि जगभरातून तुफानी हिमवर्षावाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. युरोप, अमेरिका यांच्यासह अफ्रिकन देशातही या नव्यावर्षात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी होत आहे. जपानमध्ये गेल्या अनेक वर्षात नाही झाली एवढी हिमवर्षा झाली. रशिया येथील कामचटका द्वीपकल्पावर तर दोनशे वर्षात जेवढा बर्फ पडला नाही, तेवढा बर्फ पडत आहे. कॅनडा, अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि स्कॉटलंडमध्येही या वर्षी जोरदार हिमवर्षाव होत आहे. भारतातील शिमला, श्रीनगर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय प्रदेशांमध्ये लक्षणीय हिमवर्षाव सुरु आहे. ( Oxford Warns of Extreme Summer )
या हिमवर्षासोबतच जगभरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. काही शहरात पारा हा शून्याच्या खाली गेला आहे. मात्र एवढी थंडी पडल्यावर कदाचित काही महिन्यांनी येणारा उन्हाळा हा फारसा त्रासदायक ठरणार नाही, अशी आशा कुणाला असेल तर त्यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलेला इशारा हा पुरेशा ठरणार आहे. कारण ऑक्सफर्ड विद्यापीठानं येणा-या उन्हाळ्याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात पृथ्वीवर कमालीचा उन्हाळा लवकरच येत असल्याचा इशारा दिला आहे. हा उन्हाळा इतका असणार आहे की, मनुष्याला एखाद्या उकळत्या तेलाच्या कढईत बसल्याचा भास होणार आहे.

जगभरात सध्या अनेक देशांतून बर्फाची चादर कशी पसरली आहे, याच्या बातम्या येत आहेत. अमेरिका, रशिया, जपान या देशांसोबतच अफगाणिस्तानसारख्या देशातही बर्फाचे साम्राज्य आहे. भारतातील शिमला, मनाली, श्रीनगर या भागात बर्फाचे राज्य आहे. पुढचे किमान पंधरा दिवस तरी बर्फाची ही चादर अशीच राहिल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अमेरिकेसारख्या देशात कडाक्याच्या थंड़ीमुळे ३५ हून अधिक मृत्यू झाल्याची बातमी आहे. अन्य देशांमध्ये हा आकडा खूप मोठा आहे. त्यातच आता पुढच्या काही दिवसात भारतासह युरोपमध्येही काही ठिकाणी वादळ येण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावरुन २०२६ हे वर्ष हिमवर्षावाचे आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे. ( Oxford Warns of Extreme Summer )
मात्र या संदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठानं एक काळजी करणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यावरुन २०२६ हे वर्ष फक्त कडाक्याच्या थंडीचेच नाही तर ते कमालीच्या उन्हाळ्याचे आणि मुसळधार पावसाचेही असणार आहे. जागतिक हवामानात कमालीचा बदल होत असून त्याचा फटका म्हणून आता कुठलाही ऋतू हा मानवाला सहन करता येण्यापेक्षा अधिक असणार असल्याचे या अहवाल नमूद करण्यात आले आहे. ऑक्सफर्डच्या संशोधक राधिका खोसला यांनी हा अहवाल जाहीर केला असून त्यामुळे अनेक देशांमध्ये आत्तापासूनच धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या अहवालामुळे चिंता व्यक्त कऱण्यात आली आहे. या अहवालानुसार पृथ्वीवरील तापमान एखाद्या तेलाच्या कढईतील तापमानासारखे रहाणार आहे. काही देशात तर तापमानाचा पारा एवढा चढा होणार आहे की, मानवी शरीर हे तापमान सहन करु शकणार नाही, असा इशाराही दिला आहे. या अहवालानुसार, २०५० पर्यंत हे तापमान असेच वाढत रहाणार आहे. त्यामुळे जगातील ४०% लोकसंख्येला, किंवा अंदाजे ४ अब्ज लोकांना, असह्य यातना होणार आहेत. या अहवालात भारतीयांसाठी विशेष इशारा देण्यात आला आहे. भारतात दरवर्षी काही शहरात रेड अलर्टसारखी परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवली आहे. २०२५ मध्ये राजस्थानमधील श्री गंगानगर हे भारतातील सर्वात उष्ण शहरांपैकी एक शहर झाले होते. येथे १२ जून २०२५ रोजी ते ४८.०°C पर्यंत तापमान पोहोचले होते. ( Oxford Warns of Extreme Summer )
=======
हे देखील वाचा : Climate Change : जगभरात होत असलेल्या हिमवर्षावामागचे दाहक वास्तव
=======
पंजाबमधील फरीदकोट येथेही ४७°C तापमानाची नोंद झाली. तर जूनमध्ये जालंधरमध्येही ४८°C च्या आसपास तापमानाची नोंद झाली होती. मात्र ऑक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या मते, २०२६ मध्ये भारतातील अनेक शहरात याहून अधिक तापमान रहाणार आहे. अहवालानुसार, भारत, नायजेरिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये सर्वात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार आहेत. या देशातील अनेक शहरांमध्ये ४५ ते ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान वाढणार आहे. हा उष्मा एवढा वाढणार आहे की, उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या त्सुनामीसारखी असेल असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. ऑक्सफर्डच्या संशोधक राधिका खोसला यांनी या अहवालात पुढे सांगितले आहे की, भारतासह अन्य देशांमध्ये १.५ अंश तापमान ओलांडल्याने मानवी आरोग्यासह आणि शेतीलाही मोठा धोका होणार आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन पाण्याचे नैसर्गिक साठेही आटण्याची शक्यता खोसल राधिका खोसला यांनी आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. ( Oxford Warns of Extreme Summer )
सई बने
