Home » National Flag : राष्ट्रध्वज फाटल्यास किंवा जुना झाल्यास काय करावे?

National Flag : राष्ट्रध्वज फाटल्यास किंवा जुना झाल्यास काय करावे?

by Jyotsna Kulkarni
0 comment
National Flag
Share

नुकताच आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला. या दिवशी ध्वजवंदन केले जाते. प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्यदिन असो या दोन दिवशी आपल्या तिरंग्याला खूपच महत्त्व असते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला तिरंगा अभिमानाने फडकताना दिसतो, अनेकांच्या हातात दिसतो, घराला दुकानांना लावलेला दिसतो. मात्र त्यानंतर हा तिरंगा खाली पडतो, पायात येतो फाटतो, जीर्ण होतो याकडे कोणी लक्ष देत नाही. राष्ट्रीय सणांच्या दिवशी आपल्या तिरंग्याला मोठ्या अभिमानाने आपण डोक्यात घेऊन नाचतो, मात्र या सणांनंतर तो पायदळी तुडवला जातो. त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिन झाल्यानंतर हे राष्ट्रध्वज रस्त्यांवर पडलेले दिसतात. (National Flag)

देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, तो खराब करु नये असे नेहमीच सांगितले जाते, आणि आपण ते ऐकतोही. तिरंग्याची देखभाल, तो फडकवणे अशी कामं ही आदरानेच केले जातात किंबहुना ती तशीच केली पाहिजे. मात्र १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला मात्र कागदाचे तिरंगे रस्त्यावर अनेक ठिकाणी विखुरलेले आपल्याला दिसतात. हे असे खराब झेंडे बघून असे वाटते की, आपला तिरंगा फक्त स्वातंत्र्य किंवा प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवापुरताच मर्यादित आहे का? या दोन दिवसांनंतर त्याचे काय होते किंवा तो रस्त्यावर पडला तर काय फरक पडतो अशीच भावनांना लोकांची दिसून येते. पण असे नाहीये. (Marathi)

हे खराब ध्वज देखील आपण नीट उचलून त्याही मानाने विल्हेवाट लावणे आपले आद्य कर्तव्य आहे. पण अनेकदा बऱ्याच लोकांना जीर्ण किंवा जुना झालेल्या राष्ट्रध्वजाचे नक्की करायचे काय, असा प्रश्न पडतो. यासाठी भारतीय ध्वज संहिता २००२ नुसार काही नियम, सूचना लागू करण्यात आल्या आहेत. भारतीय ध्वज संहिता, २००२ ही भारताच्या राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनासाठी लागू होणारे कायदे आणि पद्धतींचा संच आहे. २६ जानेवारी २००२ पासून ही संहिता लागू झाली. यात कोणत्या सूचना, नियम आहेत ते जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

National Flag

सर्वात आधी यात ध्वजारोहन करण्याचा नक्की योग्य क्रम कसा असावा याबद्दल सांगितले आहे. त्यानुसार सर्वात आधी ध्वजारोहण (ध्वज फडकवणे) त्यानंतर राष्ट्रीय सलामी, राष्ट्रगीत, ध्वज प्रतिज्ञा, ध्वजगौरव गीत यानुसार ध्वजारोहण केले पाहिजे. मात्र जुन्या, खराब झालेल्या ध्वजाचे नक्की काय करावे याबद्दल या संहितेमध्ये पुढील काही मुद्दे दिले आहेत. (Top Trending Headline)

भारतीय ध्वज संहिता २००२ नुसार, राष्ट्रध्वज खराब झाल्यानंतर दोन प्रकारे विल्हेवाट केली जाऊ शकते. यात गुप्तपणे ध्वज दफन करणे आणि जाळणे समाविष्ट आहे. मात्र, दोन प्रक्रियेपैकी कोणतीही निवड करताना, त्याच्याशी संबंधित नियम आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. खराब ध्वज दफन करणे योग्य ठरते. यासाठी सर्वप्रथम ध्वज दहन करण्यासाठी सुरक्षित जागा निवडून ती जागा स्वच्छ करा. (Top Marathi News)

यानंतर झेंडा व्यवस्थित दुमडून घ्या. काळजीपूर्वक आणि आदराने ध्वज जळत्या आगीच्या मध्यभागी ठेवावा. तसेच झेंडा दुमडल्याशिवाय किंवा टोकापासून जाळणे कायदेशीर गुन्हा आहे. खराब झालेला राष्ट्रध्वज लाकडी पेटीत गोळा करा. त्यानंतर ही पेटी जमिनीत पुरावी. ध्वज संहितेनुसार ध्वज पेटीत न ठेवता थेट जमिनीत पुरणे हा कायदेशीर गुन्हा आहे. राष्ट्रध्वज जमिनीत पुरल्यानंतर काही काळ मौन बाळगण्याचाही नियम आहे. (Latest Marathi Headline)

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
■ राष्ट्रध्वजाचा माती आणि पाण्याचा स्पर्श होऊ नये.
■ कोणतेही वाहन, रेल्वे, जहाजावर राष्ट्रध्वज लावता येणार नाही.
■ सूर्योदयानंतर ध्वजारोहण आणि सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.
■ मिरवणूक किंवा परेडच्यामध्ये व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.
■ इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असावा. (Top Stories)
■ फाटलेला, मळालेला ध्वज फडकविला जाऊ नये, ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.

=========

Republic Day : प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्याच हस्ते ध्वजवंदन का केले जाते?

Republic Day : राष्ट्रध्वज फडकवण्याचे आहेत काही नियम आणि कायदे

Republic Day : प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड कधी आणि कुठे झाली?

=========
■ केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनालाच ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.
■ सजावटीसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये.
■ काहीही झाकण्यासाठी तिरंगा ध्वज वापरू नये.
■ तिरंगा रंगाचा वापर करून गादी, नॅपकिन्स, अंडरगारमेंट्स, रुमाल यावर किंवा भरतकाम केलेले नसावे.
■ कंबरेच्या खाली जाणाऱ्या कोणत्याही ड्रेसवर तिरंगा लावू नये हे लक्षात ठेवा.
■ ध्वजारोहणासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये.
■ राष्ट्रध्वजापेक्षा उंचावर इतर ध्वज किंवा पताका लावू नये. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.