नुकताच माघी गणपतीचा उत्साह मोठ्या जल्लोषात साजरा झाला. माघी गणपती म्हणजे गणेश जयंती अर्थात गणपती बाप्पाचा जन्मदिन. हिंदू धर्मियांचे आराध्य आणि प्रथमपुज्य दैवत म्हणजे गणपती. याच गणेशाची भारतामध्ये अगणित मंदिरं आहेत. अनेक मंदिरांना ऐतिहासिक वारसा आहे, अनेक मंदिरांची आजही न उलगडलेली रहस्ये आहे. एकूणच काय तर प्रत्येक मंदिर आपली स्वतःची एक खास विशेषतः जपून आहे. अशा या मंदिरांच्या गिणतीमध्ये गणेशाचे एक अतिशय खास आणि प्रसिद्ध मंदिर आहे, जे आपल्या भव्यतेमुळे संपूर्ण देशात लोकप्रिय होत आहे. (Temple)
संपूर्ण देशामध्ये गणेश भक्तांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. अशावेळेस गुजरात कसे मागे असेल. गुजरातमध्ये देखील लाखो गणेश भक्त तर आहेतच सोबतच गणपती मंदिरं देखील आहेत. याच मंदिरांपैकी एक गणपती मंदिर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर आपण गुजरातच्या अहमदाबादमधील गणेश मंदिराचे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. आशिया खंडातील सर्वात मोठे गणपती मंदिर गुजरातमध्ये आहे. अहमदाबादजवळ महेमदाबाद येथे वात्रक नदीच्या काठावर एक आणखी मोठे गणेश मंदिर आहे. (Marathi)
अहमदाबाद जवळ महेमदाबाद येथे ६ लाख चौरस फुट परिसरात हे मंदिर उभारले गेले असून त्याचे भूमीपूजन ७ मार्च २००७ रोजी केले गेले होते. वर्षापूर्वी हे मंदिर पूर्ण झाले आहे. वात्रक नदीकाठी असलेले हे मंदिर गणेशाच्या आकारातच बांधले गेले आहे. हे मंदिर १५ एकर जागेत पसरलेले असून, मंदिरातील गणेशाची स्थापना जमिनीपासून २० फूट उंचीवर केली गेली असून एकूण उंची ५६ फुटांची आहे. मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरातून आणलेली ज्योत येथे स्थापन केली आहे आणि त्यामुळेच या गणेशाला सिद्धीविनायक म्हणूनच ओळखले जाते. मंदिरात जाण्यासाठी जिना आणि लिफ्टची सोय केली गेली आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर म्हणजे प्रत्येक गणेश भक्ताचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात केवळ देशातीलच नाही तर विदेशातील देखील लोकं दर्शनासाठी येतात. सामान्य लोकांसोबतच कलाकार, राजकारणी, खेळाडू आदी सर्वच दिग्गज मंडळी सिद्धिविनायक मंदिरात कायम दर्शनाला येतात. याच सिद्धिविनायक मंदिराच्या नावावर या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गणपती मंदिराचे नाव ठेवण्यात आले आहे. इतकेच नाही तर सिद्धीविनायक मंदिरातून आणलेली ज्योत येथे स्थापन केली आहे. या मंदिराची भव्यता आणि विशालता पाहून प्रत्येकजण थक्क होतो. (Top Marathi Headline)
महेमदाबादचे हे गणेश मंदिर अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. याची स्थापत्यकला आणि भव्यता याला देशभरात एक वेगळी ओळख देतात. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात ७ मार्च २०११ रोजी झाली होती. तर या मंदिराचा ५ फेब्रुवारी २०१४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. मंदिराचे मुख्य गर्भगृह तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आहे, जेथे ३ फूट उंच सिद्धिविनायक मूर्ती विराजमान आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. (Top Stories)
========
Jaya Ekadshi : जया एकादशीच्या दिवशी काय करावे, काय करू नये?
========
मंदिराच्या आवारात प्रचंड आकाराचे स्वतिक आकारात बगीचे आहेत आणि छोटे झरे, कारंजी यांनी ते सजवले गेले आहेत. हा गणेश नवसाला पावतो असा भाविकांचा समज असल्याने देशभरातून भाविक या गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. येथे लाडूचा नैवेद्य दाखविला जातो. या मंदिरात अहमदाबाद किंवा खेडा येथून खाजगी टॅक्सी किंवा बसेसद्वारे सहज पोहोचता येते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
