Home » Flight : विमान प्रवासात बाळाचा जन्म झाला तर त्याला कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळते?

Flight : विमान प्रवासात बाळाचा जन्म झाला तर त्याला कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Flight
Share

आपण कायमच ऐकत असतो, सोशल मीडियावर व्हिडिओ बघत असतो की, विमानामध्ये एखाद्या महिलेची डिलिव्हरी झाली. बाळाचा जन्म विमानात झाला. हे ऐकायला खूपच थ्रिलिंग वाटते. कारण डिलिव्हरी ही खूपच जटिल आणि गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे कायमच आपण अनुभव आणि योग्य डॉक्टरची डिलिव्हरी करण्यासाठी निवड करतो. मात्र कधी कधी काही कारणांमुळे महिलांची डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये न होता विविध ठिकाणी होते. यातच आपण ऐकतो की विमानामध्ये डिलिव्हरी झाली. (Flight)

जेव्हा एखादे बाळ जन्माला येते तेव्हा ते ज्या देशात जन्म घेते, त्या देशाचे नागरिकत्व त्याला त्याचक्षणी प्राप्त होते. मात्र जेव्हा महिलेची विमानात डिलिव्हरी होते तेव्हा विमान आकाशात हवेत उडत असते. ते कोणत्या एका देशात किंवा ठिकाणी स्थिर नसते. अशावेळेस जन्म घेतलेल्या बाळाला कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळेल? हा प्रश्न अनेकांना पडतो. आज याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. (Marathi)

आपण ऐकले असेल की विमान प्रवासादरम्यान एखाद्या बाळाचा जन्म झाला तर त्या बाळाला आयुष्यभरासाठी त्या विमान कंपनीचे मोफत विमान तिकीट मिळते. आंतरराष्ट्रीय फ्लाईट दरम्यान जर तुमच्या बाळाचा जन्म झाला तर त्याला जागतिक नागरिकत्व मिळते. शिवाय त्याला कोणत्याही देशात जाण्यासाठी व्हिसा घेण्याची गरज भासणार नाही, पण हे नक्कीच खरे आहे का? तसे पाहिले तर साधारणतः गर्भवती महिलांनी गर्भावस्थेच्या ९ व्या महिन्यात प्रवास करणे टाळले पाहिजे. भारतात, ७ महिन्यांपेक्षा जास्त गर्भवती असलेल्या महिलांना विमानाने प्रवास करण्याची परवानगी दिली जात नाही, परंतु काही विशेष परिस्थितींमध्ये महिलांना प्रवास करणे अतिआवश्यक होते. (Todays Marathi HEadline)

Flight

तज्ज्ञांचे माहितीनुसार जर विमान प्रवासात एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी झाल्यास त्या बाळाला पालकांचे राष्ट्रीयत्व दिले जाण्याची ९९% शक्यता असते. बाळाला जागतिक नागरिकत्व दिल्याचे आजवर ऐकिवात नाही. शिवाय एका माहितीनुसार अशा प्रकारच्या जन्म झालेल्या बाळाच्या नागरिकत्वासाठी कोणताही एक नियम नाही. पण लक्षात ठेवा की ज्या देशावरून विमान उडत असेल ती त्या विमानाची भूमी किंवा जमीन मानली जाते. उड्डाण करत असताना, विमान जिथून उड्डाण घेते त्या देशाच्या सीमा ओलांडून जर मुलाचा जन्म झाला, तर त्या देशाचे नाव जन्म प्रमाणपत्रावर लिहिले जाईल. उदाहरणार्थ, जर भारताच्या सीमारेषेवर विमान जात असताना श्रीलंकेच्या एका महिलेने मुलाला जन्म दिला तर त्या मुलाचे जन्मस्थान भारत असे लिहिले जाईल. परंतु त्याच्या पित्याचे-मातेस श्रीलंकेचे नागरिकत्व असल्यामुळे, त्याला श्रीलंकेचे नागरिकत्व देखील मिळू शकते. (Latest Marathi Headline)

१९६१ मध्ये एक करार समोर आला, ज्यामध्ये ही गोष्ट सांगण्यात आली होती. तसे, बहुतेक देश रक्ताच्या आधारे मुलांना नागरिकत्व देतात. १९६१ मध्ये झालेल्या करारामुळे अशा मुलांना नागरिकत्व मिळण्यास मदत होते, जिथे वाद होतात. तिथे ज्या देशाची विमान कंपनी आहे त्या देशाचं नागरिकत्व मुलाला मिळेल. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या मते, जर एखाद्या मुलाचा जन्म आंतरराष्ट्रीय पाण्यात झाला असेल तर त्याच्या जन्माच्या ठिकाणी समुद्र लिहावा. फ्लाइटमध्ये जन्माला आल्यास त्याला ‘एअर बॉर्न’ मूल समजावे. (Top Stories)

========

Climate Change : जगभरात होत असलेल्या हिमवर्षावामागचे दाहक वास्तव

Panda Diplomacy : पांडा मागचे राजकारण

========

बहुतेक विमान कंपन्या विमानात जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर मोफत प्रवासासाठी तिकिटे देतात, असेही तुम्ही ऐकले असेलच. पण यात कोणतेही तथ्य नाही. आतापर्यंत कोणत्याही विमान कंपनीने याला दुजोरा दिलेला नाही. शिवाय कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर मोफत विमान तिकीट देणे एक कठीण निर्णय आहे. त्यामुळे तसा कोणताही नियम नाही. पण कोणतीही एअरलाइन त्यांना हवे असल्यास तसे करू शकते. काही देशांमध्ये विमानात जन्मलेल्या मुलाच्या नागरिकत्वाबाबत विविध नियम असू शकतात. काही देशांमध्ये अशा प्रकारच्या घटनांवर ठरवलेले विशिष्ट कायदे आहेत. काही देशांमध्ये या संदर्भात काही ठरवलेले नियम नाहीत. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.