इराणमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींविरुद्धचा असंतोष वाढत असला तरी प्रत्यक्षात इराणमधील परिस्थिती काय आहे, याचा अंदाज येत नाही. कारण तेथील सरकारनं अनेक दिवसांपासून फोन आणि इंटरनेट सेवा बंद केली आहे. खामेनी यांनी निदर्शकांवर थेट गोळ्या मारण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वात आतापर्यंत दहा हजाराहून अधिक इराणी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकन मानवाधिकार एजन्सी, HRANA ने केला आहे. एकीकडे इराणमध्ये हा भडका उडाला असतांना दुसरीकडे अमेरिका वारंवार इराणला युद्ध कऱण्याचा इशारा देत आहे. इराणच्या समुद्रामध्ये अमेरिकन युद्धनौकांचा ताफा जमायला सुरुवात झाली आहे. हा धोका पाहता अयातुल्ला खामेनी हे बंकरमध्ये गेले आहेत. अशा परिस्थितीतही इराणचे सरकार अमेरिका वा निदर्शने करणा-या नागरिकांपुढे झुकलेले नाही. उलट तेहरीनमध्ये अमेरिकेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ( Reza Pahlavi )

इराणमधील खामेनी यांची सत्ता उलथून लावण्यामागे अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयए आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हातभार आहे, हे लपून राहिलेले नाही. यासर्वांसाठी अमेरिकेनं इराणच्या राजघराण्याचे वारस रझा पहलवी यांना हाताशी धरले होते. रझा पहलवी हे सध्या न्यूय़ॉर्कमध्ये वास्तव्यास असून तिथूनच ते इराणमधील निदर्शकांना खामेनीच्या विरोधात लढा देण्याच्या सूचना करत आहेत. मात्र रझा पहलवी आणि इराणमधील जनता यांचा ताळमेळ काही जुळला नाही. परिणामी सुरुवातीला आक्रमक झालेले आंदोलन आता शांत झाल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळेच अमेरिकेनं या इराणच्या राजकारणात इराणच्या राणीकडे जबाबदारी सोपवली आहे. ८७ वर्षीय इराणी राणी फराह पहलवी आता खामेनीविरोधातील आंदोलनात सक्रीय झाली आहे. ( Reza Pahlavi )
इराणमध्ये खामेनींना सत्तेपासून हटवण्यासाठी मोठा गट प्रयत्न करीत आहे. या गटाचे नेतृत्व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. ट्रम्प यांनी खामेनींना हटवण्यासाठी इराणच्या राजघराण्यातील सदस्यांना हाताशी धरले आहे. यातून जर खामेनी सत्तेपासून दूर झाले तर पुन्हा इराणवर पहलवी घराण्याची सत्ता येईल, अशी आशा दाखवण्यात आली आहे. मात्र ट्रम्प यांचा हा डाव त्यांच्यावरच उटलटला. कारण ज्या रझा पहलवी यांना हाताशी धरुन ट्रम्प इराणमधील निदर्शकांना भडकावत होते, त्या रझा पहलवी यांची छाप इराणच्या जनतेवर पडू शकली नाही. त्यामुळेच इऱाणच्या राजकारणात फराह पहलवी यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
फराह पहलवी या इराणच्या राजघराण्याच्या प्रमुख आणि इराणच्या माजी राणी आहेत. ८७ वर्षीय या राणीला मानणारे मोठे जनमत इराणमध्ये आहे. त्याच जनमताचा फायदा घेण्यासाठी अमेरिका आता त्यांना पुढे करून खामेनींना सत्तेपासून दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. इराणची ही माजी राणी फराह पहलवी इराणमधील सध्याच्या राजवटीविरुद्ध सतत विधाने देत आहे. अशीच विधाने काही महिन्यापूर्वी त्यांचा मुलगा रझा पहलवी यांनीही दिली होती. मात्र यांच्या मर्यादित लोकप्रियतेमुळे त्याचा प्रभाव इराणी जनतेवर पडला नाही. त्यामुळे राणीनं नेतृत्व आपल्या हाती घेतले आहे. ( Reza Pahlavi )
रझा पहलवी यांना इराणी जनतेनं नाकारल्यावर ट्रम्प यांनीही त्यांच्यापासून दूर रहाणे पसंत केले आहे. माहितीनुसार रझा पहलवी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रम्प यांनी या भेटीला नकार दिला आहे. मात्र फराह पहलवी यांच्याबरोबर ट्रम्प यांनी संवाद साधून इराणमधील पुढच्या राजकारणाबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. राणी फराह पहलवी आणि शाह मोहम्मद रझा पहलवी यांना १९७९ च्या इस्लामिक क्रांतीदरम्यान सत्तेवरून काढून टाकण्यात आले होते. त्या क्रांतीनंतर, राजघराण्यातील सर्व सदस्य हे निर्वासित जीवन जगत आहे. या सर्वात राणी फराह पहलवी या सतत चर्चेत राहिल्या आहेत.
=======
हे देखील वाचा : Zhang Youxia : शी जिनपिंग यांच्या जीवाला सहकार्यांकडूनच धोका
=======
फराह पहलवीचा जन्म १९३८ मध्ये तेहरान येथे फराह दिबा यांच्या घरी झाला. १९५९ मध्ये शाह मोहम्मद रजा पहलवी यांच्याशी लग्न झाले. फराह या १९६७ मध्ये इराणच्या महाराणी झाल्या. इराणच्या महाराणी म्हणून राज्याभिषेक झालेल्या त्या पहलवी घराण्यातील पहिल्या महिला आहेत. फराह यांचा दृष्टीकोन आधुनिक असल्यामुळे त्यांनी कला, शिक्षण आणि संस्कृतीला चालना देण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी शिक्षणक्षेत्रात आणि उद्योगात क्रांती केली. शिवाय इराणमध्ये आता जी महाविद्यालये आहेत, त्यांची उभारणीही राणी फराह यांनीच केली आहे. ( Reza Pahlavi )
मात्र १९७९ च्या क्रांतीने राणी फराहचे संपूर्ण जग बदलून गेले. सत्ता गमावल्यानंतर, फराह आणि शाह यांनी देश सोडला. शाह यांचे आजारपणानं निधन झाले. त्यानंतर राणी फरहानं इराणमधील संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला. म्हणून राणी निर्वासीत असली तरी जनतेचा तिच्याबद्दल कायम आपलेपणाचा दृष्टीकोन राहिला आहे. याचाच लाभ घेण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे.
सई बने
