जगातील सर्वात मोठे रेल्वेचे जाळे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिले जाते. जगात दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या भारतात आहे. भारतात रोज कोट्यवधी लोकं रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेला देशाची लाफलाइन म्हटले जाते. भारतीय रेल्वेतून रोज सुमारे दोन कोटी लोक प्रवास करतात. १३ हजार पॅसेंजर ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडल्या गेल्या आहेत. या पॅसेंजर ट्रेन देशातील सुमारे ७ हजाराहून अधिक रेल्वे स्थानकात पोहोचतात. देशात सुमारे सात हजाराहून अधिक रेल्वे स्थानके आहेत. त्यामुळे प्रत्येक रेल्वेस्थानकातून त्या त्या राज्यातील ट्रेन उपलब्ध असतात. जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे जाळे असून, नेटवर्कची लांबी सुमारे ६८,५८४ किमी आहे. (Railway)
भारतीय रेल्वे कायम तिच्या विविध वैशिष्ट्यांमुळे कायम चर्चेत असते. मात्र या रेल्वेसोबतच भारतातील काही रेल्वे स्टेशन्स देखील चर्चेत येतात. भारतातील अनेक रेल्वे स्थानकांची बरीच वैशिष्ट्ये आहेत. याच यादीत एक असे स्टेशन आहे, जिथून देशाच्या चारही कोपऱ्यात जायला रेल्वे उपलब्ध आहे. ते रेल्वे स्थानक म्हणजे मथुरा जंक्शन. उत्तरप्रदेशातली मथुरा जंक्शन हे एकमेव स्थानक आहे. या ठिकाणाहून देशाच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी तुम्ही ट्रेन पकडू शकता. १८७५ मध्ये मथुरा जंक्शन येथे पहिल्यांदा ट्रेन धावली होती. (Marathi)

भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आणि तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथुरा जंक्शनवरून तुम्हाला भारतातील सर्वच कोपऱ्यात जायला सहज रेल्वे मिळते. हेच या मथुरा रेल्वे स्टेशनचे सर्वात मोठे वैशिट्य आहे. दिल्लीच्या अतिशय जवळ मथुरा स्टेशन आहे. मथुरा स्टेशन हे सर्वाधिक गर्दी आणि नेहमी वर्दळ असलेले देशातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. मथुरा रेल्वे स्थानकातून तुम्ही २४ तास देशातील कोणत्याही स्थानकातून ट्रेन पकडू शकता. तुम्हाला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून बंगालपर्यंत कुठेही जाण्यासाठी या रेल्वेस्थानकातून रेल्वे मिळेल. (Latest Marathi Headline)
मथुरा जंक्शन उत्तर मध्य रेल्वेमध्ये येते. या जंक्शनवरून ७ वेगवेगळ्या मार्गांच्या गाड्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांना जातात. मथुरा जंक्शनवर १० प्लॅटफॉर्म आहेत. या ठिकाणी १९७ ट्रेन थांबतात. राजधानी, शताब्दी, दुरंतो सारख्या सुपरफास्ट ट्रेनचा यात समावेश आहे. दिल्ली, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि बिहारसहीत देशातील विविध भागातून येणाऱ्या ट्रेन या ठिकाणी थांबतात. दिल्लीहून केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश यासह अनेक राज्यांकडे जाणाऱ्या गाड्या मथुरा जंक्शन क्रॉस करुनच जातात. या जंक्शनवर रात्रंदिवस गाड्या येत-जात असतात. (Top Stories)
=======
Money Plant Care : मनी प्लांट दीर्घकाळ टवटवीत राहण्यासाठी लक्षात ठेवा या ५ गोष्टी
=======
दिल्ली–मुंबई आणि दिल्ली–चेन्नई मार्गांना जोडणाऱ्या आग्रा-दिल्ली कॉरिडॉरवरील हे एक प्रमुख केंद्र आहे. येथेून देशाच्या चारही दिशांना ट्रेनची सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांसाठी हे मोठे ट्रान्झिट पॉइंट मानले जाते. दक्षिण आणि पश्चिम भारताकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी हे एक महत्त्वाचे जंक्शन आहे. देशातील बहुतांश मोठ्या शहरांशी या स्थानकाची थेट रेल्वे जोडणी उपलब्ध आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १० वरून वृंदावनकडे जाणाऱ्या मीटर गेज गाड्या सुटतात. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) च्या २०१८ च्या अहवालानुसार, देशातील ७५ महत्त्वाच्या स्थानकांपैकी मथुरा हे एक स्थानक आहे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी हे स्टेशन अत्यंत सोयीचे ठरते. ज्यांना प्रवासादरम्यान वारंवार ट्रेन बदलायची इच्छा नसते, अशा प्रवाशांसाठी मथुरा जंक्शन एक उत्तम पर्याय ठरतो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
