आपल्या सगळ्यांनाच प्रिय असते ती झोप. अनेक लोकांच्या दृष्टीने झोप हे आळशी लोकांचे लक्षण असते. मात्र असे अजिबातच नाहीये. शांत आणि योग्य प्रमाणातील झोप ही उत्तम आरोग्याचे लक्षण असते. डॉक्टर आणि तज्ज्ञ देखील निरोगी आरोग्यासाठी शांत झोप घेण्याचा कायम सल्ला देतात. पण बऱ्याच लोकांसोबत झोपेत अनेक गोष्टी घडतात. गाढ झोपेत असताना अनेकदा उंचावरून खाली पडल्याचा भास खूपदा होतो. यामुळे आपण झोपेत दचकून उठतो. असे धक्के जवळजवळ प्रत्येकालाच येतात, स्वप्नात तुम्ही डोंगरावरून पडता किंवा कुठेतरी अडखळून पडता. कधी कधी बेडवरुन खाली पडल्याचा भास आपल्याला होतो आणि आपली झोपमोड होते. यानंतर झोपेतून आपण घाबरून देखील उठून बसतो. मात्र असे का होते? यामागे नक्की कोणते खास कारण आहे? चला जाणून घेऊया. (Sleep)
झोपेत लागणाऱ्या या झटक्यांना अथवा धक्क्यांना वैद्यकीय परिभाषेत हायपनिक जर्क म्हणतात. हायपनिक जर्क मायोक्लोनस म्हणजे, झोपेचे हे धक्के मेंदूच्या त्या भागात येतात जिथे मेंदूची मूळ प्रक्रिया नियंत्रित केली जाते. हायपनिक जर्क येण्यामागे कोणते एक असे कारण नाही, तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचे शरीर आणि स्नायू हळूहळू आरामाच्या मोड म्हणजे जातो. कधीकधी, तुमचा मेंदू या विश्रांतीचा चुकीचा अर्थ झोपेचे लक्षण म्हणून घेतो. याचा अर्थ तुमचे शरीर सामान्यपणे झोपायला जात आहे, पण तुमच्या मेंदूला काहीतरी गडबड असल्याचे जाणवते आणि तो तुमचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. ‘पडण्याच्या’ या खोट्या धोक्याला मेंदू शरीराला एक शक्तिशाली सिग्नल पाठवून प्रतिसाद देतो, जेणेकरून तुम्ही ‘स्वतःला पकडू शकता.’ यामुळे अचानक धक्का बसतो, हालचाल होते किंवा अचानक जाग येते. हे सर्व काही सेकंदाच्या काही अंशात घडते. (Todays Marathi Headline)

जेव्हा व्यक्ती हलक्या झोपेत असते तेव्हा हे धक्के जाणवतात. म्हणजेच ती व्यक्ती पूर्णपणे जागी नसते किंवा गाढ झोपेतही नसते. सहसा ही घटना झोपेच्या पहिल्या टप्प्यात घडते जेव्हा हृदय गती आणि श्वासोच्छ्वास मंदावू लागतात. संशोधनानुसार, झोपेत झटके येणे किंवा उंचावरून पडल्याचा भास होणे सामान्य आहे. सुमारे 60 ते ७० टक्के लोकांना हे अनुभवायला मिळते. अनेक लोकांना हिपनिक झटके येतात पण काहींना ते आठवतात किंवा काहींना ते आठवत नाही. हा आजार नाही किंवा मज्जासंस्थेचा विकार नाही. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर ही एक नैसर्गिक प्रक्रिया मानतात. (Marathi News)
हायप्निक जर्कमागील अनेक कारणे शास्त्रज्ञ सांगतात. काही लोक म्हणतात की जेव्हा ते स्वप्नात पडतात किंवा गोंधळलेले असतात तेव्हा त्यांचे शरीर झटके देते. ताण, चिंता, थकवा किंवा कॅफिनचे सेवन किंवा झोपेची कमतरता ही कारणे जबाबदार आहेत. कधीकधी संध्याकाळी जास्त शारीरिक हालचाल किंवा व्यायामामुळे देखील हिपनिक झटके येऊ शकतात. याशिवाय मेंदूला आराम न देता रात्री अपरात्री काम करणे, टीव्ही वा मोबाईल पाहणं ही समस्या अधिक वाढीला नेत आहेत. (Top Stories)
========
Health : योगाभ्यासाची सुरुवात ‘या’ योगासनांनी करा
========
झोपण्याआधी काही मिनिटे ध्यान करा त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते आणि तुम्हाला शांत झोप लागते. दररोज योगा करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. स्ट्रेचिंग आणि काही सोप्या योगासनांमुळे शारीरिक ताण कमी होऊ शकतो. गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमचे स्नायू आरामशीर होतात आणि तुमच्या शरीराला झोपण्याची वेळ झाल्याचा इशारा मिळतो. तुमच्या आहारात मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा. बदाम, भोपळ्याच्या बिया, डार्क चॉकलेट, चियासिड्स, एवोकॅडो खाऊ शकता. यासोबतच रोज कमीत कमी ८ तास किमान झोप घ्यावी. झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करून शरीर रिलॅक्स करावे. झोपण्यापूर्वी ६ तास आधी व्यायाम करू नये. योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सेवन करा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
