Home » Beating Retreat : आज दिल्लीमध्ये रंगणार बीटिंग रिट्रीटचा सोहळा, जाणून घ्या याचे महत्त्व

Beating Retreat : आज दिल्लीमध्ये रंगणार बीटिंग रिट्रीटचा सोहळा, जाणून घ्या याचे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Beating Retreat
Share

नुकताच २६ जानेवारी रोजी आपण भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात देशभरात साजरा केला. यादिवशी संपूर्ण देशाने आपल्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला. दिल्लीमधील कर्तव्यपथावर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन होत मुख्य सोहळा संपन्न झाला. या दिवशी संपूर्ण जगाला भारताची ताकद, एकता, संस्कृती दिसली. २६ जानेवारी नंतर २९ जानेवारी रोजी द बिटिंग रिट्रीट हा मुख्य सोहळा संपन्न होतो. दरवर्षी २९ जानेवारीला दिमाखदार बिटिंग द रिट्रीट सोहळा पार पडतो. ‘बीटिंग द रिट्रीट’ ही एक जुनी लष्करी परंपरा आहे. हा दिवस बहुतकरून आपल्या लष्कराला समर्पित असतो. सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्याने प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची सांगता होते. (Beating Retreat)

‘बीटिंग द रिट्रीट सोहळ्याची सुरुवात भारतात १९५० मध्ये झाली. भारतीय लष्कराचे मेजर रॉबर्ट यांनी सैन्याच्या बँडच्या प्रदर्शनासह हा सोहळा पूर्ण केला. या समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असतात. त्यांच्या आगमनानंतर त्यांना राष्ट्रीय मानवंदना देण्यात येते. यानंतर हे राष्ट्रगीत म्हणण्यात येतं. दरम्यान, बँडमास्टर राष्ट्रपतींकडे जातात आणि बँड परत घेण्याची परवानगी मागतात. याचा अर्थ २६ जानेवारीचा उत्सव संपला आहे. विशेष म्हणजे “बीटिंग द रिट्रीट” ही एक जुनी लष्करी परंपरा आहे. (Marathi)

पूर्वीच्या युद्धांमध्ये सूर्यास्त झाला की युद्ध थांबवले जायचे, ते थांबल्याची धून वाजवली जायची आणि मग दोन्ही बाजूंचे सैन्य त्यांच्या छावणीमध्ये परतायचे. या जुन्या पद्धतीवरुन ‘बीटिंग द रिट्रिट’ या सोहळ्याची संकल्पना रचण्यात आली आहे. जगभरातल्या अनेक देशांच्या सैन्यदलांचा असा कार्यक्रम होतो. भारतानेही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ही परंपरा सामील केली आहे. म्हणजे आता सैन्यदलांचे प्रमुख राष्ट्रपती हा सोहळा समाप्तीनंतर सैन्याला त्यांच्या छावणीमध्ये परतायला सांगतात. (Todays Marathi HEadline)

Beating Retreat

‘बीटिंग द रिट्रीट’ची परंपरा फार जुनी आहे. याचे मुळ नाव ‘वॉच सेटिंग’असून हा कार्यक्रम सुर्यास्ताच्या वेळी होतो. भारतात या सोहळ्याची सुरुवात १९५० पासून झाली. मात्र, १९५० पासून आतापर्यंत हा कार्यक्रम दोन वेळा रद्द करण्यात आला. प्रथम २६जानेवारी २००१ रोजी गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर २७ जानेवारी २००९ रोजी जेव्हा भारताचे आठवे राष्ट्रपती वेंकटरामन यांचे निधन झाले होते. हे दोन अपवाद वगळता १९५०पासून हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी २९ जानेवारीला पार पडतो. (Latest Marathi Headline)

बिटिंग द रिट्रीट सोहळा दिल्लीच्या विजय चौक येथे आयोजित केला जातो. यावेळी राष्ट्रपती भवनाला रंगीबेरंगी लाइटींनी सजवण्यात येते. या सोहळ्याचा सुरुवात २९ जानेवारीला सुर्यास्त झाल्यानंतर होते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक येतात. २६ जानेवारीला परेडमध्ये चालणारे उंट बिटिंग द रिट्रीट सोहळ्यात देखील सहभागी होतात. यावेळी हे उंट रायसीना हिलच्या उत्तर आणि दक्षिण भागावर उभे असतात. १९७६ मध्ये पहिल्यांदा ९० उंटांची तुकडी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा भाग झाले होते. ज्यात ५४ उंट सैनिकांसोबत आणि इतर बँडच्या जवानांसोबत होते. परेड व बिटिंग द रिट्रीट सोहळ्यात सहभागी होणाऱ्या उंटांना पायापासून ते मानेपर्यंत सजवण्यात येते. त्यांच्या बीएसएफचे जवान शाही वेशात बसतात. (Top Marathi News)

या उंटांच्या तुकडीचा वापर वेगवेगळ्या सोहळ्यांसाठी केला जात असल्याने त्यामुळे त्यांच्याकडे 65 गणवेश उपलब्ध आहेत. परदेशी राजकीय नेते आल्यावर वेगळा गणवेश आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी वेगळा गणवेश परिधान करतात. या उंटावर बसणाऱ्या जवानांची उंची देखील ६ फूट अथवा त्यापेक्षा अधिक असते. या उंट बटालियनचे देखील एक वैशिष्ट्य असते. या उंटावर बसवण्यात आलेल्या जवानांच्या मिशा देखील वेगळ्या असतात, ज्यामुळे त्यांची ओळख होते. याचे मुख्य आकर्षण तिन्ही सैन्याचे जवान एकत्र येत सामुहिक बँडचा कार्यक्रम सादर करतात. या कार्यक्रमात ड्रमर एबाइडिड विद मी हे संगीत वाजतात. (Top Stories)

==========

Chandrashekhar Azad : ‘या’ मराठी क्रांतीकारकाने आजादांच्या आईला सांभाळलं !

शहीद भगत सिंग यांची क्रांतिकारी आई विद्यावती कौर !

==========

यानंतर रिट्रीटचे बिगूल वाजते व बँड मास्टर राष्ट्रपतींकडे बँड परत घेऊन जाण्याची परवानगी मागतात. यानंतर सोहळ्याचे समापन होते. बँड मार्च परत जाताना सारे जहां से अच्छा या गाण्याचे संगीत वाजते. अखेर राष्ट्रगीत गायले जाते व प्रजासत्ताक दिनाचा औपचारिक समापन होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सेनेच्या वेगवेगळ्या तुकड्या राजधानी दिल्लीत आलेल्या असतात. या सोहळ्यानंतर या तुकड्या आपापल्या छावणी आणि यूनिटमध्ये परत जातात. त्यामुळे सैन्याच्या तुकड्या आपापल्या छावणीत परत जाण्याचा हा सोहळा मानला जातो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.